लंडन : नंबर 230873, लिटल लिलिबेट … जगातील सर्वात वृद्ध अन् सर्वाधिक काळ राजेपद निभावलेल्या ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय या अफाट संपत्तीची मालकीण होत्या. पासपोर्ट नसलेली राणी; पण जगातील कुठल्याही देशात प्रवेश होता. चला, जाणून घेऊ या राणीबाबत थोडं वेगळं.
ब्रिटनमधील सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/NW6M1yxTidg
ब्रिटनची राणी एलिझाबेथ : सर्वाधिक काळाची राजेशाही
राणी एलिझाबेथ यांनी याच वर्षी राजसिंहासनावर 70 वर्षे पूर्ण केली. ब्रिटिश राजगादी म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वात जुने राजघराणे! त्याच सिंहासनावर एलिझाबेथ या सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी ठरल्या. जगभरातही कुठल्या राजाने सलग एव्हढे राज्य केले नाही. सप्टेंबर 2015 मध्येच एलिझाबेथ यांनी 63 वर्षे सात महिने राज्य करणाऱ्या आपल्या आजी, राणी व्हिक्टोरिया यांना मागे टाकले.
थायलंडचा राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा विक्रम मोडला
2016 मध्ये, थायलंडचा राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी बनल्या. 2022 मध्ये, त्या जगाच्या इतिहासात सर्वात जास्त काळ राज्य करणारी दुसरी राणी बनल्या. 17 व्या शतकातील फ्रेंच राजा लुई XIV चा विक्रम त्यांनी मागे टाकला. चौदाव्या लुईने वयाच्या चौथ्या वर्षीच सिंहासनावर विराजमान होण्याचा बहुमान मिळवला होता.
50 वर्षांहून अधिक काळ राज्य करणारे सम्राट
राणी एलिझाबेथ आणि राणी व्हिक्टोरिया यांच्याव्यतिरिक्त, ब्रिटीश इतिहासात फक्त चार इतर सम्राटांनी 50 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ राज्य केले आहे. जॉर्ज तिसरा (वय 59), हेन्री तिसरा (56), एडवर्ड तिसरा (50) आणि स्कॉटलंडचा जेम्स VI. ( 58 वर्ष).
राणी एलिझाबेथ यांचे शिक्षण घरीच झाले
एलिझाबेथ यांच्या काळातील आणि पूर्वीच्या अनेक राजघराण्यांप्रमाणे, त्यांनी कधीही सार्वजनिक शाळेत प्रवेश घेतला नाही. त्या कधीही इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्यास नाहीत. त्याऐवजी, त्यांचे शिक्षण धाकटी बहीण मार्गारेट हिच्या घरीच झाले. राणीला शिकवणाऱ्यांमध्ये वडील आणि इटन कॉलेजमधील वरिष्ठ शिक्षक; तसेच अनेक फ्रेंच मार्गदर्शक होते. कँटरबरीच्या आर्च बिशपने त्यांना धर्म शिकवला. एलिझाबेथच्या शालेय शिक्षणात घोडेस्वारी, पोहणे, नृत्य आणि संगीत यांचाही समावेश होता.
राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वप्रथम ईमेलचा वापर करणारी टेकसॅव्ही राणी! जग तेव्हा ई-मेल बाबत जाणतही नव्हते!
• ब्रिटनसह जगभरातील वृत्तपत्रांनी वाहिलेली श्रद्धांजली NewsPaper Front Pages
राजकुमारी एलिझाबेथ क्रमांक 230873, ब्रिटिश सेना
द्वितीय विश्वयुद्धादरम्यान, तरुण राजकुमारी एलिझाबेथ यांना क्रमांक 230873 हा कोड मिळाला होता. वाहतूक सेवेत सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. वाहतूक सेवा क्रमांक 1 ची दुसरी सबाल्टर्न, एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर म्हणून त्यांची तेव्हा ओळख होती. युद्धादरम्यान देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठीच्या प्रयत्नांत त्यांना पालकांकडून मोठ्या मुश्किलीने परवानगी मिळाली. त्यानंतर त्या रुग्णवाहिका आणि ट्रक चालवायला शिकल्या. काही महिन्यांतच त्या मानद कनिष्ठ कमांडरच्या पदावर पोहोचल्या.
राणी होत्या उत्कृष्ट नकलाकार
राणी एलिझाबेथ यांची नेहमीच गंभीर प्रतिमा जगासमोर उभी राहिली आहे. राणींनी स्वतःही तशीच प्रतिमा मांडली. लोकांना राणीचा अगदी इस्त्री केलेला चेहरा माहिती आहे. कोणतेही हावभाव न दर्शविणारा व चटकन प्रतिक्रिया न देणारा तसा मख्ख चेहरा. परंतु जे राणीला जवळून ओळखत होते, त्यांना राणीचा नखरेल, खोडकर स्वभाव चांगलाच माहिती होता. त्या अतिशय उत्कृष्ट नकलाकार (मिमिक्री आर्टिस्ट) होत्या. खाजगी, निवांत वेळेत त्या कुणाचेही चटकन अनुकरण करून नक्कल करून दाखवायच्या. त्यांना ते आवडायचेही.
राणीसाठी सर्वात आनंददायक गोष्टींपैकी एक
कॅंटरबरीचे माजी मुख्य बिशप रोवन विल्यम्स आणि क्वीन्स हाऊसचे पाद्री, बिशप मायकेल मान, यांनी त्याबाबत अनुभव सांगितले आहेत. रुक्ष, मर्यादेत बंदिस्त, चाकोरीतील राजनैतिक आयुष्यात ही कला म्हणजे राणीसाठी जणू सर्वात आनंददायक गोष्टींपैकी एक होती. अगदी अलीकडेच त्याने प्लॅटिनम ज्युबिली उत्सवादरम्यान या खोडकर स्वभावाचे दर्शन दाखविले होते. ॲनिमेटेड पॅडिंग्टन बेअरसह कॉमिक व्हिडिओमध्ये त्यांनी अभिनय केला होता. यात त्यांनी त्याला मिश्कीलपणे आपल्या पर्समध्ये जाम सँडविच लपवण्यास सांगितले होते.
राणी असून कर भरणा करणारी रॉयल टॅक्सपेयर्स
एलिझाबेथ कदाचित राणी असतील, परंतु त्यांनी 1992पासून सर्वसामान्य ब्रिटिश नागरिकांप्रमाणे नियमित कर देखील भरला आहे. 1992 मध्ये राणीचे शनिवार व रविवारचे निवासस्थान असलेल्या विंडसर कॅसलला आग लागली होती. त्यावेळी त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च केलेल्या लाखो पौंडांच्या खर्चा विरोधात काही नागरिकांनी उठाव केला होता. त्यावेळपासून राणीने स्वेच्छेने वैयक्तिक उत्पन्नातून कर भरण्यास सुरुवात केली.
आई अन् आजीची लाडकी लिटल लिलिबेट
राणीला तिची आई आणि आजी व नंतर सर्व कुटुंब लाडाने, प्रेमाने लिटिल लिलिबेट असे म्हणत. आजी क्वीन मेरी यांच्या सन्मानार्थ यॉर्कच्या एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर असे नाव नंतर त्यांना देण्यात आले. पण लहानपणी, कुटुंबाने प्रेमाने म्हटलेले लिटिल लिलिबेट त्यांना नेहमीच खास वाटायचे. राणीला लहानपणी बोबड्या बोलात स्वतःचे नाव “एलिझाबेथ” नीट उच्चारता येत नव्हते. त्या आपले नाव लिलिबेट सांगत. आजी क्वीन मेरी यांना लिहिलेल्या एका पत्रात, तरुण राजकुमारी एलिझाबेथ यांनी स्वतःच खाली लिहिले – तुझी गोड लिलिबेट.
