• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ऑगस्ट मान्सून Good News : महाराष्ट्रात 5 पर्यंत उघडीप, महिन्याचा पावसाचा अंदाज आयएमडी आज सायंकाळी जाहीर करणार; जुलैमध्ये मुसळधार विक्रम!

देशाच्या अनेक भागात तूट; असमान वितरण देशाच्या शेती क्षेत्रासाठी वाईट

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2022
in हॅपनिंग
0
ऑगस्ट मान्सून Good News : महाराष्ट्रात 5 पर्यंत उघडीप, महिन्याचा पावसाचा अंदाज आयएमडी आज सायंकाळी जाहीर करणार; जुलैमध्ये मुसळधार विक्रम!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : जून कोरडा, जुलैमध्ये धो-धो, आता ऑगस्ट मान्सून कसा असेल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात उघडीप राहील अशी शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याचा पावसाचा अंदाज आयएमडी आज सायंकाळी जाहीर करणार आहे. तो आम्ही ॲग्रोवर्ल्ड वाचकांना तात्काळ अपडेट करूच, तोवर जुलैमध्ये पावसाने 28 वर्षांतील मुसळधार विक्रम काय केला, ते जाणून घेऊया…

Rain Record in July

ऑगस्टचा अंदाज यंदा थोडा अवघड

ऑगस्टचा पावसाचा अंदाज आयएमडी (भारतीय हवामान विभाग) आज, सोमवारी सायंकाळी जारी करणार आहे. तशी राज्यात 5 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मात्र, महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑगस्टमधील पाऊस सामान्यतः अधिक राहतो. मात्र, यंदा ऑगस्टमधील पावसाचा अंदाजही थोडा अवघड आहे, असे आयएमडी पुणे विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

बुकिंग अखेरच्या टप्प्यात.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवारी (6 ऑगस्टला) एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश..

मान्सूनचे दुसऱ्या टप्प्यातील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यासाठीचे अधिकृत आयएमडी अंदाज जाहीर झाले. जाणून घ्या राज्याची आणि देशातील पावसाची सद्य व संभाव्य स्थिती खालील दोन्ही बातम्यांतून 👇🏻👇🏻

1. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा आयएमडी अंदाज

2. शुक्रवारपर्यंत पुढील 4 दिवस राज्यात पाऊस – पुणे वेधशाळेचा अंदाज 

यंदाचा जुलै ठरला 2005 नंतर सर्वाधिक पावसाचा 

भारतात जुलैमध्ये 327.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सामान्य सरासरीपेक्षा हा पाऊस 16.9% जास्त आहे. हा 2005 नंतरचा जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे. टक्केवारीच्या संदर्भातही मुसळधार विक्रम झाला असून 1994 नंतर पावसाच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत ही सर्वात जास्त पावसाची टक्केवारी आहे.

शेवटच्या आठवड्यात ओसरला पावसाचा जोर

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने महाराष्ट्रातील चारही उपविभागातील अतिरिक्त पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मध्य महाराष्ट्रात अतिरिक्त पाऊस 45 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत कमी झाला. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 80 टक्के अतिरिक्त पाऊस होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची उघडीप राहिल्याने मराठवाड्यातील अतिरिक्त पावसाची नोंद 69 टक्क्यांवर आली. त्याचप्रमाणे विदर्भातही जुलैतील ज्यादा पाऊस हा 54 टक्क्यांवरून 48 टक्क्यांवर आला. कोकण आणि गोव्यात 14 जुलै ते 20 जुलै दरम्यान 26 टक्के जास्त पाऊस झाला. जुलैअखेर हा जास्तीचा पाऊस 15 टक्क्यांवर आला आहे.

मंत्रीमंडळ बैठक : अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेडीसाठी 50 हजारांच्या अनुदानाचा लाभ; इतरही Farmers Relief निर्णय जाणून घ्या… 👈🏻👆🏻 इथे क्लिक करून वाचा

देशभरात 8% जास्त पाऊस; पण वितरण असमान

जुलै महिन्यात देशभरात 8% जास्त पावसाची नोंद झाली; पण त्याचे असमान वितरण झाले. ईशान्य-पूर्व भारतामध्ये 16% पावसाची कमतरता राहिली. तर मध्य भारतात सरासरीपेक्षा 17% जास्त; दक्षिण द्वीपकल्पात 28% जास्त आणि वायव्य भारतात 5% जास्त पाऊस झाला. जुलैमध्ये राजस्थानात 66% जास्त पाऊस नोंदविला गेला. 31 जुलैपर्यंत, उत्तर प्रदेशात 46%, झारखंडमध्ये 49%, बिहारमध्ये 39% आणि पश्चिम बंगालमध्ये 26% पावसाची कमतरता होती. या राज्यांसाठी जुलै महिना चांगला गेला नाही, असे आयएमडीचे महासंचालक एम मोहपात्रा यांनी सांगितले. नैऋत्य मान्सूनमध्ये आतापर्यंत देशभर झालेल्या अत्यंत असमान पावसाचा भात आणि इतर पिकांच्या लागवडीवर परिणाम होत आहे, विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोऱ्यात पेरण्या अजून खोळंबल्या आहेत.

 आता पावसाळ्यात चमचमीत, मसालेदार खा बिनधास्त!!

•  अल्कोहोल फ्री, GMO फ्री, लो फॅट, लो सोडियम, नॅचरल & हाय इन प्रोटीन! चायनीज, थाई, लेबनीज, इटालियन, मेक्सिकन आणि भारतीय मसाल्याच्या मुबलक व्हरायटी; गुणवत्ता, दर्जा आणि समाधानासाठी यूझर रेटिंग 4 स्टार आणि अधिक असलेले प्रॉडक्टस… पाहण्यासाठी, सवलतीत खरेदी करण्यासाठी 👆 इथे क्लिक करा. ॲग्रोवर्ल्डच्या वाचकांसाठी अमेझॉनची खास डिस्काउंट ऑफर … 

बिहार, उत्तर प्रदेश तसेच ईशान्य-पूर्व भारत कोरडाच

गेल्या दोन दिवसांत, मान्सूनचा प्रवाह उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे वायव्य भारतात चांगला पाऊस झाला आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही थोडा पाऊस पडला. परंतु या राज्यांमध्ये पावसाची कमतरता इतकी जास्त आहे, की किरकोळ पावसाने काहीही फायदा झाला नाही. पुढील 2-3 दिवसांत, जेव्हा मान्सूनचा प्रवाह हिमालयाच्या पायथ्याजवळ असेल, तेव्हा बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे; परंतु त्यामुळे जुलैतील तूट भरून काढता येणार नाही, असे महापात्रा म्हणाले.

असमान वितरण देशाच्या शेती क्षेत्रासाठी वाईट

पावसाचे असमान वितरण हे देशाच्या शेती क्षेत्रासाठी वाईट आहे. जुलैमध्ये पूर्व भारतात क्वचितच पाऊस पडला, हा भात पेरणीचा महत्त्वाचा काळ होता. आता ऑगस्टच्या मध्यापर्यंत, पूर्व भारतातील बहुतांश भागात पेरणी होणार नाही. याचा शेतकर्‍यांवर तसेच सामान्य लोकांवर व्यापक परिणाम होईल, असे हैदराबाद येथील सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे कार्यकारी संचालक जी.व्ही. रमांजनेयुलू यांनी सांगितले. या भागात आता ऑगस्टच्या मध्यापर्यंत चांगला पाऊस दिसत नाही. यामुळे रब्बी (हिवाळी) पिकांना उशीर होईल, असेही ते म्हणाले.

उत्तर-पूर्व भारत, मध्य प्रदेशातील शेतकरी अडचणीत

ज्या शेतकर्‍यांनी आधीच भात पेरणी केली आहे, त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम केवळ धानावरच होणार नाही, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन आणि लाल हरभरा, हिरवा हरभरा आणि काळा हरभरा यासह इतर अनेक कडधान्यांवरही होईल. लाल हरभरा विशेषतः नुकसानीत जाईल. शिवाय, भुईमूग आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबियांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असे रामांजनेयुलू यांनी सांगितले.

जुलैच्या मध्यानंतर, मध्य भारतात अत्यंत मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे मध्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांमध्ये पिकांचे नुकसान झाले आणि ते वाहून गेले. “या परिणामांमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे, अशी भीतीही रमांजनेयुलू यांनी व्यक्त केली.

ईशान्य अरबी समुद्र आणि पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

केरळ, कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता

मध्य भारतात विशेषत: महाराष्ट्र, गुजरातेत जुलैच्या पावसाने जूनमधील तूट भरून काढली आणि सरप्लसची नोंद केली. त्यामुळे पूर्वेकडील भाग वगळता देशभरात जुलै चांगला गेला. आता ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये आम्ही पुन्हा एकदा द्वीपकल्पीय भारतावर मान्सूनच्या वाढीची अपेक्षा करत आहोत. नैऋत्य बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीवर दोन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडू शकतो आणि मध्य भारतातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असे स्कायमेट वेदरचे महेश पलावत यांनी म्हटले आहे.

देशभरात असा राहू शकतो पुढील 4 दिवसांचा पाऊस

मान्सून ट्रफमधील बदलामुळे उत्तराखंडमध्ये 2 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर; पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश; आणि 1 व 2 ऑगस्ट रोजी पूर्व उत्तर प्रदेशासह बिहार, झारखंड आणि गंगेच्या खोऱ्यात, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 3 ऑगस्टपर्यंत; तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा 4 ऑगस्टपर्यंत पाऊस राहील. 2 ऑगस्ट रोजी रायलसीमा भागात तसेच तेलंगणात 3 आणि 4 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे. 2 आणि 4 ऑगस्ट दरम्यान दक्षिण किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक व लक्षद्वीप; 4 ऑगस्टपर्यंत दक्षिण आतील कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ भागात पाऊस राहील.

तुम्हाला खालच्या बातम्याही वाचायला नक्कीच आवडतील (संबंधित लिंक क्लिक करा) 👇👇

सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

फायदेशीर मेथी लागवड

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Rain Recordऑगस्ट मान्सूनपावसाचा अंदाज आयएमडीमहाराष्ट्रात उघडीपमुसळधार विक्रम
Previous Post

Inspiring Dairy Farming यशोगाथा : आधुनिक दुग्धव्यवसाय कसा करावा? आयआयटी इंजिनियर तरुणाने गावात उभा केला 44 कोटींचा डेअरी उद्योग; कसे ते जाणून घ्या ..

Next Post

बुकिंग अखेरच्या टप्प्यात.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवारी (6 ऑगस्टला) एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश.. 🐄 🐃 🌱

Next Post
दुग्धव्यवसाय

बुकिंग अखेरच्या टप्प्यात.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवारी (6 ऑगस्टला) एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश.. 🐄 🐃 🌱

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish