• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 29, 2021
in हॅपनिंग
2
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नवी दिल्‍ली : महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम स्वरुपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच फलोत्पादनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आशियाई विकास बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. ही बँक आणि भारत सरकार यांच्यातील 10 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारतातर्फे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विषयक विभागाचे अतिरिक्त सचिव रजत कुमार मिश्रा यांनी तर आशियायी विकास बँकेचे भारतासाठीचे निवासी संचालक ताकेओ कोनिशि यांनी बॅंकेतर्फे मॅग्नेट अर्थात महाराष्ट्र कृषी उद्योग नेटवर्क प्रकल्पाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर, मिश्रा ययांनी सांगितले, की हा प्रकल्प बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. प्रत्यक्ष शेतातील उत्पादकतेत वाढ, काढणी पश्चात सुविधांचे आधुनिकीकरण आणि विपणन सुविधा निर्माण करणे अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषिविषयक उद्योगांना समग्र पाठींबा देणार आहे.

ग्रामीण भागात होणार स्थित्यंतर
महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम स्वरुपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची काढणी पश्चात आणि विपणन क्षमता सुधारणे, अन्नाची नासाडी कमी करणे आणि अर्थपुरवठा तसेच क्षमता बांधणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच फलोत्पादनासाठी मूल्य साखळीच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यासाठी हा प्रकल्प मदत करेल, असे कोनिशि यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्युतीकरण आणि गावांशी संपर्काच्या सुविधा वाढविणे या उपक्रमांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी परस्पर पूरक प्रकल्पांवर काम करून भारताच्या ग्रामीण भागात स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून सध्या दिल्या जात असलेल्या मदतीच्या सोबतच या प्रकल्पाच्या हस्तक्षेपांना संरेखीत केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्ज पुरवठ्याची सुविधा
संपूर्ण भारतात होणाऱ्या फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनाच्या अनुक्रमे 11 टक्के आणि 6 टक्के फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. तर देशातून निर्यात होणाऱ्या एकूण फुलशेतीतील उत्पादनांपैकी 8 टक्के फुले महाराष्ट्रातून निर्यात होतात. असे असले तरीही लहान शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यासाठी भांडवलाची कमतरता भासते आणि त्यांना नव्याने उदयाला येत असलेल्या उच्च दर्जाच्या बाजारांपर्यंत थेट प्रवेश मिळत नाही. आशियायी बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जामुळे कृषी उत्पादक संघटनांना तसेच मूल्य साखळी संचालकांना 300 उपप्रकल्पांना अनुदान आणि मध्यस्थी कर्जाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची सुविधा सुरु करण्यात मदत होईल.

दोन लाख शेतकऱ्यांना फायदा
या नव्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तसेच कृषी उत्पादक संघटनांना स्वच्छ, सुगम आणि शाश्वत पीक साठवण आणि अन्नप्रक्रिया सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सध्या सुरु असलेल्या 16 काढणी पश्चात सुविधांचे आधुनिकीकरण केले जाईल आणि नव्या 3 सुविधांची उभारणी केली जाईल. या प्रकल्पाच्या मदतीने कृषी उत्पादक संघटनांना तसेच मूल्य साखळी संचालकांना विशेषतः महिलांच्या मालकीच्या आणि महिलांद्वारे संचालित होणाऱ्या संस्थांसाठी मूल्य साखळी वेगवान करणे तसेच पिकाची काढणी पश्चात हाताळणी आणि व्यवस्थापन यांची क्षमता वाढविता येईल. याचा फायदा 2 लाख शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे.

जपान निधीतून 20 लाख डॉलर्सची मदत
कृषी उत्पादक संघटनांचा बाजाराशी संपर्क सुधारण्यासाठी आशियायी विकास बँक अनुदान तत्वावर त्यांच्या तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या विशेष निधीतून 5 लाख अमेरिकी डॉलर्सचे अनुदान तसेच गरिबी कमी करण्यासाठीच्या जपान निधीतून 20 लाख डॉलर्सची मदत देणार आहे. तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या अनुदानातून पिकांवर आधारित उत्कृष्टता केंद्रांचे जाळे विकसित केले जाईल, कृषी उद्योग आणि कृषी मूल्य साखळीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि क्षमता बांधणीला पाठबळ पुरविले जाईल, तसेच मॅग्नेट संघ आणि महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळाच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवस्थापन क्षमतांमध्ये देखील वाढ करण्यात येईल. टोकाची गरिबी दूर करण्यासाठी सुरु असलेल्या अखंडित प्रयत्नांसोबतच समृद्ध, समावेशक, लवचिक आणि शाश्वत आशिया आणि प्रशांत परिसर निर्माण करण्यासाठी आशियायी विकास बँक कटिबद्ध आहे. सन 1966 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेचे आशियातील 49 सदस्यांसह एकूण 68 सदस्य आहेत. दरम्यान, आशियायी विकास बँकेच्या या सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

(सौजन्य – इये मराठीचिये नगरी)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आशियायी विकास बँककृषी उद्योगपायाभूत सुविधाफलोत्पादनबागायती शेतीमध्यम स्वरूपाची शेतीमहाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळमॅग्नेट संघ
Previous Post

दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे मिळायलाच हवे… कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

Next Post

डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय… खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या… पक्क्या बिलाचाच आग्रह धरा…

Next Post
डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय… खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या… पक्क्या बिलाचाच आग्रह धरा…

डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय... खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या... पक्क्या बिलाचाच आग्रह धरा...

Comments 2

  1. Pingback: डी. ए. पी. खताला उपलब्ध आहे पर्याय... खत खरेदी करताना मात्र काळजी घ्या... पक्क्या बिलाचाच आग्रह धरा... - Ag
  2. Pingback: काढणी पश्चात तंत्रास बळकटी दिल्यास 40 टक्के शेतमाल उपयोगी येणार - शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्य

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.