राज्यातील शेती हि प्रामुख्याने कोरडवाहू असली तरी शासन व शेतकऱ्यांनी त्यामध्ये अमुलाग्र बदल करत पाण्याचा श्रोत तयार केला आहे. परंतु या सिंचनासाठी गरज आहे ती विजेची परंतु शेतकऱ्यांना विजेच्या अनियमिततेचा फटका बसत असतो. यामुळे शेतातील पिके करपून जात असतात परिमाणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून केंद्रसरकारकडून कुसूम योजना चालवली जाते. यामध्ये अपारंपारिक संसाधनांच्या सहाय्याने वीज निर्मितीवर सरकारचा भर दिला जातो. या कुसूम योजनेत सौर उर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे.
केंद्र सरकार अर्थसंकल्पांतर्गत केलेल्या घोषणेप्रमाणे २०२०-२०२१ मध्ये कुसुम योजनेच्या माध्यमातून २० लाख सौरपंपांना अनुदान देणार आहे. यामुळे डिझेल वापराबरोबरच कच्च्या तेलाच्या आयातीसाठी सरकारला करावा लागणारा खर्चही कमी होईल. किसान ऊर्जा सुरक्षा आणि उन्नती अभियान (कुसुम) योजनेंतर्गत केंद्र सरकारने सौर ऊर्जेसह देशभरात सिंचनासाठी वापरलेले सर्व डिझेल / इलेक्ट्रिक पंप चालवण्याच्या दृष्टीने ही योजना आखली आहे.
केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होणार आहे. अतिरिक्त वीज बनवून शेतकरी ती ग्रीडला पाठवू शकतील. या माध्यमातून त्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी केवळ १० टक्के रक्कम द्यावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजनेंतर्गत बँका ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. तर सरकार सौर पंपाच्या एकूण खर्चाच्या ६०% रक्कम अनुदान म्हणून देईल.
शासन निर्णय
राज्यात ‘अटल’ सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री’ सौर कृषीपंप योजना राबविण्यास शासन निर्णय क्र. सौरप-२०१८/प्र.क्र.४०१/उर्जा-7,दि.१५ नोव्हे.२०१८ अन्वये मंजूरी दिली आहे. या योजनेत सौर कृषीपंप ३ वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात आस्थापित करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून पुढील १८ महिन्यात पूर्ण करावयाचा असून प्रथम टप्यात २५,०००० नग सौर कृषीपंप आस्थापनेचे उदिद्ष्ट देण्यात आले आहे.
• पहिला टप्पा – २५००० नग
• दुसरा टप्पा – ५०००० नग
• तिसरा टप्पा – २५००० नग
शासन निर्णय क्रमांक:-सौरप्र-२०१८/प्र.क्र.४०१/ऊर्जा-७ (१५ नोव्हेंबर, २०१८)
शासन निर्णय क्रमांक:-सौरप्र-२०१८/प्र.क्र.४०१/ऊर्जा-७ (०१ जानेवारी, २०१९)
New GR of MSKPY Phase-II & III
अर्ज करण्याची पद्धत
१) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे.
२) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.
४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
६) आता भरलेला फॉर्म https://mnre.gov.in/ सब्मिट करावा लागेल.
योजनेची ठळक वैशिष्टे
• पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे.
• सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश
• या योजनेत सहभागी होण्यासाठी शासन निर्णय व आदेशातील पात्रता अटी व शर्तीनुसार लाभार्थ्यांना भरावयाची रक्कम:
सौरकृषीपंपाचे फायदे
• दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
• दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
• वीज बिलापासून मुक्तता
• डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
• पर्यावरण पुरक परिचलन
• शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
• औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी करणे
सौर पंप ची अवश्यता भरपुर आहे तरी आमचा अजँ करावा
7798172222
मी जयदीप भरतसिंग पाटिल मला सौर ऊर्जेवरचालनारापंप विहिरी वर बसवूईछतो तरी कृपया मदत करावी ही विनंती
Five HP sour uarja pump
Dattusing kisansing Rajput
मला सौर ऊर्जा तंत्रज्ञान कृषी पंप बसवायचा आहे .
मला अनुदाना बाबत माहिती पाहिजे
pam
Farmar