यवतमाळ : बाजारात कापसाची आवक सुरु झाली असून दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री होते. राज्यात दरवर्षी पणन महासंघ ७० केंद्रांवर कापूस खरेदी करते. मात्र दोन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांअभावी तारांबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पणन महासंघाने यंदापासून केवळ ५० केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र ही शासनाला पाठविले असून यावर शासन काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत आहे. यंदाच्या वर्षी देखील कापसाचा भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पणन महासंघाकडून यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
पणनची केंद्रे नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता
राज्यात दोन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांअभावी तारांबळ उडाली होती. त्यामुळेच पणन महासंघाने यंदापासून केवळ ५० केंद्रे सुरू करण्याचा ठराव घेतला आहे. अशातच आता ‘पणन’ची केंद्रे कमी झालेली आहेत. ‘सीसीआय’ची कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पणनची केंद्रे नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. नोंदणीप्रक्रिया सुरू झाली असली तरी केंद्र उघडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आधीच मनुष्यबळ कमी असल्याने कामकाज चालविताना पणन महासंघाला अडचणी येत आहेत.
नियोजन म्हणून ५० केंद्रे उघडण्याची तयारी
अमरावती विभाग हे प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशात येते. दोन वर्षांपूर्वी हंगामात मोठ्या प्रमाणात पणन व ‘सीसीआय’च्या केंद्रांवर कापसाची खरेदी झाली होती. यंदा कापसाला खासगी बाजारात दर चांगले आहेत. परिणामी, यंदा ‘पणन’कडे कापसाची आवक राहणार नाही. असे असले तरी नियोजन म्हणून पणन महासंघाने ५० केंद्रे उघडण्याची तयारी दर्शविली आहे. यंदा पुरामुळे कपाशीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दसरा आला असला तरी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आलेला नाही.
राज्यात किती केंद्रे, कधी सुरू होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
त्यातच आता खासगी बाजारात असलेल्या दरामुळे ‘पणन’कडे कापूस येण्याची शक्यता धूसर आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना आधार म्हणून ‘पणन’चे केंद्र सुरू केली जाणार आहेत. ‘सीसीआय’ किती केंद्रे उघडणार, याबाबत अजून स्पष्टता नसली तरी त्यांच्या केंद्रांची संख्यादेखील घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात व राज्यात किती केंद्रे, कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकर्यांना आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणार – दादाजी भुसे
- नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक