• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

सफरचंदाची शेती

Team Agroworld by Team Agroworld
December 14, 2020
in इतर, यशोगाथा
0
सफरचंदाची शेती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

     पृथ्वीवर अवतरलेले पहिले मानव अ‍ॅडम आणि इव्ह यांच्या कथेत असलेले सफरचंद आणि ज्यामुळे न्यूटनला गुरुत्वाकर्षण माहित झाले ते सफरचंद, १८६६ मध्ये एका म्हणीच्या स्वरुपात मुद्रित झाले ती म्हण होती “दिवसातून एक सफरचंद खा व  डॉक्टरला दूर ठेवा” असे हे सफरचंद सर्वच सजीव समूहात खालले जाणारे फळ आहे. हे फक्त  भारतातही याचा वापर मोठ्या प्रमाणवर असून, प्रत्येकालाच आजारी असल्यावर लवकर बरे होण्यासाठी किंवा एखद्या रुग्णाला भेट देण्यासाठी सर्व्रथम डोळ्यासमोर येणारे फळ म्हटले की समोर सफरचंद हेच फळ येते. पृथ्वीवर मानवाच्या अस्तित्वापासून आजवर सफरचंद हे आपला गोड-आंबट प्रवास टिकवून आहे.

संपूर्ण आशियात भारत हा विविध ऋतूनी नटलेला निसर्गरम्य वातावरण लाभलेला देश आहे. कृषी हा देशातील प्रमुख बहुताशः लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक राज्यानुसार व वातावरणानुसार शेती पद्धतीत थोडाफार फरक जाणवतो. थोडा फरक सोडला तर बाकी सर्वत्र काही कॉमन पिके घेतली जातात. किंतु काही पिके असे असतात की त्या पिकांमध्ये त्या-त्या प्रदेशाचा एकछत्री अंमल असतो. त्यात सफरचंद  हे अग्रस्थानी आहे. सफरचंद म्हटले की आपणास फक्त आठवणार हिमालयाच्या कुशीतील राज्य. त्यातही जम्मू काश्मीर हे नाव अग्रस्थानी आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून सफरचंद हे फळ मानले जाते.  मधुर, आंबट चवीचे सफरचंद हे बऱ्याच अंशी पूर्ण असल्याने आरोग्यसंरक्षक फळ मानले गेले आहे. ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’ हे बोधवाक्य सफरचंदाची महती विशद करते.  सफरचंद हे रोझेसी कुळातील फळ असून मूळचे पूर्व युरोपातील आणि पश्चिम आशियातील आहे. भारतात सफरचंदाचे उत्पादन मुख्यत्वे करून काश्मीर, कुलू-मनाली या थंड व डोंगराळ प्रदेशात घेतले जाते

काश्मीरची शेती

देशातील बहुताशः राज्यांप्रमाणेच कृषी व पर्यटन हा जम्मू काश्मीरच्या बहुताशः लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीखाली ८·६७ लाख हेक्टर जमीन असून त्यातल्या १·७५ हेक्टरवर एकाहून अधिक पिके निघतात. राज्य उत्पन्नाचा ३०% वाटा शेती उत्पादनाचा आहे. डोंगरी प्रवाह सतत नवा गाळ आणून जमिनीचा कस वाढवत असल्याने जमीन सुपीक आहे. मोठ्या प्रमाणात सरोवरे असल्याने सरोवरांच्या पाण्याखालील वनस्पती काढून त्याचा वापर गुरांना चारा म्हणून करण्यात येतो. काही ठिकाणी सरोवरांच्या पृष्ठभागांवर तराफे बांधून त्यांवर दलदलीतील ढेकळे व गवत बसवून केलेल्या तरंगत्या शेतांतून कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, नवलकोल, मिरची, गाजर, मुळा, काकडी इ. भाज्यांचे उत्पादन करण्यात येते.
फळबागा हे काश्मीरच्या कृषिव्यवसायातील महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. १९७२–७३ मध्ये फळबागांखालील क्षेत्र ५६,७०० हे. होते व तेव्हा या राज्यातून १·५५ लाख टन फळे निर्यात झाली होती. भारतात सध्या सफरचंद उत्पादन दरवर्षी सुमारे 20 लाख टन पेक्षाही जास्त होते. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वाधिक सफरचंद उत्पादक राज्ये आहेत. त्यांचा उत्पादनातील वाटा  अनुक्रमे ७० %, २१.%%, .६.४% आणि १.६% भाग आहेत. आता मिझोरम, सिक्कीम, तामिळनाडू आणि नागालँडमध्येही सफरचंद लागवडीसाठी तयार होत आहेत.
एकूण फलोत्पादनपैकी ताज्या फळांत सफरचंद व सुक्या फळांपैकी जर्दाळू व अक्रोड ही निर्यातीत जास्त असतात. केशराचे उत्पादन मात्र त्यातुलनेत अल्प प्रमाणात होते. नद्या-तळ्यांतून मच्छीमारी चालते. लडाख, गिलगिट व बल्टिस्तान या प्रदेशांत याक, मेंढ्या, बकऱ्या व तट्टांचा सांभाळ केला जातो. उंच पर्वतप्रदेशात ऋतुमानाप्रमाणे कळपांबरोबर गवताळ माळराने शोधीत हिंडणारे स्थलांतरी भटके मेंढपाळ असतात. कथुआ, जम्मू, उधमपूर, राजौरी या भागांत गाई म्हशी पाळतात, तर हा भाग आणि लडाख सोडून इतर भागांत गाई व मुख्यतः शेळ्या-मेंढ्या पाळतात. कुक्कुटपालन व मत्स्योद्योगही आता विकास पावत आहेत.
सफरचंद हे एक सर्वत्र मागणी असलेले आणि जगातलं चौथ्या क्रमांकाचे मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाणारे फळ आहे. ह्या फळाला लागवडीसाठी चिकट तसेच जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ असणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन या फळाला उपयुक्त आहे. सफरचंदाची लागवड करण्यासाठी तापमान सरासरी २१ ते २४ अंश असणे गरजेचे आहे. ह्या पिकाला चांगली फुल आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे १०० ते १२५ सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे. गोल्डन डिलिशिअस, रेड जू, लाल अम्ब्री इत्यादी (हर्मन-९९ ही जात महाराष्ट्रात) लागवड केली जाते.

भारतातील सफरचंद लागवड
Production(000 Tonnes)
2017-18
क्र. राज्य उत्पादन वाटा(%)
1 Jammu & Kashmir 1,808.33 77.71
2 Himachal Pradesh 446.57 19.19
3 Uttarakhand 58.66 2.52
4 Arunachal Pradesh 7.35 0.32
5 Kerala 4.00 0.17
6 Nagaland 1.99 0.09
7 Tamil Nadu 0.01 0.00
  Page Total 2,326.91  
Source: National Horticulture Board (NHB)

 

लागवड
सफरचंद या फळाची रोपे कलम करून तयार केली जातात ह्याची लागवड साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये केली जाते. फळांची जात आणि मातीची क्षमता या वर दोन झाडांमधील अंतर अवलंबून आहे. झाडांची संख्या रोपे लागवडीच्या घनतेवर आधारित आहे.  रासायनिक खतांबरोबर या झाडाला प्रति वर्षी १० किलो शेणखत द्यावे लागते. रासायनिक खतांची मात्रा मातीच्या परिक्षणावर अवलंबून असते तरीही साधारण ३५० ग्रॅम नत्र, १७५ ग्रॅम स्फुरद आणि ३५० ग्रॅम पालाश पूर्ण वाढलेल्या झाडाला दिले जाते. उन्हाळ्यामध्ये झाडाला ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याची गरज भासते. फळ धारणा झाली की साधारणपणे आठवड्याने झाडाला पाणी दिले जाते. वेगवेगळ्या हंगामानुसार या फळावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या पिकावर कोलार रॉट, अँपल स्कॅब, या सारखे रोग पडतात, या वर मॅनको झेब, कार्बेन्डाझिम असेच इतर बुरशी नाशकांची फवारणी योग्य पद्धतीने घेऊन रोग नियंत्रण करता येते.

उत्पादन
लागवडी पासून ४ वर्षाने झाडास फळे येण्यास सुरवात होते. साधारण बहार आल्यानंतर १३० ते १४० दिवसांपर्यंत फळे काढणीस तयार होतात. एका चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या झाडापासून साधारण १० ते १२ किलो फळे प्रति वर्षी उपलब्ध होतात. त्यामुळे सफरचंद हे तेथील अर्थकारणात बरेच बदल करून जाते.

राष्ट्रीय फलोत्पादन विभाग आता या फळाच्या वाढीसाठी प्रयत्नशील असून वरील दोन्ही राज्याव्यातिरिक्त आता विविध ठिकाणी लागवडीसाठी आग्रही आहे. त्यात अरुणाचल प्रदेश हे सफरचंद लागवडीसाठी एक आदर्श ठिकाण असल्याचे दिसून आले आहे. या राज्यात उच्च उत्पादन देणारे वाण बाजारात आणले गेले तर ते पूर्वोत्तर बाजारांच्या अंतर्गत मागणीची पूर्तता करण्याबरोबरच सध्या भूतानवर अवलंबून असलेल्या बांगलादेशात उत्पादन निर्यात करून मोठी प्रगती निर्यातीच्या बाबतीत देश करू शकेल. एनएचबी आणि राज्य सरकार तसा प्रयत्न करत आहेत. सफरचंद उत्पादक राज्यांमधील उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानासाठी एनएचबी सर्वोतोपरी मदत करत आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे लागवड वाढली आहे.
राज्य                                            वाढणारी बेल्ट

जम्मू आणि काश्मीर                       श्रीनगर, बडगाम, पुलवामा, अनाटनाग, बारामुल्ला, कुपवाडा

हिमाचल प्रदेश                             शिमला, कुल्लू, सिरमौर, मंडी, चंबा, किन्नौर

उत्तरांचल                                 अल्मोडा, पिथौरागड, टिहरी गढवाल, उत्तरकाशी, चमोली, देहरादून, नैनीताल

अरुणाचल प्रदेश                            तवांग, वेस्ट कन्नेंग, लोअर सुबानसिरी

 

सफरचंदाच्या राज्यातील फलोत्पादन विभागासह  तंत्रज्ञानाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे आहेत

(i) हिल कॅम्पस, राणीचौरी, जी.बी. पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, टिहरी गढवाल, उत्तरांचल.

(ii) फलोत्पादन व खाद्य प्रक्रिया विभाग, उदयन भवन, चौबटिया, रानीखेत, अल्मोडा – 263651, उत्तरांचल.

काश्मीर ते महाराष्ट्र सफरचंदाचा प्रवास

सफरचंद म्हटलं की पटकन कोणाच्याही डोळ्यासमोर उभं राहतं ते काश्मीर. मात्र आता राज्यातील (महाराष्ट्रातील ) शेतकरी देखील सफरचंदाची लागवडकरत आहेत नाशिक व पुणे जिल्ह्यात अशी यशस्वी लागवड झाली आहे. शिरुर तालुक्यातील मुखई येथील अभिजीत प्रल्हाद धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड करुन दाखवली. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या हर्मन-99 या जातीच्या सफरचंदाला सध्या तिसऱ्याच वर्षी चांगली फळे लागली आहेत.
शिक्रापूर जवळच असलेल्या मुखई येथील अभिजित व अतुल या बंधूनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करत प्रयोगशीलता जपली आहे. ऊस शेतीमध्ये त्यांचे लक्षणीय कार्य आहे. २०१७ मध्ये त्यांनी सफरचंद शेतीबाबत माहिती काढली आणि थेट काश्मीर मधील शेतकऱ्यांना संपर्क करून बरीचशी माहिती जमा केली. विविध माध्यमातून माहिती जमा केल्यांनतर त्यांनी हर्मन-९९ हा सफरचंदाचा वाण लागवडीसाठी निवडला. १२ X १२ फुट अंतरावर पुन एकरात त्यांनी प्रायोग म्हणून २०० झाडांची रोपांची लागवड केली. आपल्या नेहमीच्या पिकांप्रमानेच त्यांनी या पिकांची देखभाल केली. इतर कोणतीही अतिरिक्त मेहनत करावी लागली नाही. त्यांना मिळालेल्या यशाने व अनुभवाने नक्कीच या भागातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

आशियातील सर्वात श्रीमंत गाव
        देशात प्रामुख्याने हिमाचल प्रदेश व काश्मीर या राज्यात मोठ्या प्रमाणात सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. परंतु आर्थिकदृष्ट्या काश्मीरमधील गावांपेक्षा हिमाचल प्रदेशची गाव सरस असल्याचे दिसून येते. सफरचंदामुळे हिमाचलमधील मडावग गाव सर्वात श्रीमंत गाव; ठरले आहे. दर्जेदार सफरचंद उत्पादनातून सर्वांचेच उत्पन्न ७० लाखांहून अधिक असणारे हे गांव आहे. मडावग (हिमाचल प्रदेश) – सिमल्यापासून ९२ किमी अंतरावर ७७७४ फूट उंचीवर वसलेले मडावग या गावात ना कुणी उद्योगपती आहे, ना मोठ्या कंपन्यांत उच्च पदांवर काम करणारे लोक. तरीही हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत समाविष्ट आहे. येथील प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक पाऊन कोटी रुपये आहे.
शेतकऱ्यांनी सफरचंदाच्या फळबागांमध्ये केलेल्या कष्टाचे हे गोडफळ त्यांना आता मिळत  आहे. १८०० लोकसंख्या असलेल्या या गावांत यंदा ७ लाख पेटी सफरचंद पिकतील, अशी आशा आहे. हे सफरचंद देशातील सर्वांत उत्तम प्रतीचे आहेत. रॉयल अॅपल, रेड गोल्ड, गेल गालासारख्या जाती शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. गावात ८०च्या दशकापर्यंत सफरचंद नव्हतेच. १९९० मध्ये हिरासिंह या शेतकऱ्याने प्रथम सफरचंदाच्या रोपांची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण गाव सफरचंदाचे उत्पादन घेऊ लागले. हिरासिंह सांगतात, आज मडावग पंचायतमधून १२ ते १५ लाख पेटी सफरचंद दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यात होतात. हे उत्पादन बाजारपेठेपर्यंत जावे म्हणून लोकांनी या गावात स्वत: १० किमी रस्ता तयार केला.  या पिकांमुळे लोकांच्या अर्थकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून मडावग गावात आलिशान इमारती दिसतात.
गारपीट, बर्फवृष्टीपासून बचावासाठी गावकरी वर्षभर बागांची विशेष काळजी घेतात. येथे चांगली बर्फवृष्टी होत असल्याने दर्जेदार सफरचंद येथे पिकतात. ते लवकर खराब होत नाहीत. लोकही सफरचंदाच्या बागांची देखभाल अगदी मुलांसारखी करतात. थंडीच्या काळात दिवसरात्र हे लोक बागांत असतात. शून्य अंश तापमानात हे लोक झाडांवरील बर्फ काढण्यात व्यग्र असतात. बर्फामुळे झाडांच्या फांद्या तुटू शकतात. म्हणून ही काळजी घेतली जाते. एप्रिलपासून ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पीक तयार होते. यादरम्यान गारपीट झाली तर फळांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून बागा जाळ्यांनी झाकल्या जातात. नोव्हेंबर ते मार्चदरम्यान बागांमध्ये फवारणी, खत दिले जाते. मडावगच्या सफरचंदांचा आकार खूप मोठा आहे. त्यामुळे त्याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे.


इतिहास
सफरचंद हे जगात लागवड केलेल्या सर्वात जुन्या फळांपैकी एक आहे. मूळत: मालुस सिव्हर्सी घराण्याचा वंशज असलेले  सफरचंद प्रारंभी मध्य आशियात वाढले होते. ४००० वर्षापूर्वीचा इतिहास असलेले हे फळ फक्त युरोप मध्येच होते, नंतर इ.स.१०६६ ला त्याचा प्रवास इंग्लंड पर्यंत झाला. काळासह, लोकांमध्ये सफरचंद फळांच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी जागरूकता झाली आणि गुलाब कुटुंबातील सदस्य असलेले सफरचंद जगभरात एक आवडते फळ बनले. चीन, यू.एस., रशिया, जर्मनी, तुर्की, पोलंड, इटली, इराण, नेदरलँड्स आणि भारत यासह जगातील विविध भागात मोठ्या प्रमाणात याचे पीक घेतले जाते. सफरचंदांमध्ये विविध प्रकारचे वाण येतात, जसे की, गाला, रेड डिस्लिझिक, फुजी, ग्रॅनी स्मिथ, पॅसिफिक गुलाब आणि गुलाबी लेडी. त्याची गोड चव आणि पौष्टिकता व नफ्यामुळे जगातील सर्वाधिक लागवड केलेल्या फळांमध्ये हे स्थान आहे.
सुरुवातीला हे फळ कझाकस्तान आणि चीनमध्ये सफरचंद खूप लोकप्रिय होते, त्यांनतर त्याचा प्रचार युरोपियन लोकांनी व्हर्जिनिया आणि नैऋत्येकडील देशात केला. या फळाला सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व आहे. ख्रिश्चन परंपरेनुसार, इव्हने आदामाला तिच्याबरोबर एक फळ सामायिक करण्याचा आग्रह केला, ते सफरचंद होते. तेव्हापासून सफरचंद मोह, ज्ञान आणि पापाचे प्रतीक मानले गेले. दुसरीकडे, प्राचीन ग्रीक शास्त्रवचनांनी या फळांना सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून सूचित केले. तत्सम ग्रंथांमध्ये सफरचंदांच्या रसाच्या फायद्यांविषयी देखील चर्चा आहे ज्यामुळे त्या-त्या काळातल्या विविध ग्रंथातील संदर्भानुसार या फळाच्या वापराचा संदर्भ व महत्व स्पष्ट होते.
भारतात आयुर्वेदिक विविध ग्रंथात सफरचंद सदृश फळाचा उल्लेख व वापर असल्याचे सांगितलं आहे. विविध लोककथांमध्येही सफरचंदाचा उल्लेख असल्याने भारताला हे फळ इंग्रजांच्याही आधी माहिती आहे, तरी ब्रिटीशांच्या म्हणण्यानुसार त्यांनी १८५० साली हिमाचलच्या कुलू भागात याची लागवड करून देशाला या फळाची ओळख करून दिली. त्यांनतर हिमाचलमधील कॅप्टन आर.सी.ली यांनी १८५७ ला कुलू जिह्यातील बंडरोल येथे व्यावसायिक लागवड केली असल्याचे सांगण्यात येते.

सफरचंदबाबत रोचक गोष्टी
जगभरात सफरचंदाच्या जवळपास ८००० हजार विविध जाती आहेत.

सर्वात जास्त सफरचंद लागवड ही अमेरिकेत होते.

एकट्या यू.एस. मध्ये 2500 पेक्षा जास्त वाण वाढतात.

सरासरी सफरचंदाचे झाड 100 वर्षांपर्यंत जगते.

डॉक्टरला दूर ठेवण्यासाठी दिवसातून सफरचंद खाण्याची म्हण 1866 मध्ये वेल्स येथे उगम झाली.
मूळ म्हण अशी आहे: “झोपायला जातांना एक सफरचंद खा, आणि डॉक्टरांना भाकरी मिळण्यापासून तुम्ही रोखू शकता.” (“Eat an Apple on going to bed, and you’ll keep the doctor from earning his bread.”)

अमेरिकेतील प्रसिद्ध पेय अॅपल सायडर बनविण्यासाठी (१ गॅलन) ३६ सफरचंद लागतात.

सफरचंद आणि प्रेम यांचे जुने नाते आहे. प्राचीन ग्रीसमध्ये सफरचंदाद्वारे पुरुष स्त्रियांवरील प्रेमाचा दावा करतात. एखाद्या महिलेकडे फेकलेले सफरचंद तिने पकडले तर तिचा प्रस्ताव हो असा मानतात.