पुढे प्रिन्स हॅरी आणि मेघन (डचेस ऑफ ससेक्स) यांनी त्यांच्या मुलीचे नाव लिलिबेट डायना ठेवले. त्यानंतर हे नाव ब्रिटनमध्ये खूपच लोकप्रिय झाले.
एलिझाबेथ-प्रिन्स फिलिप यांची 70 वर्षांची साथ
एलिझाबेथ आणि पती प्रिन्स फिलिप यांनी 70 वर्षांहून अधिक काळ सुखाचा संसार केला. त्यांना चार मुले होती. राणीने फिलिपबद्दल त्यांच्या लग्नाच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त सांगितले की, “इतक्या वर्षांपासून तो अगदी सहजतेने माझी शक्ती बनला आहे.” 1939 मध्ये त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली होती. ग्रीसमधील 18 वर्षीय नौदल कॅडेट प्रिन्स फिलिप यांना 13 वर्षीय एलिझाबेथ यांचे मनोरंजन करण्यासाठी पाठवण्यात आले होते. वर्षांनंतर, फिलिपला पुन्हा ख्रिसमससाठी विंडसर कॅसल येथे राजघराण्याच्या उत्सवात सामील होण्यासाठी आमंत्रित केले गेले. त्यावेळी त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले.
या जोडप्याने 1947 मध्ये वेस्टमिन्स्टर ॲबे येथे लग्न केले. 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी जेव्हा फिलिप यांचे निधन झाले, तेव्हापासून एलिझाबेथ यांच्या आयुष्यात एक पोकळी व एकाकीपणा निर्माण झाला होता.
राणीचा निश्चित असा वाढदिवस नव्हताच
एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला होता, परंतु तो नेमका कधी साजरा करायच, हे लोकांसाठी कधीकधी गोंधळात टाकणारे होते. त्याच्या अधिकृत वाढदिवसासाठी कोणताही सार्वत्रिकपणे निश्चित दिवस नव्हता. त्यांचा वाढदिवस जूनमधील पहिला, दुसरा किंवा तिसरा शनिवार असा कधीही असायचा. त्यांचा वाढदिवस कार्यक्रम सरकारकडून ठरवला जात होता.
ऑस्ट्रेलियामध्ये राणीचा वाढदिवस जूनच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जात असे, तर कॅनडामध्ये एलिझाबेथ यांचा वाढदिवस 24 मे रोजी किंवा त्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा वाढदिवसाच्या दिवशीच साजरा केला जात असे. फक्त राणी आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी खास शाही वाढदिवस खाजगी समारंभात साजरा केला जात असे.
राणीला होता श्वानांचा लळा
राणी एलिझाबेथ यांचे श्वानांवर खूप प्रेम होते. प्रिन्सेस डायनाने त्यामुळेच राणीबरोबर सदैव सोबत असलेल्या श्वानांना पाहून त्यांना “वॉकिंग कार्पेट” म्हटले होते. कारण ती सर्वत्र राणीसोबत चहूबाजूंनी सोबत असायची.
बीटल्सच्या “हर मॅजेस्टी” गाण्याने केले अजरामर
एलिझाबेथ या आपल्या कार्य कर्तृत्वाने अपरिहार्यपणे पॉप गाण्यांचा विषय बनल्या. बीटल्सने “हर मॅजेस्टी” गाण्यातून राणीला चित्रित केले. या गाण्याने जगभर राणीला अजरामर केले. “एक अतिशय गोड मुलगी” म्हणून या गाण्यात राणीचे वर्णन बीटल्सने केले. पॉल मॅककार्टनीने गायलेले आणि 1969 मध्ये रेकॉर्ड केलेले हे गाणे “ॲबे रोड” अल्बमच्या शेवटी दिसते.
पासपोर्ट, व्हिसाशिवाय कोणत्याही देशात प्रवेश
वडील राजे जॉर्ज षष्टम यांच्या मृत्यूनंतर वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी एलिझाबेथ द्वितीय राणी बनल्या. त्यांना अचानक राज्य कारभार हाती घ्यावा लागला होता.1952मध्ये ब्रिटनच्या महाराणी झाल्या होत्या. त्या केवळ ब्रिटनच नव्हे तर जगातील एकूण 15 देशांच्या महाराणी होत्या. त्यांच्या निधनाने गेल्या 80 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या इतिहासाची साक्षीदार हरपली आहे. राणीला पासपोर्ट, व्हिसाशिवाय जगातील कोणत्याही देशात मुक्त प्रवेश होता. असे करू शकणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या.
500 अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक संपत्ती
जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या महाराणी एलिझाबेथ या मोजदाद करता येणार नाही इतक्या अब्जावधी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण होत्या. त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकल्यावर कुणीही चक्रावून जाईल. फॉर्च्युनच्या दाव्यानुसार, महाराणी एलिझाबेथ यांची संपत्ती सुमारे 500 अब्ज अमेरिकी डॉलरची इतकी आहे. भारतीय रुपयात एकूण 39,858,975,000 रुपयांची ही संपत्ती नवे राजे, वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना वारसा हक्काने मिळणार आहे.
सॉवरेन ग्रँट करातून ब्रिटनच्या शाही घराण्याला उत्पन्न
ब्रिटनसह 15 देशातील करदात्यांकडून ब्रिटनच्या शाही घराण्याला मोठे आर्थिक उत्पन्न (सॉवरेन ग्रँट) मिळते. किंग जॉर्ज तृतीय यांच्या काळात, संसदेत मंजूर केलेल्या एका खास करारान्वये या ग्रँटची सुरुवात झाली. त्यातून राजघराण्याला आणि पुढील पिढ्यांसाठी उत्पन्न मिळण्याची तजवीज केली गेली होती. या कराराला सिव्हिल लिस्ट असे म्हटले जायचे. नंतर 2012मध्ये त्याला सॉवरेन ग्रँट असे नाव दिले गेले. या सॉवरेन ग्रँटची एकत्रित किंमत 2021-22मध्ये 86 दशलक्ष डॉलर्स एव्हढी होती. राजघराण्याच्या संपत्तीची देखभाल-दुरुस्ती, शाही सदस्यांचा प्रवास व इतर खर्च यासातही या निधीचा वापर करण्यात येत होता.
अशी आहे ब्रिटनच्या राजघराण्याची संपत्ती
फोर्ब्सच्या आकलनानुसार 2021मध्ये ब्रिटनच्या शाही राजघराण्याकडे 28 बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. भारतीय रुपयात त्याची किंमत 22,28,73,70,00,00 इतकी होते. ही संपत्ती अशी –
1. द क्राउन इस्टेट: 19.5 बिलियन डॉलर (15,52,15,61,25,000 रुपये)
2. बकिंगहॅम पॅलेस: 4.9 बिलियन डॉलर (3,90,02,89,75,000 ₹)
3. द डची ऑफ कॉर्नवाल: 1.3 बिलियन डॉलर (1,03,47,70,75,000.0 ₹)
4. द डची ऑफ लँकेस्टर: 748 मिलियन डॉलर (59,53,91,17,000.00 ₹)
5. केंसिंग्टन पॅलेस: 630 मिलियन डॉलर (50,14,65,82,500.00 ₹)
6. स्कॉटलंडमधील क्राउन इस्टेट: 592 मिलियन डॉलर
8. (47,12,18,68,000.00₹)
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
वंडरवर्ल्ड : द्वारका हे नवव्या शतकापासूनचे धार्मिक स्थळ; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाच्या उत्खननात मात्र द्वारका नागरी समुद्रात बुडल्याचा थेट पुरावा अप्राप्तच!
नायगारा फॉल्स : 10,000 वर्षांपूर्वी निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न अन् त्यासंदर्भातील रंजक प्रेमकथा, दंतकथा जाणून घ्या
Comments 1