ग्रामीण भागात बहुतेकदा शेतजमिनीवरून वाद होत असतात. समज – गैरसमजातून बांधावरून सुरू झालेले हे भांडण कधी न्यायालयात पोहोचते हे सुद्धा समजत नाही. अशावेळी शेतजमीन अचूक मोजली असेल तर वाद उद्भवण्याचा प्रश्नच रहात नाही. त्यासाठी आता जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून जे अतिशय काटेकोरपणे व तेही अगदी झटपट मोजणी करून देते.
भूमि अभिलेख विभागाकडूनच मोजणी..
जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या (Survey of India) मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग (GPS reading) केवळ ३० सेकंदात घेता येणार आहे.
ईटीएस मशिनच्या साहाय्याने मोजणी
या सुविधेमुळे जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यात मोजणी सुरू केली आहे, तर या तंत्रज्ञानामुळे (technology) पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी केवळ अर्धा तास लागणार आहे. जमीन मोजणीसाठी सध्या भूमि अभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनच्या साहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर जीपीएस रीडिंग (GPS reading) घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते.
कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदात
जीपीएस रीडिंग (GPS readings) घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या (Survey of India) मदतीने कॉर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचा (technology) वापर करण्यास सुरुवात केली आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग (GPS readings) केवळ ३० सेकंदात घेता येते. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी एक दिवस ते चार दिवस लागत होते, ते काम आता अर्ध्या तासात होणार आहे. शिवाय दिवसभरात किमान तीन ते चार मोजणीची कामे पूर्ण करणे शक्य होईल. त्यासाठी संपूर्ण राज्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले आहे.
जीपीएस रीडिंगचे फायदे..
1) कॉर्स स्टेशन सर्व्हे ऑफ इंडियाला (Course Station Survey of India) देशाचा नवीन नकाशासाठी मदत होणार
2) जीपीएस रीडिंग अचूक येणार
3) गतीने मोजणी होण्यास मदत होणार
4) जमिनीचे पोटहिस्से करणे सोपे होणार
5) अनेक जणांना विक्री गैरप्रकाराला आळा
6) चुकीची हद्द दर्शविण्यास आळा बसणार