देशाच्या ठराविक भागातील मान्सूनचा जोर सुरूच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान तज्ञांनी बहुतांश विभागात पुढील 2 आठवडे कमी पावसाचे राहतील, अशी शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, राज्यातील 4 जिल्ह्यात आज हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई-ठाणे, पालघरसह सहा जिल्ह्यात ऑरेंज तर विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात आज रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यात रेड अलर्ट दिला गेला आहे. गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. याशिवाय, राज्यातील घाट माथ्यावरील परिसरात आज व उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारातील पश्चिम भागात तसेच पुण्यातील भोर-वेल्हा घाटात आज अतिवृष्टी सुरू आहे.
26/7, Latest satellite obs at 9.45 am indicates mod to intense clouds over Konkan Goa, Karnataka, N Kerala, Telangana & adj parts of Marathwada Parts of coastal Andhra, South Odisha.
Possibility of mod to intense spells during next 2,3 hrs.
🚩South Madhya Mah, Kolhapur
Watch pl. pic.twitter.com/jVIfYIDALf— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 26, 2023
देशाच्या पश्चिम आणि दक्षिण-पूर्व किनारपट्टी भागाला आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा जोर सुरूच; पावसाचे असमान वितरण चिंताजनक
राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पुणे व मुंबईतील धरणे भरत आली आहेत. नाशिकमधील अनेक धरणात मात्र फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या उर्वरित भागातही धरणात पाणीसाठा वाढत आहे. दुसरीकडे, जळगाव, नाशिक, अहमदनगर व मराठवाडा-विदर्भातील काही भागात आजही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. राज्याच्या प्रमुख ऊस उत्पादक पट्ट्यातही अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. काही जिल्ह्यात पावसाची एकत्रित सरासरी पूर्ण झाली असली तरी पावसाच्या असमान वितरणामुळे इतर भाग मात्र कोरडाच आहे.
28 जुलैपासून मान्सून प्रतिकूल स्थितीत
28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत मान्सून अत्यंत प्रतिकूल स्थितीत राहण्याची शक्यता काही हवामाशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. भारताच्या काही भागांमध्ये मान्सूनची तीव्रता कमी दिसून येईल. त्यामुळे पुढील 2 आठवडे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये ओरिसा किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. हा पट्टा बिहार आणि झारखंडकडे सरकेल. त्यामुळे पुढील काळात वरील छायाचित्रात दाखविलेल्या चौकानातील निळ्या भागातच पावसाचा जोर एकवटलेला राहू शकेल. लखनौ, पाटणा, अलाहाबाद, जबलपूर, रांची, कटक ते विशाखापट्टणम भागात हे पावसाचे क्षेत्र राहील. झारखंडलगत विदर्भाच्या काही भागातही हा पाऊस राहण्याची शक्यता आहे.
सरदार अॅग्रो फर्टिलायझरचा राज्य परवाना निलंबित – विभागीय कृषी सहसंचालक