• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2023
in इतर, हॅपनिंग
0
Locusts Attack
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात यंदा भयंकर टोळधाड दिसू लागली आहे. या टोळधाडीचा हल्ला (Locusts Attack) भारतात होणार का, हा चिंतेचा विषय आहे. यापूर्वी 2020 मध्ये अफगाणिस्तानातून आलेल्या टोळधाडीचा भारतात उपद्रव झाला होता. अगदी महाराष्ट्रातही नुकसान झाले होते.

Photo Credit : अल-जजीरा… अफगाण शेतकरी अब्दुल रकीब काझीमी आपल्या सहकाऱ्यांसह जाळीच्या सहाय्याने टोळधाड पकडताना. त्यांच्या गुरांच्या चाऱ्यासह 60 ते 70 टक्के कृषी उत्पादन नष्ट झाले आहे.

यादवीने पिचलेल्या अफगाणिस्तानात आधीच बहुसंख्य जनता अर्धपोटी राहतेय. आधीच अन्नटंचाईने ग्रासलेले शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या असहाय नजरा आता उत्तर अफगाणिस्तानात आलेल्या टोळधाडीवर आहेत. अफगाणिस्तानमधील मुख्य पीक उत्पादक क्षेत्र (ब्रेडबास्केट) असलेल्या प्रांतांपैकी आठ प्रांत सध्या टोळधाडीने प्रभावित झाले आहेत.

हंगामात कापणीच्या वेळी ही धाड आली. पुरेशा उपाययोजना करूनही टोळधाड अंडी घालते. आता त्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. गहू, वाटाणे, तीळ, हिरवी पीके याला मोठा धोका उभा राहिला आहे. मोरोक्कन, आफ्रिकन भागातून ही धाड अफगाणिस्तानात येते. अफगाण शेतकरी जाळींच्या साहाय्याने टोळ पकडून जमिनीत पुरतात. तरीही त्यांची संख्या अजूनही वाढत आहे.

12 लाख टन गहू नष्ट होऊ शकतो – संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज

या वर्षीच्या टोळधाड उद्रेकामुळे अफगाणिस्तानात 12 लाख टन गहू नष्ट होऊ शकतो, अशी भीती आहे. वार्षिक कापणीच्या एक चतुर्थांश आणि 48 कोटी अमेरिकी डॉलरपर्यंतचे नुकसान होऊ शकते, असा संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. यंदा अफगाणिस्तानला सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तिकडे मार्चपासून पाऊस पडलेला नाही. पाऊस झाला असता तर अंडी वाहून जाऊ शकले असते आणि धाड नियंत्रणात येऊ शकली असती.

पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला, कसे ओळखाल..? । Sufficient rain for sowing।
https://youtu.be/xpqvjEGSWT0

यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वोत्तम पीक आले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे अफगाणिस्तानमधील प्रतिनिधी रिचर्ड ट्रेन्चार्ड यांनी दिली आहे. मात्र, टोळधाड उद्रेकामुळे बहुतांश पीक नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे या वर्षाच्या उत्तरार्धात आणि पुढील वर्षात अन्न असुरक्षिततेची परिस्थिती बिघडण्याची भीती आहे. अफगाणिस्तानातील दुष्काळ स्थिती, पाऊस-पाण्याची कमतरता आणि अत्यंत मर्यादित नियंत्रण उपायांमुळे तो टोळांसाठी परिस्थिती वाढीला अनुकूल झाली आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अफगाणिस्तानला मिळणारी अब्जावधी डॉलर्सची आंतरराष्ट्रीय मदत थांबली आहे. अनेक दशकांच्या युद्धामुळे आधीच पिचलेल्या अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालानुसार, आर्थिक उत्पादन कमालीचे घसरले असून सुमारे 85 टक्के जनता दारिद्र्यात राहत आहे. पूर्वी अफगाणिस्तानमध्ये एक अतिशय मजबूत टोळ नियंत्रण प्रणाली होती, परंतु गेल्या दोन वर्षांत तालिबानची सरकार ही व्यवस्था नसल्याने ते नियंत्रण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

Ajeet Seeds

अन्यथा टोळांची संख्या 100 पट वाढेल 

योग्य उपायांअभावी टोळधाड अशीच अनियंत्रित राहिल्यास, पुढील वर्षी टोळांची लोकसंख्या 100 पट वाढू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी कार्यक्रम शाखेने दिला आहे.

भारतात 2020 मध्ये अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे टोळधाड राजस्थानात पोहोचली होती. त्यानंतर मध्यप्रदेश आणि विदर्भात टोळधाड आली होती. भाजीपाल्यासह मोसंबी आणि संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तशा भारतात अगदी पुरातन काळापासून टोळधाडी येत असल्याचे नमूद आहे. अफगाणनंतर पाकिस्तानातून पावसाळ्याच्या अखेरीस राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात टोळधाड शिरते. या भागात अंडी घातली जातात, उत्पत्ती वाढल्यानंतर परिपक्व टोळ तयार होतात. त्यांचे थवे एकत्रित पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात येतात. 1960 मध्ये महाराष्ट्रात सर्वात नुकसानकारक टोळधाड येऊन गेल्याचे सांगितले जाते.

टोळ म्हणजे अर्थपटेरा वर्गातील कीटक आहे. आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर टोळधाड म्हणजे अत्यंत घातक असे कीड आहे. जगभरातील कृषी क्षेत्राला त्यांचा फटका बसतो कारण मोठ्या संख्येने हे टोळ एका देशातून लगतच्या दुसऱ्या देशात जात असतात. हिरवीगार पीके खाऊन टोळधाड सारा परिसर ओसाड करते. त्यामुळे अन्न-धान्य उत्पादन खालावून अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सरकार अस्तित्त्वात नसलेल्या तालिबान व्यवस्थेच्या आकलनापलीकडील असा हा प्रश्न आहे. अफगाणिस्तानात टोळ नियंत्रण न झाल्यास यंदाच्या पावसाळा हंगामाअखेर भारताला टोळधाडीचा मोठा धोका होऊ शकतो. हाती आलेले पीक उद्ध्वस्त होण्याची भीती त्यामुळे राहील.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त
  • APMC : खासगी बाजारसमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार!

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अफगाणिस्तानखरीप हंगामटोळधाडसंयुक्त राष्ट्रसंघ
Previous Post

साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

Next Post

जगातील सर्वात लांब पायाची तरुणी – Ekaterina Lisina; आणखीही आहे तिच्यात बरंच काही खास …!

Next Post
Ekaterina Lisina

जगातील सर्वात लांब पायाची तरुणी - Ekaterina Lisina; आणखीही आहे तिच्यात बरंच काही खास ...!

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.