• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हवामान बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा संकटांची मालिका… ;तर भारत सर्वात पूरग्रस्त देश होण्याच्या उंबरठ्यावर ?

Team Agroworld by Team Agroworld
December 12, 2020
in हॅपनिंग, तांत्रिक
0
हवामान बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा संकटांची मालिका… ;तर भारत सर्वात पूरग्रस्त देश होण्याच्या उंबरठ्यावर ?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी, मुंबई
पर्यावरणविषयक समस्या, हवामान बदल व जागतिक तापमानवाढ हे आता केवळ आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांपुरते विषय राहिलेले नाहीत, तर आपल्या जीवनाची सर्वांगे या समस्यांनी ग्रासली गेली आहेत. दुष्काळाच्या झळा असो. गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान असो. जीवघेणी उष्णतेची लाट असो किंवा आखाती देशातून आलेले धुळीचे वादळ असो. गेली सहा महिने उभा महाराष्ट्र निसर्गातील व ऋतुचक्रातील विविध बदल अनुभवत आहे. ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेने या सर्व चिंतेत भर टाकणारी माहिती दिली आहे. (Council on Energy, Environment and Water) दिलेल्या माहितीनुसार, भारतातील 75 टक्के जिल्ह्यांमध्ये हवामानाचं हे रौद्र रूप पाहायला मिळालं आहे.
महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार..? संशोधनात धक्कादायक खुलासा भारतातील 75 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये एकीकडे विकासाला गती मिळत आहे तर दुसरीकडे चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, उष्णता आणि थंडी यांसारख्या हवामान बदलाचं केंद्र बनत चालले आहेत…      ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेने (Council on Energy, Environment and Water) दिलेल्या माहितीनुसार, भारतातील 75 टक्के जिल्ह्यांमध्ये हवामानाचं रौद्र रूप पाहायला मिळालं आहे. भारतातील 75 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये एकीकडे विकासाला गती मिळत आहे तर दुसरीकडे चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, उष्णता आणि थंडी यांसारख्या हवामान बदलाचं केंद्र बनत चालले आहेत. कारण ऐन थंडीत देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला. यामुळे राज्यावर पुन्हा वादळ येणार का? असा प्रश्न पडला आहे.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हल्लीच्या काही दशकांमध्ये वारंवार (Frequency) अशा नैसर्गिक संकटांची तीव्रता (intensity) आणि अप्रत्याशितता (unpredictability) सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतं. भारतात 1970 आणि 2005 या काळात भारतामध्ये हवामानविषयक 250 घटना घडल्या होत्या. तर बदलत्या हवामानामुळे 2005 मध्येच 310 घटना घडल्या. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, 40 टक्क्यांहून अधिक पूरग्रस्त भागात दुष्काळाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आलं तर याच्या उलट पूर कमी असलेल्या भागात पाण्याच्या पद्धत बदलल्याचं पाहायला मिळालं. हवामान महत्वाकांक्षा शिखर परिषदेच्या (Climate Ambition Summit ) दोन दिवस आधी याविषयी संशोधन सुरू करण्यात आलं होतं.

हवामानातील आपत्तीजनक घटनांमध्ये वाढ

सीईडब्ल्यू (CEEW) इथं झालेल्या संशोधन आणि कार्यक्रमाचं नेतृत्व करणाऱ्या अविनाश मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्याच्या काळात हवामानातील विनाशकारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या 100 वर्षात फक्त 0.6 डिग्री सेल्सियस तापमान वाढलं. गंभीर म्हणजे हवामानातील विनाशकारी बदलांमध्ये भारत जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. तर लवकरच सर्वात पूरग्रस्त देश होण्याच्या उंबरठ्यावर आहे.’

भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हवामानातले सततचे बदल अत्यंत हानिकारक ठरत आहेत. सीईईयू अभ्यासानुसार असं आढळलं की, पूरांच्या घटनांची वारंवारता गेल्या 50 वर्षात जवळपास आठ पट वाढली आहे. इतकंच नाही तर पूर, दरडी कोसळणं, मुसळधार पाऊस, गारपीट, गडगडाट, ढगफुटी यासंदर्भातील घटनांमध्ये 20 पट वाढ झाली आहे.

19 दशलक्षाहून अधिक लोक पूरात सापडले

2005 पर्यंत पूरग्रस्त जिल्ह्यांची वार्षिक सरासरी 19 इतकी होती. पण 2005 नंतर ती 55वर पोहोचली. 2019 मध्ये भारतात 16 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला होता. तर आता भारतात 97 दशलक्षाहूनही जास्त लोक पुरात बुडाले आहे. बारपेटा, दारंग, धेमाजी, गोलपारा, गोलाघाट, शिवसागर हे जिल्हे गेल्या काही दशकात भारतातील सर्वात जास्त बाधित आठ जिल्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातही चक्रीवादळ आणि पुराचे रौद्र रुप पाहायला मिळते. निसर्ग चक्रीवादळासारख्या आसमानी संकटामुळे राज्याला मोठा फटका बसला. तर मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचाही फटका बसला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Council on EnergyEnvironment and Waterउष्णता आणि थंडीचक्रीवादळंदुष्काळनिसर्गपूरमहाराष्ट्रसीईडब्ल्यू (CEEW)
Previous Post

उत्तर महाराष्ट्रात गारपीटचा धोका

Next Post

सफरचंदाची शेती

Next Post
सफरचंदाची शेती

सफरचंदाची शेती

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish