प्रतिनिधी/नांदेड
देश आपल्याला काय देतो या पेक्षा आपण देशाला काय देऊ शकतो हा विचार सर्वप्रथम ठेवला पाहिजे. असाच लोकसेवेचा उदात्त विचार घेऊन बियाणे उद्योगातील अग्रगण्य श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनी द्वारे कोवीडमध्ये “बायोसीड GHH029 सर्वात वजनदार कापूस शेतकरी सेवा सर्वप्रथम” अभियान राबविण्यात येत आहे. कोरोना महामारीमध्ये काळजी हाच उपाय असून समृद्ध देश उभारणीसाठी शेतकरी सुदृढ आणि निरोगी राहणे गरजेचे आहे. यासाठी आत्तापर्यंत बायोसीडतर्फे 21000 गावातील तीन लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना मोफत मास्क वाटप व कोरोना काळात घ्यावयाच्या काळजी या बाबतीत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
बियाणे उद्योगातील अग्रगण्य श्रीराम बायोसीड जेनेटिक्स द्वारे कोवीडमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कंपनीचे महाराष्ट्र राज्य विपणन विकास व्यवस्थापक विशाल राजेभोसले यांनी “बायोसीड GHH029 सर्वात वजनदार कापूस शेतकरी सेवा सर्वप्रथम” उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की महाराष्ट्रातील 21 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 100 तालुक्यातील 21000 गावांत बिकट कोवीड काळात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या “बायोसीड GHH029 सर्वात वजनदार कापूस शेतकरी सेवा सर्वप्रथम” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक गावात बायोसीड विभागीय विक्री व्यवस्थापक त्यांच्या विक्री अधिकारी व विपणन विकास अधिकारी अशी मोठी साखळी निर्माण करून हे कार्य जानेवारी 2021 पासून राबवित आहे.
आतापर्यंत कंपनीकडून 21000 गावातील तीन लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना मोफत मास्क वाटप व कोरोना काळात घ्यावयाच्या काळजी या बाबतीत विस्तृत मार्गदर्शन व प्रबोधन विक्री अधिकारी ते विपणन विकास अधिकारी अश्या साखळीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात समृद्ध देश उभारणीसाठी निरोगी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही या उपक्रमाची माहिती देतांना विशाल राजेभोसले यांनी यावेळी सांगितले