जगातील उत्पादनापैकी फक्त २.०५ % उत्पादन भारतात होते त्यापैकी १.६% उत्पादन निर्यात होते.

सफरचंद हे केवळ काश्मीरसारख्या थंड हवेच्या प्रदेशात होत असल्याने संपूर्ण देशात याचे वितरण होईपर्यंत ते टिकविणे आवश्यक असते. म्हणून झाडावर फळे लागल्यापासून ते बाजारातून आपल्या घरी येईपर्यंत त्यांच्यावर अनेक औषधींचा, कीटकनाशकांचा फवारा मारला जातो. हे फवारे आपल्या शरीरासाठी हानीकारक असतात. म्हणून सफरचंद हे सुरुवातीला शाम्पू किंवा रिठय़ाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यानंतर साध्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत.  सकाळी स्वच्छ पुसून त्यानंतर सफरचंद खावीत. तसेच सफरचंद न कापता संपूर्ण खावे आणि कापलेच तर जास्त वेळ ठेवू नये.


औषधी गुणधर्म   व उपयोग
          सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषणमूल्ये असतात.  यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात.  तसेच तंतुमय भाग, प्रथिने व आद्र्रता हे घटकही असतात.  मधुर आंबट चवीचे सफरचंद पिकताना त्यातील आंबटपणा कमी होऊन गोडवा वाढतो. यात मॅलिक अ‍ॅसिडचे प्रमाण आधिक असून ते शरीराच्या चयापचय क्रियेस उपयोगी पडते. तसेच यामध्ये पेक्टिन हा महत्त्वाचा औषधी घटक असतो.  काही आजारांमध्ये शरीरात अनेक विषद्रव्ये निर्माण होतात. ही अपायकारक विषद्रव्ये शरीराबाहेर काढून त्यांचा निचरा करण्यासाठी व विषद्रव्याची तीव्रता कमी करण्यासाठी गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड लागते. ते सफरचंदाच्या गरामध्ये असते म्हणून सफरचंद खाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अनेक जणांना सफरचंदचा गर खूप आवडतो.  म्हणून ते साल काढून खातात, परंतु अशा प्रकारे साल काढलेल्या सफरचंदाचे पोषणमूल्य कमी होते.  कारण ही साल व तिच्या लगतचा गर यात आतील गरापेक्षा जास्त प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते.  तसेच आतील गराच्या पाचपट ‘अ’ जीवनसत्त्व सालीमध्ये असते.
आयुर्वेद शास्त्रानुसार अनेक आजारांमध्ये पथ्यासाठी सफरचंदाचा उपयोग करावा. सफरचंद हे रक्तशुद्धीकारक, पित्तशामक, वायुनाशक व श्रमहारक आहे. मधुर आम्ल चवीचे, शीत, रुचकर व पौष्टिक गुणधर्माचे असल्यामुळे अतिसार, प्रवाहिका, अजीर्ण, मलावष्टंभ, जीर्णज्वर, अरुची, अशक्तपणा, डोकेदुखी, स्थौल्य, विस्मरण, यकृतवृद्धी, मूतखडा, जीर्णकास तसेच वातविकारांमध्ये सफरचंद हितकर आहे. रुग्णांना आजारपणामध्ये इतर कोणताही आहार देण्यापेक्षा सफरचंद किंवा त्याचा रस दिल्यास काही दिवसांतच त्याची प्रतिकारशक्ती वाढून सर्व विकार दूर होतात.  त्याचा अशक्तपणा दूर होऊन ऊर्जानिर्मिती होते व उत्साह संचारतो.
० सफरचंद नियमित खाल्ल्याने दातावरचे किटण जाऊन दात स्वच्छ होतात. सफरचंद चांगले बारीक चावून खाल्ल्याने तोंडातील व दातामधील जंतूंना आळा बसतो व त्यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे दातांबरोबरच हिरडय़ांचेही आरोग्य चांगले राहते. सफरचंदाच्या सेवनाने हिरडय़ा मजबूत होतात.  तसेच तोंड स्वच्छ करण्याचा गुणधर्म सफरचंदामधील अन्नघटकांमध्ये असतो.  म्हणून दातांच्या तक्रारींवर सफरचंदाचा वापर नियमित करावा.
०  लहान बालकांची शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होण्यासाठी रोज एक सफरचंद खावे. ज्ञानतंतूच्या आणि मेंदूच्या वाढीसाठी सफरचंद उत्तम फळ आहे.
० सफरचंदातील आम्लतेमुळे सांधेदुखी, गुडघेदुखी हे विकार कमी होतात.
० सफरचंदामध्ये पोटॅशिअम आणि फॉस्फरस हे क्षार विपुल प्रमाणात असतात. अन्नातून पोटॅशिअम पुरेशा प्रमाणात ज्यांना मिळते अशा व्यक्तींना सहसा हृदयविकार होत नाही.  सफरचंदातील ‘क’ जीवनसत्त्व व पेक्टिनमुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होऊन रसरक्त पुरवठा सुरळीत होतो.
० कोरडय़ा खोकल्याची ढास लागत असल्यास काही दिवस रोज गोड सफरचंदाचा गर व मध यांचे मिश्रण खावे.
० सफरचंद नियमित खाल्ल्याने मूतखडा विरघळून लघवीवाटे बाहेर पडतो.
० सफरचंदाची साल किंचित उकडवून चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या कमी होऊन त्वचेची कांती वाढते.
० अतिसार, प्रवाहिका, आमांश या आजारांमध्ये सफरचंदामध्ये असणाऱ्या गॅलॅक्टुरॉनिक अ‍ॅसिड व मॅलिक अ‍ॅसिडमुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालते, तसेच नसíगक पेक्टिनमुळे आतडय़ाच्या आतून संरक्षक थर तयार होतो.  याकरिता या आजारांमध्ये सफरचंदाचा गर त्यात जिरे व दालचिनी पूड व मध मिसळून घ्यावा.
० डोकेदुखी जर तीव्र स्वरूपाची असेल तर आठवडाभर रोज सकाळी एक सफरचंद खावे याने डोकेदुखी थांबते.
० सफरचंदात लोह, आस्रेनिक व फॉस्फरस विपुल प्रमाणात असल्याने अ‍ॅनिमिया या आजारात नियमितपणे रोज एक सफरचंद खावे.
० डोळ्यांची आग होत असेल तर सफरचंद रस कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो बोळा डोळ्यावर ठेवावा.
० स्थूलता कमी करण्यासाठी जेवणाच्या आधी सफरचंद खावे त्यानंतर जेवण करावे. यामध्ये असणाऱ्या अ‍ॅसिडमुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचून स्थूलता कमी होते.
० पंचेंद्रियांसाठी सफरचंद स्फूर्तिदायक आहे. शरीर व मेंदूचा थकवा दूर करण्यासाठी नियमितपणे रोज एक सफरचंद खावे. यामुळे कांती, तेजस्वी होते व बौद्धिक थकवा कमी होतो.
०  सफरचंद हे स्वच्छ धुऊन पुसून, पण न कापता संपूर्ण खावे.  एरवी सफरचंद भाजून उकडून सुकवूनही ते खाता येते. सॅलेड, कोशिंबीर, ज्यूस, जेली, जॅम या स्वरूपातही वर्षभर त्याचा आस्वाद घेता येतो.

( * सफरचंदाचा औषधी वापर करायचा असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून करावा वरील माहिती फक्त आपल्या साठी आहे.)

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अरुणाचल प्रदेशअॅग्रोअॅडम आणि इव्हआयुर्वेदइंग्लंडउत्तरांचलकाश्मीरची शेतीकृषीगढवालगारपीटजम्मू आणि काश्मीरटिहरीफलोत्पादनबर्फवृष्टीमालुस सिव्हर्सीसफरचंदहिमाचल प्रदेशहिरासिंह
Previous Post

हवामान बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा संकटांची मालिका… ;तर भारत सर्वात पूरग्रस्त देश होण्याच्या उंबरठ्यावर ?

Next Post

इतिहास गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १ बाजी प्रभू

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

इतिहास गौरवशाली स्वराज्याचा - पावनखिंड भाग - १ बाजी प्रभू

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.