पुणे – भारतात यंदा पाऊस लवकर येणार.. नाही येणार.. यावर तर्कवितर्क सुरु असताना स्कायमेट पाठोपाठ भारतीय हवामान विभागाने (IMD) ही मान्सून भारतात लवकर दाखल होण्याच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब केले. मान्सून 13 ते 19 मे दरम्यानच अंदमान इथं दाखल होईल, असं सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या के. एस. होसळीकर यांनी ट्विटद्वारे चार आठवड्याचा अंदाज वर्तवताना ही माहिती दिली.
अस्सल देवगड हापूस हंगाम अखेरच्या टप्प्यात.. 🥭
आजपर्यंत आपण खूप हापूस आंबे खाल्ले असतीलच… तेव्हा एकदा अॅग्रोवर्ल्ड देवगड हापूस आंबा खाऊन नैसर्गिक हापूसची खरी चव घेऊन बघाच.. भेसळ नाही, केमिकलचा वापर नाही.. फसवणूक नाही..🌱
अस्सल देवगड हापूस हंगाम अखेरच्या टप्प्यात..
मे च्या तिसऱ्या आठवड्यात केरळात..
अंदमानच्या समुद्रात मान्सून साधरणपणे 27 मे रोजी दाखल होतो. यंदा मात्र मान्सून अंदमान इथं 13 ते 19 मे दरम्यानचं आपली वर्दी देणार असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. अंदमानात मान्सूून दाखल झाल्यावर साधरणपणे आठवड्याभरात तो केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर तो चार दिवसात तळकोकणात हजेरी लावतो आणि मग तो राज्यात सक्रीय होतो असं नियमित निरीक्षण आहे. या निरीक्षणाला ग्राह्य धरल्यास मान्सून केरळमध्ये 20 ते 26 मे रोजी दाखल होऊ शकतो आणि तळकोकणात तो 27 मे ते 2 जून पर्यंत येऊ शकतोय.
IMD चा चार आठवड्याचा अंदाज..
पहिल्या नकाशात (13 ते 19 मे) त्यांनी अंदमानच्या समुद्रात पावसाचा अंदाज दाखवला आहे आणि त्यांनी पाऊस चांगला पडणार असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या (20 ते 26 मे) आणि तिसऱ्या (27 मे ते 2 जून) नकाशात त्यांनी अरबी समुद्रात असणारी पावसाची स्थिती म्हणजेच अरबी समुद्रातून पाऊस केरळकडे सरकत असतानाच्या स्थितीवर भाष्य केलंय. चौथ्या (3 ते 9 जून) नकाशात होसळीकर यांनी पावसाच्या केरळमधल्या प्रवासावर भाष्य केलंय. भारतात आधी अंदमान आणि मग केरळमार्गे मान्सून दाखल होणार आहे आणि तोही वेळेआधी दाखल होणार आहे, असं होसळीकर यांचं म्हणणं आहे
सलग चौथ्या वर्षी पाऊस गाठणार सरासरी..
‘देशात यंदा सलग चौथ्या वर्षी पाऊस सरासरी गाठेल,’ असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केला. या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या 99 टक्के पावसाची शक्यता असून, प्रशांत महासागरातील ‘ला निना’ स्थितीमुळे पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे.
या वर्षी सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 14 टक्के असून, सरासरीच्या 90 ते 96 टक्के पावसाची शक्यता 26 टक्के, 96 ते 104 टक्के पावसाची शक्यता 40 टक्के, 104 ते 110 टक्के पावसाची शक्यता 15 टक्के, तर 110 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता पाच टक्के असल्याचे अंदाजात म्हटले आहे.
‘ला निना’ची स्थिती
प्रशांत महासागरात यंदा मान्सून काळात ‘ला निना’च्या स्थितीची शक्यता असून, हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटक निगेटिव्ह राहण्याची शक्यता आहे. ‘निगेटिव्ह आयओडी’ भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करतो. मात्र, प्रशांत महासागरात ‘ला निना’ स्थिती सक्रिय असताना भारतात समाधानकारक पाऊस होतो, असे आकडेवारी सांगते.