• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बांगडी ठिबक सिंचन पद्धतीवरील चिकूची बाग

दुसरी पिढीही परदेश नोकरी नाकारून शेतीमध्ये सक्रीय

Team Agroworld by Team Agroworld
September 16, 2020
in यशोगाथा
0
बांगडी ठिबक सिंचन पद्धतीवरील चिकूची बाग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

डहाणू तालुक्यातील घोलवड येथील उच्चशिक्षित पदवीधर शेतकरी प्रभाकर सावे यांनी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करत आपल्या चिकू बागेला व्यावसायिक रूप दिले आणि परिसरातील शेतकऱ्यांना आदर्श असे फळबागेचे मॉडेल उभे केले आहे. फळ विक्री बरोबरच त्यांनी चिकू प्रक्रिया उद्योग व नर्सरीच्या माध्यमातून एक नवीन ओळख तयार केली आहे. त्यांचा मुलगा …. हा देखील परदेश नोकरीची संधी सोडून चिकू शेतीमध्ये स्थिरावला आहे

आपले विज्ञान शाखेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणाचा विचार चालू असताना वडिलांच्या सल्ल्यानुसार शेती क्षेत्रामध्ये एक आव्हान घेऊन व्यवसायिक कारकीर्द करण्याच्या हेतूने वडिलांच्या शेती आणि इतर थोडक्याशा जमापुंजीतून काहीशी एकर विकत घेतलेल्या अगदी पडीक व धूप झालेल्या  जमिनीमध्ये सन १९६९ साली प्रत्यक्ष शेतीला सुरवात केली. टप्प्याटप्प्यानेसुमारे १२ एकर मध्ये ७५० ते ८०० चिकूच्या झाडांची मुख्य शेती म्हणून लागवड केली यामध्ये अंतरपिक म्हणून कडीपत्ता, केळी व पालेभाज्यांचीसुद्धा लागवड करण्यात आली. सावे यांचा मुलगा ITI व अॅनिमेशन मध्ये पदवीधर आहे. त्यांचे सर्व नातेवाईक हे परदेशात स्थिरावले आहे त्यामुळे त्यांनी सावेच्या मुलाला परदेशात नोकरीची संधी निर्माण केली होती तरी त्याने हि संधी नाकारून आपल्या वडिलांच्या चिकू शेतीमध्ये करिअर करायचा निर्णय घेतला.


इस्राईल दौरा महत्वपूर्ण

मृदा व जलव्यवस्थापन या विषयांची अभ्यास करण्यासाठी मिळालेली इस्राईल देशातील स्कॉलरशीप ही आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. फक्त शेती उत्पादन न करता शेतीला व्यापारी स्वरूप देण्याची नवीन दृष्टी मिळाली व त्या दृष्टीला प्रत्यक्ष आपल्या कर्माने साकार करण्याचा दृढ निश्चय पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड योथिल प्रभाकर सावे यांनी सुमारे ५० वर्षापूर्वी सुरु केला. एकप्रकारे या दौऱ्याने त्यांना शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची संधी दिली.
बांगडी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर

सन १९८५ नंतर चिकूच्या शेतीबरोबर फळबाग नर्सरीची सुरवात करून चिकूच्या शेतीमध्ये टप्प्याटप्प्याने ठिबक सिंचनाचा वापर करून पुढे काळाप्रमाणे यामध्ये बांगडी ठिबक सिंचन पद्धतीचा सर्व बागेमध्ये अवलंब केला. सुरवातीला काही वर्षे रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खूप वापर केला. पण त्याचे भविष्यातील मृदा व फळबागेवरील दुष्परिणाम पाहता पुढे ते बंद करून सुमारे २५ वर्षापासून पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब केला.
चिकू प्रक्रिया
चिकूच्या उत्पादन विक्रीपासुन समाधानकारक आर्थिक लाभ मिळत नव्हता. यामुळे चिकुच्या फळावर प्रकिया करण्याचे श्री. सावे यांनी ठरविले. सुरुवातीला नैसर्गिकरित्या पिकलेले चिकू उन्हात वाळवून साठऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु उघड्यावर वाळवताना धूळ माशांचा पादुर्भाव होऊ शकतो हे टाळण्यासाठी सौर वाळवणी उपकरणाची  निर्मिती करून  त्याद्वारे चिकू प्रक्रिया करण्यास सुरुवात केली यामधून चिकूफळ प्रक्रियेमध्ये सुरक्षितता व स्वच्छता प्राप्त झाली. याचा लाभ या उत्पादनाचा वाढीव विक्री मधून दिसून आला. चिकू फळापासून चिकू पावडर, चिकू लोणचे, चिकू पल्प इत्यादी नाविन्यपूर्ण पदार्थाचे उत्पादन केले गेले.


चिकू बाग, प्रक्रिया उद्योग आणि कृषी पर्यटन

शेती क्षेत्रामधिल नवनवीन तंत्रज्ञानाची माहीती व इतर नाविन्यपूर्ण  घेतलेले शिक्षण प्रभाकर सावे यांना शांत बसु नव्हते. चिकू फळ शेती, प्रक्रिया उद्योग त्या सोबत शेती पर्यटन ही संकल्पना आपल्या शेती बागे मध्ये राबविण्याचा नवीन संकल्प त्यांनी केला या पूर्वी शेती बागेवर विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या सहलींच्या आयोजनाचा अनुभव गाठीशी असल्यामुळे निसर्ग व ग्रामीण जीवनाचा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राची स्थापना केली. याला पर्यटकांनी ही इतकाच उस्फुर्त प्रतिसाद लाभत गेला. यामधून अनपेक्षितरित्या चिकू फळे, चिकू प्रक्रिया उत्पादनाला थेट विक्रीमध्ये चांगलाच आर्थिक नफा झाला. आपल्या बरोबरीच्या इतर ही शेतकऱ्यांच्या चिकू फळे, चिकू प्रक्रिया उत्पादनाची थेट विक्री होण्यासाठी चिकू महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. पर्यटक चिकू फळे, चिकू प्रक्रिया उत्पादनाची खरेदी कोणत्याही प्रकारचा भाव न करता सन्मानपूर्वक ठरलेल्या दराला खरेदी करतात असे श्री. सावे साहेब आवर्जून सांगतात.
चिकू लागवड

चिकूला जरी दमट व समशीतोष्ण हवामान मानवत असले तरी त्याची लागवड कोरड्या व विषम हवामानात पण यशस्वी झाली आहे. फरक इतकाच की समुद्रसपाटीवर वर्षातून तीन बहर येतात समुद्रसपाटी पासून उंचीवर असलेल्या जागी दोन बहर येतात. परंतु वार्षीक उत्पादन जवळपास सारखेच मिळते. पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे झालेल्या लागवडीसाठी  स्थानिक बाजारपेठ मिळाल्याने आर्थिक फायदा चांगला होतो असे आढळून आले आहे. काही काळानंतर चिकूची झाडे उंच वाढल्यामुळे फळ तोडणीचा खर्च देखील वाढतो यामुळे चिकूच्या उत्पादन खर्चामध्ये  देखील वाढ होते हा खर्च कमी करण्यासाठी चिकूच्या काही फळ झाडाची छाटणी करण्यात आली. ही छाटणी यशस्वी झाल्यानंतर टप्या टप्याने सर्व शेती बागेतील चिकूच्या वृक्षांची १० ते १२ फुटापर्यंत छाटणी करण्यात आली. ८ मी. X ४ मी. किंवा अतिदाट ३ मी. X ६ मी अंतरावर लागवड करून त्याला छाटणीची जोड दिली तर फार कमी काळात आपली बाग व्यापारी प्रमाणावर उत्पादन देऊ लागते. झाडांची उंची कमी ठेवल्याने फळे काढणीचा खर्च खुप वाचतो. लागवडीसाठी मोठ्या पिशवीत दोन ते तीन वर्षे वाढवलेली ‘शेंडा कलमे’ वापरल्यास उत्तम असतातयामुळे मशागतीचा खर्च वाचतो, कलमांची मर होत नाही (नांगे पडत नाहीत) व बाग लवकर उत्पन्न द्यायला लागते. गुंतवणूकीपासून लवकर मोबदला मिळू लागतो.
सिंचनासाठी सुरुवातीपासूनच सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा लागतो चिकू चे साठवण आयुष्य इतर फळांच्या तुलनेत कमी असल्याने त्याला प्रक्रियेची जोड द्यावी लागते. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. फळांचे पॅकिंग हे ग्राहक-केंद्रित असावे. जवळपासच्या शहरातील हाउसिंग सोसायटी बरोबर संपर्क साधून शकतो थेट किंवा कमीत कमी मध्यस्थांमार्फत  विक्री करावी. यामुळे विक्री वरील खर्च कमी होईल व महत्त्वाचे म्हणजे मार्केट मध्ये चुकीच्या पद्धतीने हाताळणी केल्याने होणारी नासाडी थांबेल. ग्राहकांना उत्तम प्रतीची फळेही मिळतील. शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेलया सारखी अनेक स्पष्ट मते  प्रभाकर सावे यांनी आपल्या ५० वर्षाच्या अनुभवाच्या खाजीन्यामधून व्यक्त केले आहे.

शेततळे आणि जलपुनर्भरण

भुगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाण्यातील क्षारता वाढत गेली.  अशा क्षारयुक्त पाण्याच्या सिंचनासाठी वापर केल्यास जमिनीतील जिवाणूंवर त्याचा परिणाम होईल म्हणून १९९८ साली सव्वा एकर क्षेत्रावर शेत-तलाव खणून तीन कोटी लीटर पावसाच्या पाण्याची साठवण केली. पुढे २००० साली अस्तरीकरण त्याचे करून तलावात गाळ साचू नये म्हणून व जमिनीत पाणी मुरावे म्हणून तलावात पाणी घेण्याआधी सुमारे दीड एकर क्षेत्राचा वापर केला.  तलाव भरल्यावर वाहून जाणारे पाणी सायफन तंत्राचा वापर करून ११० फुट खोलीच्या कूपनलिकेत  थेट पुणर्भरण केले व कोरड्या झालेल्या कुपनलीकेचे पुनरुज्जीवन केले. परिसरातील शेतकऱ्यांच्या कूपनलिकेतील पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली . सर्व शेतकऱ्यांनी यांचा अवलंब केल्यामुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता आली.

 

चिकुपासुन माणसाच्या शरीरास लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, चिकूच्या सालीपासुन फायबर हे घटक मिळतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे एक महत्वाचे पिक आहे. शेतकऱ्यांनी शेती उत्पादना बरोबर बाजार विक्री कौशल्य आत्मसात केल्यास या पिकामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. चिकूफळे,  चिकू रोपवाटिका, चिकू प्रक्रिया उत्पादनाच्या विक्री मधून वर्षभरात एकरी रुपये २.५ लाखाची आर्थिक उलाढाल जर आमच्या या बागेतून होऊ शकते तर शेतकऱ्यांनी जर मोठ्या प्रमाणत या फळपिकाची लागवड केली तर नक्कीच ते आपले आर्थिक जीवनमान बदलू शकतात. श्री. प्रभाकर सावे,


सावे फार्म
मु.पो. घोलवड, तालुका- डहाणू, जिल्हा- पालघर, महाराष्ट्र-४०१७०२.मोबाईल नंबर- ९९२११७७३३५.इमेल आयडी –[email protected] / [email protected]

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: चिकूबांगडी ठिबक सिंचनशेततळे आणि जलपुनर्भरण
Previous Post

सूक्ष्म सिंचन प्रणालीवर बहरली मिश्र फळबाग

Next Post

कांदा निर्यातबंदीने शेतकरी अडचणीत अन् ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

Next Post
कांदा निर्यातबंदीने शेतकरी अडचणीत अन् ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

कांदा निर्यातबंदीने शेतकरी अडचणीत अन् ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

ताज्या बातम्या

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.