• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 23, 2022
in तांत्रिक, पशुसंवर्धन
1
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 

विक्रम पाटील
शेत पिकाचे होणारे, नुकसान शेतमालाची होणारी हानी हा नेहमीच शेतकर्‍यांसाठी चिंतेचा विषय असतो. शेतातील उभी पिकं पाळीव जनावरे, मोकाट जनावरे, वन्य पशु, पक्षी, कुत्री, माकडे, डुकरे यांच्यापासून सुरक्षित ठेवणे, पिके जोपासणे मोठेच कष्टाचे काम आहे. शिवाय मानवी चोरांची भीतीही आहेच. या अनुषंगाने कृषी संशोधकही सतत अभ्यास करतात. प्रयोग करतात. शेतातील पीक, शेतमाल संगोपन हा विषय बराच रोजगारही निर्माण करतो. याकामी मदतगार ठरतील अशा भरपूर विविध उपाय योजना बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील बर्‍याच उपाययोजना अंगापेक्षा बोंगा मोठा अशा ठरतात. हे उपाय करताना काही वेळा शेतमालाचे बाजार भाव पडले की उपायच महाग ठरतात आणि मग शेती हा आतबट्ट्याचा उद्योग ठरतो.

शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo

शेतमाल संरक्षणाबाबत परिपक्व विचाराचा शेतकरी फारसा चिंतातुर भासत नाही. मात्र तो व्यावहारिक तोडगा काढण्यात पटाईत असतो. शेतीमाल उत्पादन ही निसर्गाची देणगी आहे. त्या देणगीत गुरं, वानरं, माणसं, डुकरे, कुत्री, हरीण आणि अनेक वन्य पशूंचा वाटा असतो असे बरेच शेतकरी मान्य करतात. मात्र दिवस-रात्र मेहनत करत जागरण करत शेतमाल सुरक्षित करण्याचाही प्रयत्न सतत करतात. या विषयाने पक्षी जीवनाचा अभ्यास केला तर भ्रम आणि वस्तुस्थिती जाणून घ्यायला मदत होते. आतापर्यंत आपण शेतातील पाखरांची माहिती घेतली असता बहुतांश पाखरे कीड नियंत्रण, उपद्रवी प्राण्यांचे नियंत्रण, परागीभवन यात महत्त्वाची भूमिका बजावतात असे पाहिले आहे. ते जैविक नियंत्रक (इळे लेपीीेंश्र) आहेत म्हणून अशा पक्षांचा आपल्या शेतात शिवारात संचार अबाधित राखला पाहिजे. एकात्मिक शेतीची ती गरज आहे हे आपण अभ्यासले.


संत सावता माळी यांचा सुप्रसिद्ध अभंग आहे,
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
लसुन मिरची कोथिंबीरी अवघा झाला हरी

संत सावता माळी हे आपला मळा आणि विठ्ठल रुखमाई यांच्याशी कसे एकरूप झाले हे वरील अभंगावरून स्पष्ट होते. संतांना आपल्या मळ्यातच, आपल्या कष्टातच विठ्ठल रुखमाईचे दर्शन घडते. या उत्पन्न साधनात आणि या अध्यात्मिक वाटेवर पाखरं आहेतच. त्यांचा संचार त्यांचे अस्तित्व आहे.

Shree Sai Ram Plastic And Irrigation

पोपट ः समग्र भारतातील सुप्रसिद्ध पक्षी मोर राजा असला तरी लाडका पक्षी म्हणून पोपट ओळखला जातो. पोपटाचे इतर देशातील भाऊबंदही त्या त्या देशात तसेच लोकप्रिय आहेत. पाळीव पक्षी म्हणून पोपटाचे आकर्षण जरा जास्तच होते. आजही आहेच मात्र कायद्याने आता कडक बंदी घातली आणि त्याचा अंमल सुरू आहे म्हणून आता पोपट पाळणे कमी झाले आहे.

