• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 13, 2020
in तांत्रिक
1
सोयाबीन लागवड तंत्रज्ञान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १०० च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात . सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते . तर पाश्चात्य देशामध्ये या पिकास कामधेनु तर चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते.

सोयाबीनची कमी उत्पाद्कता असण्याची प्रमुख कारणे…
आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
सुधारीत जातींचा वापर न करणे
दर हेक्टरी झाडांचीसंख्या न राखणे
बीजाक्रिया न करण, उगवणशक्तीची तपसणीं न करणे
योग्य खत मात्रांचा शिफारशीनुसार वापर नकरणे
तण तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
आंतरपीक पद्धतींचा वापर न करणे
सोयाबीनच्या उत्पाद्न वाढीसाठी महत्वाच्या बाबीजमीन
उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते . हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या आसपास आणि विद्युतवाहकता ४.० डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते .

हवामान
उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.

उगवणशक्ती कमी होण्याची कारणे
सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षाच्यावर साठवणूककेलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवायपेरणीस वापरू नये.
कडक उन्हात बियाणे वाळवून साठवल्यास उगवणशक्तीकमी होते.
मळणीयंत्राची गती ४००. आर.पी.ए. च्यावर असल्यास बीयातील अंकुरास धक्का लागतो व त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो.
साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते .म्हणून जास्तीत जास्त ५ पोत्यांची थप्पी असावी .
कालावधी – खतांची मात्रा व वेळेवर पूस असल्यास पिक ९० ते १०० दिवसात तयार होते.

सुधारित वाण
एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४ ,एम.ए.सी.एस.४५०,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी (डी.एस.२२८),फुले अग्रणी ,जे.एस.९३-०५ ,जे.एस ९७-५२ , जे.एस ९५-६० ,एन.सी.आर ३७ एम.ए.यु.एस.-४७ , एम.ए.यु.एस.-६१,एम.ए.यु.एस.६१-२, एम.ए.यु.एस.-७१,एम.ए.यु.एस.-८१, एम.ए.यु.एस.-१५८,जे.एस.३३५, टीए.एम.एस.९८-२१

बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया
उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.

पेरणी
सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

खत व्यवस्थापन
सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.
पेरणीपूर्व
फ्लुक्लोरॅलीन १ कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन १ कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक ६०० ते ७०० लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.

उगवणपुर्व
(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा मेटॅलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा पेंडीमिथेंलीन १ किलो क्रियाशील घटक /हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.

पेरणीनंतर तण उगवल्यानंतर
क्रिझॅलोफॉल इथाईल ५० ग्रॅम किलो क्रियाशील घटक /हेक्टरद पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
इमॅझीथायपर १o टक्के एस.एल. १00 ग्रॅम केिली क्रियाशील घटक /हेक्टर पेरणीनंतर १५-२० दिवसांनी हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
आंतरपीक पद्धतीचा वापर करणे
कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

बेभरवशाचे तसेच कमी पर्जन्यमान व ज्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकत नाही अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीपासून शाश्वत व स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते.
प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्याही एका पिकाचे उत्पन्न हमखास मिळते.
आंतरपिकात सोयाबीनसारख्या द्विदलवर्गीय पिकाचा समावेश असल्यास हवेतील नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.
आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. तसेच रोग व किडींचे प्रमाण कमी आढळून येते.
जनावरांकरिता सकस चारा उपलब्ध होतो.
आंतरपिकातील सोयाबीन सारखे नगदी पीक शेतक-यांच्या आर्थिक अडचणी दूर करु शकते.
तूर + सोयाबीन सारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास देशातील डाळ व तेलवर्गीय पिकांचे उत्पादन वाढून तेल व डाळीची कमतरता भरून निघेल.
आंतरपीक पद्धती
तूर + सोयाबीन (१:२)
कपाशी + सोयाबीन (१:१) .
सोयाबीन + भुईमूग (१४, १:६) .
सोयाबीन + ज्वारी (१:२, २:२) .
सोयाबीन + बाजरी (२:४, २:६)

सौजन्य:- महाराष्ट्र शासन(कृषी विभाग)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

मान्सून 2 दिवसात महाराष्ट्र व्यापणार; परभणीत 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Next Post

विदर्भ व मराठवाड्यात मान्सूनची धडक

Next Post
विदर्भ व मराठवाड्यात मान्सूनची धडक

विदर्भ व मराठवाड्यात मान्सूनची धडक

Comments 1

  1. Prakash Rathod says:
    5 years ago

    Farmer

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish