माईकोरायझा एक उपयुक्त बुरशी आहे. जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांत प्रवेश करते. ही बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती,ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके जसे की सोयाबीन, कापुस,ऊस, केळी, पपई, हळद वैगरे आहेत. त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते.
झाडे आणि माती मध्ये माईकोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहे.
दुर्दैवाने ही फायदेशीर माईकोरायझा बुरशी मानवनिर्मित लँडस्केपच्या विकासात नष्ट होत चालली आहे. ज्यामुळे या वातावरणातील वनस्पतींना अतिशय संघर्ष करावा लागत आहे.
माईकोरायझा बुरशी मूळ प्रणालीची वसाहत करते. तंतूंचे एक विशाल नेटवर्क तयार करते. ही बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज,पोषणद्रव्ये आणि अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते.वनस्पतीच्या मुळांशी जोडण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे माईकोरायझा सूक्ष्मबुरशी मुळांचा विस्तार झपाट्याने करते व आसपासच्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणातील पाणी आणि पोषणद्रव्ये शोषण करुन त्यांना वनस्पतींच्या मुळात आणते व वनस्पतींची पोषण आणि वाढ सुधारते.
माईकोरायझा बुरशीजन्य तंतूचे नेटवर्क तयार करुन हे सूक्ष्म तंतु जमिनीत वाढतात आणि अधिक पोषक द्रव्ये शोषण करुन मुळांना पुरवतात.
अतिरिक्त पाणी आणि पोषणद्रव्ये वनस्पतींना पुरवून माईकोरायझा बुरशी ही वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान देते.माईकोरायझा बुरशीमुळे आपण चांगले नैसर्गिक जीवनसत्त्व,पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पिकवू शकतो.
माईकोरायझा वनस्पतींच्या मुळाशी मिळताच नवीन शाखा सुरू होताना दिसते, त्यामुळे झाडांची काईक वाढ चांगली होते.माईकोरायझा सारखी उपयुक्त बुरशीची उत्पत्ती करुन साधारण 100 ग्रॅम (वैम HD) माईकोरायझा = 100000 प्रोपॅगुल्स आहे.
माईकोरायझा एक खत आहे का?
होय..माईकोरायझा हे एक फाॕस्फरसयुक्त खतांमधे मोडले जाते कारण ते जमिनीत फाॕस्फरस सोबत पोषक पदार्थ सोडते.माईकोरायझा बुरशी नैसर्गिक व कमी सुर्यप्रकाशात खतांचा मेळ घालुन मुळ्यांना मजबूत व प्रतिरोधी,तसेच निरोगी झाडे तयार करण्यास मदत करते.
माईकोरायझा बुरशीच्या उपचारांपासून आपण काय अपेक्षा करू शकतो?
1) झाडाची चांगली आणि अधिक संतुलित वाढ होते.
2) मातीतील सुक्ष्मद्रव्ये,फाॕस्फरस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.
3) फुलं आणि फळधारणा अधिक मिळते.
4) हानिकारक बुरशींची वाढ होऊ देत नाही.
5) झाड काटक बनवते व प्रतीकुल हवामानात तग धरुन ठेवते.
6) पपई ,मिरची सारख्या पिकाला मर रोग येत नाही.
7) पिकाची वाढ झपाट्यात होते.
8) उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
या कारणांमुळे शेतकरी बंधुनी माईकोरायझा बुरशीचा अवश्य वापर करावा व उत्पादनात वाढ करावी.