गर्द हिरवाकंच रंग ही पोपटाची ओळख ः तशीच वक्राकार अनुकुचीदार मजबूत चोच ही सुद्धा पोपटाची ओळख. पोपटाच्या चोचीमध्ये खालचा जबडा लहान तर वरचा जबडा मोठा असतो. वरचा जबडा हालचाल करतो. तीक्ष्ण आणि मजबूत असलेल्या चोचीची पकडही तितकीच मजबूत असते. माणसाचे बोट सापडले की रक्त निघालेच म्हणून समजावे. तरीही पोपटाचा आकर्षक बांधा, तितकाच सुंदर रंग आणि त्याचे लाडिवाळ मंजूर स्वर यामुळे मानवाला पोपटाचे आकर्षण असावे. बरेच पाळीव पोपट माणसाच्या बोलण्याची म्हणजे काही शब्दांची हुबेहूब नक्कल करतात. राम राम, नमस्कार, हॅलो असे नेहमीचे आणि सतत उल्लेख केल्या जाणारे सोपे शब्द पोपट शिकतात. एखाद्या गाण्याची ओळही पोपटांकडून गाऊन घेता येते.


महाराष्ट्रात कंठवाला पोपट, करण पोपट, टोई पोपट, पिंचू पोपट, लाल छातीचा पोपट, निळ्या पंखाचा पोपट अशा सहा-सात जातींचे पोपट आढळतात. गर्द झाडीची वने, पानगळीची वने, डोंगर टेकडीवरची उंच झाडे ही पोपटांची आवडीची ठिकाणे. दिवसभर लहान लहान थव्यांनी विखुरलेले पोपट रात्री मुक्कामाला मात्र अक्षरशा हजारोंच्या संख्येने मुक्कामाच्या जागी जमतात. अनुकूल झाडी असल्यास पोपटांचे लक्ष लक्ष थवे अनुभवता येतात. पोपटाची शीळ भारदस्त असते तसेच त्यांचे उड्डाणही खूप वेगवान असते. वेगात गिरकी घेण्याची पोपटांची कला ही तितकीच आकर्षक असते. सर्वदूर आढळणारा कंठवाला पोपट (ठेीश ठळपसशव झरीरज्ञशशीं) हिरव्या रंगाचा आकर्षक बांध्याचा सरळ शेपटी असलेला असतो. नराच्या गळ्यात खालून काळी पट्टी तर वरून गुलाबी पट्टी दिसते. नरमादी सारखेच असतात. करण पोपट आकाराने कंठवाल्या पोपटापेक्षा मोठा असतो. तर सर्वात लहान पिंचू पोपट असतो. इतर सर्व पोपट झाडाच्या फांदीवर रुबाबदार पणे उन्नत माथ्याने बसतात, तर पिंटू पोपट फांद्यांना लटकत आपली सर्कस चालवत असतात. सारखे फांदीला उलटे लटकणे, विविध हालचाली करणे, झोके खेळणे ही यांची कसरत पहातच राहावी अशी मोहक असते.

पोपटांचे अन्न आणि खाद्य सवयी मात्र शेतकर्‍यांच्या पोटात गोळा आणणार्‍या आहेत. पोपट तसे शुद्ध शाकाहारी आहेत. क्वचित एखादा पोपट युट्युब वर मांसाहार करताना आढळतो. शाकाहारात मात्र काहीही वर्ज्य नाही. धान्य (विशेषतः कोवळे असताना), सूर्यफूल, करडई, उडीद, सर्व प्रकारची फळे, सर्व तर्‍हेचा भाजीपाला असे काहीही पोपटांना खायला चालते. पालकची पाने, शोपची पाने, मुळ्याची पाने खातानाही पोपट आढळतात. मिरची आवडीची आहेच. टमाटे हिरवी असताना अधिक प्रिय आहेत. टरफलासह असलेले मक्याचे कणीस दाणे खाण्यासाठी पोपट लीलया कुरतडतात. पपया, कच्ची केळी, वांगे, चिकू, ज्वारी, बाजरी, दादर आणि अशा धान्यातील बिया खायला पोपटांना आवडते. उडीद, मुगाच्या, चवळीच्या हिरव्या शेंगा पोपट वेगाने फस्त करतात. कैरीचा फडशा पाडतात. लहान लहान बाळ नारळे तोडतात. शारीरिक चपळता खाण्यातही आढळते. वेगाने खातात. खाताना बरीच नासधूस करतात. शेतमालाचे नुकसान करण्यात महाराष्ट्रातील सर्वात उपद्रवी पक्षी अशी पोपटांची ओळख आहे. कृदंत प्राणी जसे की उंदीर, खार, चिचूंद्री, घूस यांच्यासारखेच पोपटही सतत काहीतरी खाद्यपदार्थ कुरतडत असतात. म्हणूनच शेतमालाचे नुकसान करण्याची पोपटांची उपद्रवी कृती शेतकर्‍यांना त्रासाची ठरते.

