• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत धीर धरा..! कसा मोजणार पाऊस..?

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2022
in इतर
0
शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको; 100 मिलिमीटर पाऊस होईपर्यंत धीर धरा..! कसा मोजणार पाऊस..?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : शेतकऱ्यांनो, पेरणीची मुळीच घाई करु नका, अजून राज्यातील बऱ्याचशा क्षेत्रात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. राज्य सरकारचा कृषि विभाग व इतर यंत्रणांद्वारे किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस परिसरात झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. हा सबुरीचा सल्ला ऐकला तर दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही.

 


हवामान स्थिती सातत्याने बदलती
दरवर्षी पावसाळा सुरु झाला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु होते. मात्र अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला समोरे जावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठांनीही दिला आहे. गेल्यावर्षी हवामान विभागाचा अंदाज बहुतांश अचूक जुळला. यंदा तर सुरुवातीपासूनच मान्सून प्रगतीवर राहील, 7 दिवस आधीच राज्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, निसर्ग लहरी असतो. मान्सूनचा प्रवास इतर घटक प्रभावित करत असतात. यंत्र व यंत्रणा गेल्या काही तास, दिवसांतील वेध घेऊन अंदाज बांधतात. या सर्व स्थिती सातत्याने बदलत असतात. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून किमान 100 मिलिमीटर पाऊस आल्यानंतरच पेरणी शहाणपणाची ठरते. त्याची ओल जमिनीत टिकते व नंतर थोडीशी ओढ पावसाने दिली तरी पीके तगतात.

 

मान्सूनपूर्व पावसानंतर लगेच पेरणी धोकेदायक
जूनामधील मान्सूनपूर्व पावसानंतरच काही शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. यंदाही काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र, वेळेआधीच येणारा पाऊस बऱ्याच भागात दडी देऊन बसलाय किंवा अजून पुरेसा बरसलेला नाही. त्यात येणाऱ्या काळात पावसाने उघड दिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जाण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी सुरु करु नये, किमान शंभर मिली पाऊस झाल्यावर पेरणीला सुरवात करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

 

100 मिलिमीटर पाऊस मोजायचा कसा?
हा प्रश्न अनेकदा शेतकऱ्यांना पडतो. पूर्वीच्या काळी शेतकरी पिढ्यान् पिढ्या जपलेले काही आडाखे बांधत. हळूहळू ते लोपले. आता शास्त्रीय नोंदींवर अवलंबून राहणेच योग्य ठरेल. पूर्वीच्या तुलनेत कृषी विभाग, सरकारी यंत्रणा, हवामान विभाग अधिक वेगवान, अचूक झालेहेत आणि माहिती मिळविणे सुलभ झाले आहे. सरकारी यंत्रणा पर्जन्यमापक यंत्राचा वापर करून पावसाचे प्रमाण मोजतात. त्यासाठी रेकोर्डिंग व नॉन रेकोर्डिंग पर्जन्य मापक वापरले जाते. नॉन रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधे सोप्पे यंत्र असून याद्वारे निश्चित असे प्रमाण सांगता येत नसले, तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धती भारतात मोठ्या प्रमाणात वापरता येते. या उपकरणाला ‘सायमन्स रेनगेज’ म्हटले जाते. अर्थात या पध्दतीने पाऊस मोजून, पुढे पावसाचा अंदाज जरी बांधत असले तरी. हा अंदाज 100℅ बरोबर येईलच, असे नाही. शेवटी तो निसर्ग आहे. त्यामुळेच अंदाजावर पेरणी करू नये. 100 मिलिमीटर पाऊस आपल्या भागात पडल्यानंतरच पेरणी करावी. अलीकडे मोबाईलवर, टीव्हीवरील बातम्यात, ॲपद्वारे, सरकारी यंत्रणांच्या एसएमएसद्वारे ही अपडेट माहिती सातत्याने आणि सुलभ मिळते. त्यावर आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. त्याच आधारे पेरणीचा निर्णय घ्यावा. घरच्या घरी पाऊस मोजण्यात अनेक तांत्रिक त्रुटी राहू शकतात व अचूकता प्रभावित होऊ शकते.

 

पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्याल..?
शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करताना जमिनीतील ओलावा किती आहे हे पाहावे, नंतरच सुरवात करावी, वाणाची निवड करुन प्रत्यक्ष पेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणी अधिक खोल गेल्यास पाऊस जोराचा आला तर त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर पेरणी करताना पिकांची निवड आणि पेरणीचा काळ याचंही नियोजन करणे गरजेचे आहे. यामध्ये कमी काळाची पिके सुरवातीला पेरली गेली पाहिजेत. यात मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आहे, तर दीर्घकालीन पिकांमध्ये कापूस, तूर अशी पिके आहेत. ती थोडी उशिरा पेरली तरी चालू शकतात, असंही कृषीतज्ञ सांगतात. जमिनीनुसार पिकांची निवड पेरणी करताना भारी जमिनीमध्ये दीर्घकालीन आणि कमी कालावधीची पिके घेता येतात. त्यामुळे आपल्याला दुबार पीक घेता येतं. यामध्ये मूग, उडीद पिके घेतल्यास रब्बी हंगामात ज्वारीसारखे पिके घेता येतात. तर हलक्‍या जमिनीमध्ये कारळ, तीळ, मटकी, हुलगे अशा प्रकारची पिके घेतल्यास पाणी कमी लागते. त्यामुळे जमिनीनुसार योग्य त्या पिकांचे नियोजन शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन केल्यास त्याचा पुढील अनेक दिवस फायदा मिळू शकतो. त्यासाठी योग्य ते नियोजन करत मशागत आणि पेरणी करायला हवी. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रकारानुसार उताराला आडवी पेरणी करावी, तर सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस रुंद वरंबा पद्धतीने लागवड करावी यातून पडणारे पाणी शेतात मुरायला मदत होते, असा सल्ला कृषीतज्ञांनी दिला आहे.

 

वाण निवडताना कोणती काळजी घ्याल..?
वाणांची निवड करताना जमिनीचा प्रकार आणि पाऊस पाणी यांचा विचार करुनच योग्य ते बियाणे खरेदी करावेत. यात कमी कालावधीत आणि मध्यम येणारे बियाणे बाजारात आहेत. योग्य ते मार्गदर्शन घेऊन बियाण्याची निवड केल्यास त्याचा फायदा होतो. पावसाच्या पर्जन्यमानानुसार वाणांची निवड केल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळू शकतो, त्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची बियाणी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी कृषीतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पेरणी आणि पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन, सोबत जमिनीची निवड आणि बियाण्यांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

Agriculture Dept issues Monsoon Preparedness Advisory. Start Kharif sowing only after 100 milimeter rain in your area.

Share this:

  • Facebook
  • X
Previous Post

रानडुक्कर, हरिण, निलगाय, माकड वैगेरे वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपीकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास मिळवा सरकारकडून भरपाई

Next Post

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

Next Post
निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

निम्मा जून सरला तरी निम्म्या राज्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मे क्षेत्रच पेरणीखाली

ताज्या बातम्या

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.