जळगाव : Food Processing… प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र आणि केंद्र आणि राज्य निधी हा 60:40 या प्रमाणात आहे. काय आहे ही योजना, योजनेचे स्वरूप कसे असणार आहे, यामध्ये प्रक्रियेसाठी कोणते उत्पादन घेऊ शकतो, अनुदान किती मिळणार, अनुदान कोणाला मिळणार हे जाणून घेऊ या…
आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडून देशातील नागरिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी इतर अनेक प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासोबत अनेक योजनाही राबवल्या जात आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे. हे लक्षात घेऊन आपल्या देशातील केंद्र सरकारने बेरोजगार नागरिकांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना सुरू केली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासन सहित आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची स्थापना व स्तर उंचावणे, तांत्रिक, आर्थिक व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन व्यवसायासाठीचे अर्थसाह्य देण्यात येते.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे उद्दिष्ट
सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
मायक्रो फूड प्रोसेसिंग, उद्योग बचतगट आणि सहकारी संस्थांकडून पतपुरवठा करण्याची क्षमता वाढवण्यास सक्षम करणे.
ब्रँडिंग आणि जाहिरात बळकट करणे
दोन लाख उपक्रमांचे औपचारिक फ्रेमवर्क हस्तांतरणास समर्थन देणे.
प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळेसारख्या समभागांचे जतन करणे.
अन्न प्रक्रिया क्षेत्रात संस्थांचे संशोधन प्रशिक्षण मजबूत करणे.
व्यावसायिक तांत्रिक समर्थनासाठी एंटरप्राइझमध्ये प्रवेश वाढवणे.
योजनेत कोणती उत्पादने येऊ शकतात?
नाशवंत कृषी उत्पादने (जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशू-उत्पादन, किरकोळ वन उत्पादने).
तृणधान्य आधारित उत्पादन
मत्स्यपालन
कुक्कुटपालन
मध
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
योजनेअंतर्गत अनुदान कोणत्या उद्योगांना मिळेल?
सामाजिक पायाभूत सुविधा व विपणन ब्रँडिंग उत्पादन याकरिता अनुदान देय असेल.
अस्तित्वातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
योजनेअंतर्गत अनुदान कोणाला मिळेल?
या योजनेअंतर्गत वैयक्तिक सूक्ष्म अन्य प्रक्रिया उद्योजक यांना अनुदान दिले जाईल.
या योजनेअंतर्गत स्वयंसाहाय्यता गट यांना देखील अनुदान देय असेल.
तसेच शेतकरी उत्पादक गट किंवा सहकारी संस्था यांनाही अनुदान देय असणार आहे.
योजनेअंतर्गत अनुदान किती मिळेल?
अ. सूक्ष्म प्रक्रिया उद्योगासाठी मिळणारे अनुदान
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प खर्चाच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये इतके अनुदान हे दिले जाईल. प्रकल्प उभारणीसाठी बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. कर्ज घेतल्यावर कर्जाशिवाय प्रकल्पांमध्ये लाभार्थ्यांचा स्वतःचा हिस्सा देखील प्रकल्पाचा किमान 10 टक्के रकमेचा असणे आवश्यक असणार आहे.
स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांनाही वरील प्रमाणे 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान मिळेल. त्याचबरोबर जे सदस्य हे अन्नप्रक्रिया उद्योग यामध्ये गुंतलेले आहेत, अशाच सदस्यांना बीज भांडवल म्हणून प्रत्येक सदस्याला 40,000 रुपये हे खेळते भांडवल तसेच आवश्यक छोटी उपकरणे खरेदी करण्यासाठीही असेल. अशाप्रकारे एका गटाला जास्तीत जास्त 4 लाख रुपये बीज भांडवल दिले जाईल.
स्वयंसहाय्यता गटातील सर्व सदस्य हे अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित नसल्यामुळे त्याचे बीज भांडवल हे स्वयंसहाय्यता गटाच्या फेडरेशनला देण्यात येईल.
ब. सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळणारे अनुदान
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत अनुदान हे शेतकरी उत्पादक संघ स्वयंसहाय्यता गट किंवा उत्पादक उत्पादकांच्या सहकारी संस्था किंवा खाजगी उद्योग किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा यांना देण्यात येते. यासाठी 35 टक्के अनुदान आहे. 10 लाख रुपये पेक्षा जास्त अनुदानाची प्रस्ताव केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे पाठवले जातात.
सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये शेतामध्ये असे प्रतवारी संकलन, सामाजिक प्रक्रिया सुविधा, गोदाम, शीतगृह या सामायिक पायाभूत सुविधा उभारता येतील यांच्यासाठी अनुदान देय असेल.
शेतकरी उत्पादक संघ किंवा स्वयंसहाय्यता गट किंवा उत्पादकांच्या सहकारी संस्था यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पानुसार प्रकरणी 50,000 रुपये एवढे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल.
क. विपणन व ब्रँडिंग साठी मिळणारे अनुदान
शेतकरी उत्पादक संघ किंवा स्वयंसहाय्यता गट किंवा सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग एस पी व्ही किंवा उत्पादकांच्या सहकारी संस्था यांना उत्पादकांचे ब्रँडिंग करण्यासाठी म्हणजेच मार्केटिंग करण्यासाठी लागणारा एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान हे देय असणार आहे. अंतिम उत्पादन हे ग्राहकांना किरकोळ विक्री पैकी मध्ये विकणे आवश्यक आहे. तसेच सदरचे उत्पादनाचा टर्नओव्हर हा किमान 5 कोटी तरी असणे आवश्यक आहे.
‘या’ योजनेसाठी अनुदान पात्रता काय ?
अ. वैयक्तिक सूक्ष्म व अन्न प्रक्रिया उद्योजक पात्रता
दहापेक्षा कमी कामगार असणारे वयक्तिक सूक्ष्म प्रक्रिया उद्योग
प्रकल्पाच्या किमान 10 टक्के रक्कम स्वनिधी म्हणून आवश्यक आहे.
उद्योगाची मालकी प्रोप्रायटर किंवा पार्टनर असणे गरजेचे आहे.
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला अनुदान मिळेल.
अर्जदार लाभार्थ्यांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे आणि शिक्षण हे किमान आठवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
ब. उत्पादकांच्या सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक संघ अनुदान पात्रता
प्रकल्पाच्या किमान 10 टक्के रक्कम ही स्वनिधीतून खर्च करणे आवश्यक आहे.
किमान 1 कोटी इतका टर्नओव्हर असणे आवश्यक आहे.
सभासदांना उत्पादनाबाबत पुरेस ज्ञान असणे तसेच उत्पादनामध्ये कामाचा किमान 3 वर्षाचा तरी अनुभव असणे गरजेचे आहे.
प्रकल्पाची किंमत ही सध्याच्या टर्न ओव्हर रकमेपेक्षा जास्त नसावी.
योजनेचा कालावधी किती आहे?
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही सन 2020-21 ते 2024-25 पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी पाच वर्षात 10 हजार कोटींची तरतूद आहे.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज व प्रकल्प अहवाल एवढीच कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
या योजनेसाठी आणि लाभार्थी अर्जदाराने बँकेत अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ऑनलाईन अर्जासाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईट वर अर्ज करू शकता.
– सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, त्यानंतर वेबसाइटचे होमपेज तुमच्यासमोर उघडेल.
– वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला ऑनलाइन नोंदणीच्या (Online Registration) पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
– आता या पेजवर तुम्हाला Sign Up वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
– आता तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती एंटर करायची आहे, तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला रजिस्टर बटणावर क्लिक करावे लागेल.
– तुम्ही नोंदणी बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करावे लागेल, आता तुम्हाला लाभार्थी प्रकार निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला Apply Now बटणावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर येईल.
– आता तुम्हाला या अर्जामध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील आणि आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.
– सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंगसाठी 50 टक्के अनुदानाचा असा घ्या लाभ…!
गुड न्यूज 1 : आता शेतसारा ऑनलाईन भरता येणार; भूमिअभिलेख विभागाची सुविधा Shetsara Online
Comments 2