Ellora Seeds

अशा आहे मनोहर तरी पोपटांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न बर्‍याच शेतकर्‍यांना भेडसावतो. पोपटांचा अधिवास, पोपटांचा स्वभाव आणि सूक्ष्म निरीक्षणे यांच्या बळावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. पोपट झाडांच्या ढोलीत घरटी करतात. त्यासाठी काटेसावर, नारळ अशा झाडाचे खोड सुतार पक्षाने कोरून बिळ केलेले असते. त्या बिळात पोपटांची घरटी असतात. नरम खोडांना कोरून घरट करणे पोपटांना जमते. कोकणा व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात छिद्रे असलेले नारळाच्या झाडाचे खोड शेतात उभे ठेवू नये. इतर झाडांना आपोआपच ढोली नियंत्रित असतात. पोपटांची एक जोडी एका वेळी दोन ते पाच अंडी घालते. त्यांच्या पिलांना फारसे प्रशिक्षण लागत नाही. लवकर उडणे आणि खाणे शिकतात. पोपटांची चपळता आणि उडण्याचा वेग याचा उपयोग नियंत्रणासाठी करून घ्यावा. त्यासाठी शेत राखणदाराने गोफण गुंडा वापरणे सर्वोत्तम. पिकावर असलेल्या पोपटांच्या थव्याच्या दिशेने गोफणीचा दगड भिरकावला म्हणजे सर्व पोपट वेगाने शेत सोडतात. शेत राखणदाराने आरोळ्या मारणे, डबे वाजवणे याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे राखणदारास थकवा फार येतो. आवाज थांबला की पोपट सक्रिय होतात. आवाजापासून सुरक्षीत अंतरावर पोपट शेतातच बसतात. त्यापेक्षा पोपटांना बांधावरील झाडावर येवू द्यावे. पिकावर बसताच गोफण गुंडा भिरकवावा म्हणजेच थवा उडून जातो. संयमाने ही प्रक्रिया सुरू ठेवावी. थवा बसताच गोफण गुंडा भिरकावला जातो असा पुन्हा पुन्हा अनुभव पोपटांच्या थव्याने घेतला की उपद्रव कमी होतो. गोखन गुंडा ही पोपट नियंत्रणाची प्रभावी आणि स्वस्त पद्धत आहे. त्याला निरीक्षणाची जोड द्यावी.


धीवर ः धीवर पक्षी म्हणजे सुंदर रुबाबदार आकर्षक पक्षी. मोहक प्रभावी रंगाची नैसर्गिक देणगी लाभलेले पक्षी कुटुंब. धीवरांच्या महाराष्ट्र भरात सुमारे आठ प्रजाती आढळतात. त्यातील सामान्य धीवर, पांढर्‍या छातीचा धीवर आणि कवड्या धीवर हे गोड्या पाण्याच्या आसर्‍याने मात्र महाराष्ट्रभर आढळणारे धीवर पक्षी होत. इतरांमध्ये निळ्या कानाचा धीवर, बलाकचोच धीवर, काळ्या टोपीचा धीवर, कंठेरी धीवर आणि तीबोटी धीवर हे सारे कोकण कडा, समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट परिसरात आढळतात. सामान्य धीवर पक्षी सर्वात लहान आणि सर्वात सुंदरही असतो. एकटे किंवा जोडीने गोड्या पाण्याच्या आसर्‍याने राहतात. नद्या, धरणे, तलाव, डोह अशा जागी झाडी असल्यास ते त्याचे आवडीचे ठिकाण. नदीत पाण्यात मोठ मोठे दगड पाण्याच्या वर आलेले असल्यास सामान्य धीवरासाठी उत्तम. 18 ते 20 सेंटीमीटर आकाराचे लहानसे सुबक शरीर. टोकदार भाल्यासारखी चोच. शरीराची वरील बाजू चमकदार हिरवट निळी, खालची बाजू फिकट नारिंगी. शेपटी आखूड. अतिशय चपळ. उड्डाण उडताना ची ची ची ची अशी साद घालतच उडतात. अन्न म्हणजे उपलब्ध असल्यास प्रामुख्याने मासे. पाल, सरडे कीटकही चालतात.

कवड्या धीवर किंवा काळा पांढरा खंड्या दिसायला आकर्षक आहेच. आकाराने मोठा, चोच मजबूत धारदार भाल्यासारखी. मासेमारीसाठी उपयुक्त. बहुदा जोडीने असतात. नरमादी सारखे. मात्र नराच्या गळ्याभोवती दोन काळेपट्टे असतात तर मादीच्या गळ्याभोवती एकच काळा पट्टा असतो. यांची मासेमारी पाहण्यासारखी असते. स्थिर पाण्याच्या वर उड्डाण करून पोहोचले की हवेत एकाच जागी पंख फडफडवत थांबतात. चोच आणि अर्थात नजर खाली पाण्यातील माशांकडे असते. सावज टप्प्यात आले की जोरात पाण्यात सूर मारून क्षणात वर येतात ते सावज चोचीत पकडूनच. सावज चोचीतून सुटतच नाही. अख्खा मासा हवेत उडवून माशाचे तोंड खाली येईल, ते चोचीमध्ये पकडून गिळंकृत करतात आणि पुढच्या मोहिमेवर वाटचाल सुरू होते. शेततळे, धरणे, डोह येथे जोडी हमखास आढळते. मात्र संख्या कमी असते आणि उपद्रव फारसा होत नाही. म्हणून शेतकरी दुर्लक्ष करतात. मुबलक आणि अनुकूल मासे नसल्यास स्थानिक स्थलांतर करतात. प्रसंगी कीटक, सरड्या, पाल, बेडकांची लहान पिले, गोम खाऊन गुजराण करतात.


त्या तुलनेत पांढर्‍या छातीचा धीवर पाण्यापासून दूर अलिप्त जीवन जगतो. शेती प्रदेश, बागा, जंगलाच्या कडांनी, गावात, शहरात आढळतो. विजांच्या तारावर बसून जमिनीवरील कीटक, सरडे, पाली यांची शिकार करतो. शेंणकिडे खातो. म्हणून शेतातील गुरांच्या आसपास सुरक्षित जागी नियमित भेट देतो. बहुदा एकट्याने आढळतो किंवा नरमादी जोडी असते. आवाज म्हणजे शिवारात द्वाही फिरवणारी मोठी तुतारीच जणू. चोच लालजर्द आणि धारदार चाकू सारखी असते. सर्वच धीवर पक्षी घरटे करण्यासाठी नदीकिनारी सुरक्षित अशा मातीच्या कडांमध्ये छिद्र तयार करून आत अंडी घालतात. तेथे त्यांची बीळे बरीच खोल असतात. बिळाच्या शेवटच्या टोकास दोन ते सहा अंडी घातली जातात. अंडी उबवण्यासाठी तेथे थोडी मोठी जागा असते. नदी खोलीकरण आणि रुंदीकरण सारख्या कारवाई दरम्यान अशी बीळे अचानक संपतात. आपण पर्यावरणाच्या दृष्टीने अशा कृत्यांचा विचार केला पाहिजे. एकूणच धीवर कुटुंब संख्येने लहान, उपद्रवशून्य आणि सौंदर्य मूल्य असलेले द्विजगण आहेत. शेतात श्रमिकांच्या विश्रांतीत आपल्या उपस्थितीने आनंद पेरतात.
लेखक हे पक्षी अभ्यासक आहेत. संपर्क. 9970225538.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला …
  • शेतकऱ्यांनो असे करा आपत्कालीन पीक नियोजन – अतिवृष्टीमध्ये कापूस, तुरीचे व्यवस्थापन..

 


Share this:

  • Facebook
  • X
Tags: उपाययोजनाजैविक नियंत्रकधीवरपक्षी मोर राजापोपटमांसाहारविठ्ठल रुखमाईशेतमाल संगोपनशेतमाल संरक्षणसंत सावता माळी
Previous Post

Bumper Returns : बाबा रामदेव यांची फूड प्रोसेसिंग कंपनी पतंजली फूडसने केले मालामाल, एका लाखाचे 4 कोटी किती दिवसात? ते जाणून घ्या …

Next Post

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

Next Post
साखर उत्पादन

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

Comments 1

  1. Pingback: अतिपावसामुळे कापसात बोंडसड, आकस्मिक मर व नैसर्गिक गळ ; जाणून घ्या.. यावरील लक्षणे व उपाय..

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.