हॅपनिंग

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : साखर कारखान्यांचे चांगभले

बुधवार, 6 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. मुख्यत: साखर कारखान्यांचे चांगभले करण्याचे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने ठरविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आजची बैठक पार पडली. यावेळी आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात हे कर्ज पुरविले जाईल, असे मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने कळविले आहे.

आजच्या बैठकीतील इतर महत्त्वाचे संक्षिप्त निर्णय असे –

  • सहकार विभाग : केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
  • महसूल विभाग : मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात
  • नगरविकास विभाग : मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
  • पर्यटन विभाग : मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
  • गृह विभाग : राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ निर्णय कॅबिनेट बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री गण उपस्थित होते.

Related Articles

Back to top button