प्रतिनिधी/ औरंगाबाद
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील सभागृहात ६ जुलै रोजी 69 व्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार बैठकीचे आयोजन केले होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने कुलगुरु मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ दत्तप्रसाद वासकर (संचालक संशोधन) ,डॉ देवराव देवसकर (विस्तार संचालक), डॉ डी एल जाधव (विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद) लातूर प्रतिनिधी श्री संतोष आळसे , डॉ सूर्यकांत पवार (कार्यालय प्रमुख) या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले की गेल्या वर्षभर आपण ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहोत, पण एक खंत लागून राहिली होती की एखाद्या बैठकीच्या निमित्ताने कृषी विद्यापीठ व कृषी विभाग प्रत्येक्षात उपस्थित राहून मराठवाड्याच्या शेतीसाठी आवश्यक ती चर्चा करून ती उपयुक्त चर्चा शेतकऱ्यांपर्यंत जावी. याहेतूने सध्याच्या वेळेचे बंधन असूनही आपण सर्व एकत्रित येऊन गेल्या वर्षभरातील प्रत्याभरण आपण या ठिकाणी मांडण्यात याव्यात त्यास कृषी विद्यापीठाचे शास्रज्ञ समर्पक उत्तरं देतील.
गेल्या वर्षभरात देशात व राज्यात आपण सर्व एका संकटाच्या छायाखाली वावरत आहोत पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे , अन्नधान्य या काळात शहरात अडकून राहिलेल्या लोकांना कृषी विभागाच्या मदतीने हे पोहच झाले. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले आणि गरजूंना हे सर्व लॉकडाऊन काळात मिळाले हे मोठे उल्लेखनीय कार्य कृषी विभागाने केले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आजवर अनेक शेतकरीभिमुख उपक्रम मागील काळात राबविले आहे. परंतु यात नव्याने बियाणे विक्री उपक्रम मागील तीन वर्षांपासून राबवत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी खरीप व रब्बी हंगामात विद्यापीठाचे सुधारित बियाणे उपलब्ध करून दिल्याने त्या तंत्रज्ञानचा लाभ शेतकऱ्यांना झाला असून, यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. आम्ही ठरवले आहे जी जैविकखते व बुरशीनाशकांची उत्पादन परभणी मुख्यालयी होतात ती सर्व ज्यात्या जिल्ह्याच्या ठिकाणी निर्मिती करून शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत झाली पाहिजे पीक संरक्षण या विषयावर शेतकऱ्यांचा जास्त खर्च तो निश्चित कमी होण्यास मदत होत आहे.
विद्यापीठाचा उद्धेशच शेतकरी उतपादन खर्चात बचत करणे होय
डॉ दत्तप्रसाद वासकर, संचालक संशोधन म्हणाले की कृषी विद्यापीठ सातत्याने संशोधन करून शिफारशी देत आहे पण काळानुरूप हे संशोधन शेतकऱ्यांना अधिक सोयीचे होण्यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत सोयाबीन पिकाचे उदाहरण द्यायचे झाले तर विद्यापीठ 26 किलोची बॅग प्रति एकर पेरणीसाठी वापरावे पण बिबीएक द्वारे 22 किलो लागते आणि शेतकरी आता टोकन द्वारे लागवड करत आहे त्यासाठी एकरी 12 किलो बियाणे लागते यामुळे विद्यापीठ शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊनच तसे तंत्रज्ञान विद्यापीठ प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहे.
डॉ देवराव देवसकर, संचालक विस्तार शिक्षण म्हणाले की शेतकरी हाच खरा प्रयोगशील आहे अनेक प्रयोग शेतकरी स्वतःच्या शेतात राबवित असतात त्यांची नोंद विद्यापीठ घेत असते. विद्यापीठ ,शेतकरी आणि कृषीविभाग यांच्या एकत्रित विस्तार कार्यातून जे चांगले तंत्रज्ञान नजरेत येते तेच पुढे इतर शेतकऱ्यांना आग्रहाने सांगितले जाते आपण सर्व एकत्रित विस्तार कार्य करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू.
डॉ डी एल जाधव विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद म्हणाले, की विद्यापीठ तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान कृषिविभाग शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक वर्ष हे भिन्न आहे पाऊस ऊन कमी-अधिक असते अशा परिस्थितीत सामोरे जाताना बऱ्याच वेळेस अनेक समस्या येत असतात. परन्तु मराठवाड्यात विद्यापीठ व कृषी विभाग एकत्रित समजून उमजून कामे करत असल्याने त्या समस्या सोडनविण्यास यश येत आहे.
या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते विद्यापीठाच्या वतीने सोयाबीन पैदासकर, तूर पैदासकर यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पीक संशोधन करणारी कृषी शास्त्रज्ञ उपस्होथित होते.
या बैठकीचे प्रस्ताविक डॉ एस बी पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ नितीन पतंगे यांनी केले
या बैठकीच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांच्या हस्ते काही उदघाटन कार्यक्रम संपन्न झाले व प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम ही पार पडला.