• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2022
in इतर
1
सावधान..! सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणू..; असे करा व्यवस्थापन..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : जुलै महिन्यात अतिवृष्टीचा मार झेलत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी बातमी आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात प्रथमच सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणूचा म्हणजेच यलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील 80 ते 90 एकरवरील सोयाबीन पीकावर या पिवळ्या मोझॅक विषाणूचा हल्ला झालेला दिसून येत आहे. यालाच काही भागात पीलिया रोग किंवा पीला वायरस असेही म्हटले जाते.

(Yellow Mosaic Virus Attack on Soybean in Shirol Kolhapur)

 

शिरोळमध्ये मोठी सोयाबीन पेरणी

शिरोळ तालुक्यात तब्बल 910 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी चांगले भाव मिळाल्याने यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. सोयाबीनचा प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याच्या खूप अगोदर त्याची बहुतांश भागात पेरणी झाली. हंगामात लवकर पेरणी केल्याने वाढीसाठी आणि उत्पादनासाठी अनुकूल हवामानाची हमी मिळते, म्हणून शेतकरी तसे करतात.

 

कृषी अधिकाऱ्यांनी दिली भेट

शिरोळ तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रादुर्भाव झालेल्या सोयाबीन शेतीला भेट दिली. हा बहुधा पिवळा मोझॅक विषाणूचाच हल्ला दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रादुर्भावाची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पिवळा मोझॅक प्रादुर्भावामुळे टरफल्यांमधील सोयाबीनची परिपक्वता थांबली आहे.

 

शिरोळमध्ये प्रथमच सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक

शिरोळ तालुक्यात हा प्रादुर्भाव दुर्मीळ असून अलीकडच्या वर्षांत पहिल्यांदाच तो तालुक्यात आढळून आला आहे, असे शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही शेताला भेट दिली, 80 ते 90 एकरात पसरलेल्या सोयाबीन पीकावर पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे मला वाटते. परंतु शेतकऱ्यांना नेमके उपाय सुचवण्यासाठी तज्ञांनी त्याची पुष्टी केली पाहिजे. ज्या शेतात हा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्या बहुतेक शेतात पूर्वी सोयाबीन पीकाची लागवड झाली होती. पिकांची फेरपालट होतच नाही. खरेतर, पीक रोटेशन, फेरपालट यामुळे पीक विशिष्ट प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.”

 

यलो मोझॅक, पीलिया रोग लक्षणे

हा रोग मूगबीन यलो मोझॅक विषाणू आणि मूगबीन यलो मोझॅक इंडिया या विषाणूच्या प्रजातीमुळे होतो. यात सोयाबीन पीक क्षेत्रात शेंड्याकडून पाने पिवळी पडून संपूर्ण झाडच पिवळे पडते. काही वेळा झाडाच्या पानावर त्रिकोणी व चौकोनी आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. अर्धे हिरवी पिवळी पाने असलेले झाड दुरून ओळखता येते. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते. पाने लहान, आखूड, जाडसर व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगाही कमी येतात. निरोगी झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव मावा व पांढऱ्या माशीव्दारे होतो. उबदार तापमानात या वाहक पांढऱ्या माशींची संख्या वेगाने वाढते. याशिवाय, अतिदाट पेरणी आणि नत्राचा अधिक वापर यामुळेही रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पिवळा मोझॅक रोगाचे विषाणू बियाण्यामधूनच पसरल्याचीही शक्यता व्यक्त होते.निर्मिती करताना काही कंपन्या योग्य ती काळजी घेत नाहीत, त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बियाणे प्रादुर्भावाला चटकन बळी पडते. अनेक शेतकरी घरीच बियाणे तयार करतात. त्यातूनही पुरेशी काळजी न घेतली गेल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

 

सोयाबीन उत्पादन घटण्याची भीती

रोगग्रस्त बियाणे तसेच झाडांच्या रोगट कचऱ्याची विल्हेवाट न लावता ते झाडाचे अवशेष तसेच पडून राहिल्यास पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. काही दिवसांनी पानावर काळी सूक्ष्म बुरशीही दिसून येऊ शकते. पिवळा मोझॅक म्हणजे यलो मोझॅक किंवा पीलिया रोग हा विषाणूजन्य रोेग पिकांवरील इतर कोणत्याही रोगांपेक्षा जास्त हानीकारक असतो. त्यामुळे सोयाबीन पीक उत्पन्नात 50 ते 90 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते बियाणे निकृष्ट असल्यास सोयाबीन बियांची उगवण देखील कमी होऊ शकते. सततचा पाऊस, रोगट वातावरण, हिरवी अळी, पानावर ठिबक्यांचा जिवाणूजन्य रोग व रोगट बियाण्यांमुळे हा विषाणूजन्य मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव उद्भवतो.

असे करावे सोयाबीन पीक व्यवस्थापन

पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उत्तम पीक व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारक आणि सहनशील जातींची शक्यतोवर पेरणी करावी. रोगाची लक्षणे असलेली झाडे दिसून येताच त्वरीत उपटून जाळावी, तणाचा बंदोबस्त करावा. खताची संतुलित मात्रा शिफारशीनुसार द्यावी. नत्रयुक्त खतांचा अधिक वापर टाळावा. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि पर्यायाने त्यांच्याद्वारे पिवळा मोझॅक रोगाचा प्रसारही वाढतो. पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींच्या देखरेखीकरता पिवळे चिकट सापळे लावावेत. सुरवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. मावा व पांढरी माशी या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी क्विनॉलफॉस किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के 25 मिली किंवा अ‍ॅसीफेट 75 टक्के 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇

बटाट्याचे 90 दिवसात तयार होणारे वाण विकसित; गहू-तांदूळ हंगामादरम्यान घेता येईल तिसरे पीक

कापसाच्या भावाने पुन्हा गाठला उच्चांक….. हंगामाच्या शेवटी दिवसाकाठी होतेय दरात वाढ

आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती

घरातल्या घरात लॅब उभारून पाच लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या “कॉर्डीसेप्स मशरूम”चे उत्पादन

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Yellow Mosaic Virusकीटकनाशकखरीप हंगामपिवळा मोझॅक विषाणूपीक व्यवस्थापनपीलिया रोगयलो मोझॅक व्हायरससोयाबीनसोयाबीन पेरणी
Previous Post

पिकाच्या नुकसानीमुळे यवतमाळध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; राज्यात महिनाभरात शंभरावर शेतकरी आत्महत्या

Next Post

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 6 ऑगस्टला एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश.. आजच बुकिंग करून व्यवसाय वृद्धीसाठी सज्ज व्हा..

Next Post
अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 6 ऑगस्टला एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 6 ऑगस्टला एकदिवसीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा..; मर्यादित प्रवेश.. आजच बुकिंग करून व्यवसाय वृद्धीसाठी सज्ज व्हा..

Comments 1

  1. Pingback: ऑगस्ट मान्सून Good News : 5 पर्यंत महाराष्ट्रात उघडीप, महिन्याचा पावसाचा अंदाज आयएमडी आज सायंकाळी जाही

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.