पुणे : सध्याच्या सक्रीय मान्सूनचा प्रवास, पावसाच्या करंट अपडेट्स, कुठे किती मिमी पाऊस पडण्याची शक्यता ते जाणून घ्या. सुदैवाने आता महाराष्ट्रात रेड ॲलर्ट नाही; पण कुठे यलो ॲलर्ट व ऑरेंज ॲलर्ट आहे, ते ॲग्रोवर्ल्डकडून जाणून घ्या.
बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव आता छत्तीसगड, मध्यप्रदेश सरकला आहे.
दरम्यान, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन इशारा क्षेत्रात NDRF व SDRF च्या 6 तुकड्या रात्री उशिरा तैनात करण्यात आल्या आहेत.
Weather Warning मान्सून अपडेट्स : कमी दाब क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी होतोय की 3-4 दिवस धोक्याचेच? 👇
https://cutt.ly/Manaoon-Updates-Marathi-News-AgroWorld-
मान्सूनचा प्रवास सध्या नेमका कसा आहे
या आठवड्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मोसमी पाऊस पडेल, दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होईल. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
👆👆 ही कमी दाबाच्या पट्ट्याची सध्याची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात आहे.
👆👆 सध्या सक्रीय झालेल्या मान्सूनचा प्रवास हा असा आहे. वरील व्हिडिओ पाहिल्यावर त्याची दिशा, प्रगती आणि वाटचाल याचा नेमका अंदाज येऊ शकेल.
या हवामान अंदाजानुसार, आज, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा येथे जोरदार पाऊस पडेल. दरम्यान, ओडिशा, झारखंड, किनारपट्टी कर्नाटक आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची अपेक्षा आहे.
आता पुन्हा एक नवे चक्रीवादळ
- 12 सप्टेंबर, रात्री साडेदहा वाजताची अपडेट : पुणे आयएमडीचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, IMD GFS प्रणालीने संकेत दिले आहेत, की 17-18 सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर आणखी एक नवे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 3, 4 दिवस मान्सून महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात नव्याने सक्रिय होण्याची शक्यता आहे.
पावसाने उडविलेली पुण्याची दाणादाण इथे क्लिक करून पाहा आणि पावसाचे शास्त्र समजून घ्या …
👆 मान्सूनचा प्रवास
15 तारखेपर्यंत जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. उत्तर किनारी महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये 14 तारखेच्या संध्याकाळपासून पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढेल.
12/09/202, रात्री 11.30 वाजताची अपडेट, पुढील 3.4 तासात, रात्रीतून मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडच्या काही भागात गडगडाटी पावसाची शक्यता आयएमडी, मुंबईने व्यक्त केली आहे. रडारवर पुणे शहरावर मात्र विरळ ढग दिसले
.
12 सप्टेंबर संध्याकाळची ढगांची स्थिती
नवीनतम सॅटेलाइट निरीक्षणात दिसले आहे, की अहमदनगर, रत्नागिरी बीड, पूर्वोत्तर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूरच्या दक्षिणेकडील भाग, घाटमाथा, ठाणे या भागांत येत्या रात्री गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईतही ढगाळ आकाश राहील.
राज्यातील पावसाच्या करंट अपडेट्स
- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
- पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात चिंचोली येथे निसर्गाचे रौद्ररूप; ढगफुटी होऊन प्रचंड पावसाने हाहाकार
- विदर्भात जोरदार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. उद्या अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
- अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस, वडाळी तलाव ओव्हर फ्लो, अंबा नाल्याला पूर येण्याची शक्यता.
- चंद्रपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह सततच्या होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील नदी नाले दुफळी भरून वाहत आहेत. जून महिन्यापासून आतापर्यंत 102 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
Improper #Infrastructure planning work… explained..!!
At #Nagpur #Airport Road..@AAPNagpur @TOIIndiaNews @ndtv #Nagpur #Maharashtra @BoltaHindustan @TheLallantop @DhanrajVanjari @Dhananjay_AAP @aap_marathi @lokmat pic.twitter.com/Tcn3yui3uk
— Jayant Deshmukh (@jayantdeshm) September 12, 2022
- मुसळधार पावसाचा नागपूरला फटका, मॉडेल सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये पुराचे पाणी, विमानतळ रोडवर पाणीच पाणी
- दक्षिण नगर, बीड याठिकाणी पाऊस अद्याप चांगला झालाच नाहीये, विहिरी अजूनही खोल आहेत.
- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतीची कामे खोळंबली तर अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पडणार्या पावसाची 40.8 मिमी नोंद झाली आहे.
-
कुठे किती पाऊस?
गोंदिया : 120 मिमी
नागपूर : 70 मिमी
वेरावल : 60 मिमी
महुआ : 50 मिमी
मालदा : 50 मिमी
महाबळेश्वर : 50 मिमी
वल्लभ विद्या नगर : 40 मिमी
हलादिया : 40 मिमी
रांची : 40 मिमी
भुज : 30 मिमी
सुरत : 30 मिमी
अमरावती : 30 मिमी
कारवार : 30 मिमी
👆 आयएमडीच्या हवाल्याने गुगल मॅपवर गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा
सौराष्ट्र आणि कच्छमध्ये 12-14 सप्टेंबर आणि पूर्व गुजरातमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस (64.5 ते 15.5 मिमी) पडण्याची शक्यता आहे.12 व 13 सप्टेंबर रोजी गुजरातच्या अंतर्गत भागातही मुसळधार (115.5 ते 204 मिमी) पाऊस पडेल.
गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, कोकण, गोवा, किनारपट्टी कर्नाटक आणि तामिळनाडू येथे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये डेहराडून, नैनिताल, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये विशेषतः 14 सप्टेंबरपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होईल.
हिवाळा येतोय…!
हिमाचल प्रदेशात नवीन हिमवृष्टी झाली आहे. IMDने प्रदेशात यलो ॲलर्ट जारी केला आहे.. हिमाचलमधील ज्या शिखरांवर बर्फवृष्टी झाली त्यात कुल्लू, लाहौल-स्पिती, कांगडा आणि चंबा या भागांचा समावेश आहे.
Deep convection observed over #Gujarat due to MTC and over #Maharashtra due to low pressure system. Intermittent heavy rain likely to continue for next 48-72 hours. Mumbai may also receive few heavy rain spells in next 3 days.#Mumbai #MumbaiRains pic.twitter.com/svEBDg73nx
— Pradeep Kushwaha (@pkusrain) September 12, 2022
👆👆 हवामान अंदाज सिस्टिम निरीक्षणात, MTC फॉर्मेशनमुळे गुजरात आणि महाराष्ट्रावर कमी दाब प्रणालीचे खोल संवहन दिसून आले. पुढील 48 ते 72 तास अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
#Depression is now over S #MadhyaPradesh as #LowPressure(WML). Likely to track NW.
Heavy rain to #MP, #Gujarat, #Maharashtra, S #Rajasthan, S #Pakistan.
Good rains to #Odisha, #Chhattisgarh, #Jharkhand, #Bihar, #WB & #NEIndia continue
Rain to E #Rajasthan, #Delhi, #UP later pic.twitter.com/qcVUStYeCC
— The Doberman Gang of India ! (@DobieIndica) September 12, 2022
👆👆 मध्यप्रदेशात आता अती तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर भारतातही चांगला पाऊस सुरू आहे. नंतर दिल्ली, उत्तर प्रदेश व उर्वरित राजस्थानात पाऊस पडेल.
Comments 2