• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

फायदेशीर मेथी लागवड

Team Agroworld by Team Agroworld
August 2, 2022
in तांत्रिक
0
फायदेशीर मेथी लागवड
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मेथी ही राज्यातील प्रमुख शेंगा वर्गीय भाजीपाला पिक असून मेथीचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीचे पिक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. काही शेतकरी जवळजवळ वर्षभर मेथीचे पिक घेतात.  मेथीमध्ये जीवनसत्व  अ, ब, आणि क, कॅल्शिअम, कॅरोटीन, लोह व प्रथिने असल्याने आरोग्यासाठी चांगले असते. मेथी ही पाचक असून यकृताची कार्यक्षमता वाढविते.  त्यामुळे पचनक्रिया चांगल्याने होते, तसेच मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो.

मेथीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढील अन्नघटक असतात.

पाणी 86 कार्बोहायड्रेटस् 6.0

प्रोटीन्स् 4.4 फॅटस् 0.9

तंतुमय पदार्थ 1.1 खनिजे 1.5

मॅग्नेशियम 0.07 फॉस्फरस 0.005

सोडियम 0.08 कॅल्शियम 0.4

पोटॅशियम 0.05 लोह 0.02

सल्फर 0.02 क्लोरीन 0.02

जीवनसत्व अ 6450 जीवनसत्व क 0.05

उष्मांक (कॅलरीज) 49

हवामान

मेथीचे पीक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेता येते.  मेथी हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे.  उष्ण हवामानात मेथी या पिकाची वाढ कमी होतो व त्यामुळे भाजीला चांगला दर्जा मिळत नाही. कसुरी मेथी ही थंड हवामान मानवते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये या पिकाची लागवड करावी त्यामुळे मेथी कमी दिवसात तयार होऊन भाजीला चांगला दर्जा मिळतो.

जमीन

मेथी लागवडीसाठी लागणारी जमीन ही मध्यम ते कसदार व पाण्याचा चांगल्या पध्दतीने निचरा होणारी जमीन असावी.

 आता चमचमीत, मसालेदार खा बिनधास्त!!

•  अल्कोहोल फ्री, GMO फ्री, लो फॅट, लो सोडियम, नॅचरल & हाय इन प्रोटीन! चायनीज, थाई, लेबनीज, इटालियन, मेक्सिकन आणि भारतीय मसाल्याच्या मुबलक व्हरायटी; गुणवत्ता, दर्जा आणि समाधानासाठी यूझर रेटिंग 4 स्टार आणि अधिक असलेले प्रॉडक्टस… पाहण्यासाठी, सवलतीत खरेदी करण्यासाठी 👆 इथे क्लिक करा. ॲग्रोवर्ल्डच्या वाचकांसाठी अमेझॉनची खास डिस्काउंट ऑफर …

 

मेथीच्या प्रमुख जाती

  • कस्तुरी – या जातीची मेथीची वाढ सुरुवातीला सावकाश होते. या मेथीचे रोपे लहान झुडूपासारखे असतात. या मेथीची पाने लहान व गोलसर असतात.  कस्तुरी मेथी ही सुगंधित आणि स्वादिष्ट असते.  कस्तुरी या जातीची मेथी दोन महिन्यात तयार होते.
  • पुसा अर्ली बंचिंग – या जातीची मेथीची वाढ लवकर होते. या मेथीची पाने लांबगोल आणि मोठी असतात.  या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते.  स्थानिक ठिकाणी याच जातीचा लागवडीसाठी उपयोग केला जातो. या मेथीचा कोवळेपणा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो.
  • मेथी नं. ४७ – ही मेथी ब-याच स्थानिक ठिकाणी या मेथीची लागवड केली जाते. या मेथीला लवकर फुल येत नाही व त्यातच कोवळेपणा जास्त टिकून राहतो.

लागवड पद्धती :

मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये 20-25 सेंमी. अंतरावर ओळीतून पेरुन किंवा बी फेकून करतात. आंतरपीक म्हणून मेथीचे पीक घेताना मुख्य पिकामधील मोकळ्या जागेत मेथीचे बी 20-2 सेंमी. अंतरावर पेरावे. मेथीच्या लागवडीसाठी 3 2 मीटर आकाराचे किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात बी फोकून किंवा ओळीत पेरणी करतात. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्यास खुरपणी आणि तण काढणे सोपे होते. तसेच कापणी करणे सोपे जाते. नेहमीची मेथी पेरणीनंतरे 3-4 दिवसाते उगवते तर कसुरी मेथीची उगवण होण्यास 6-7 दिवस लागतात. साध्या किंवा नेहमीच्यो मेथीच्या एक हेक्टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते. आंतरपीक म्हणून घेताना बियाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार ठेवावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच बियांसाठी बीजप्रक्रिया करताना कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो बियाणेे या प्रमाणात बियास चोळावे.

 खत व पाणी निजोजन

बियाणे टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४५  ते ५०  किलो करावा.  शक्यतो रासायनिक खताचा वापर करू नये. कोवळी व लुसलुशीत भाजी मिळवण्यासाठी ४ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याचा नियमित पुरवठा केल्याने अधिक उत्पादन मिळवता येते.

किड व रोग नियंत्रण

मेथीवर रोग व किडीचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही.  पंरतु काही वेळा मर या रोगाचा प्रभाव दिसून येतो.  या रोगाच्या नियंत्रणासाठी पिक घेताना जमिनीची फेरपालट करावी.  बियाणे दाट पेरणी करु नये. पानावर ठिपके, केवडा यासारख्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसून आल्यास ३ ग्रॅम मेटॅलॅक्झिल ३५% प्रतिकिलो या प्रमाणात बीचप्रकिया करावी.  भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी करावी.

मेथी काढणी

मेथी ही भाजी पेरल्यापासुन  ३५  ते ४०  दिवसात काढणीला तयार होते. मेथीची काढणी करत असताना रोपटे मुळापासुन उपटून काढतात.  मेथीची पाने फुले येण्याअगोदरच काढणी करावी.  मेथी काढणी  दोन ते तीन दिवसाअगोदर पाणी दिल्यास भाजी काढणी सोपे जाते.  काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून जाळीदार कपड्यात व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन

कस्तुरी मेथीचे हेक्टरी ६०० ते ७०० रुपये किलो इतके बियाणे मिळते.  आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीला मागणी ही जास्त असते.
सौजन्य

Share this:

  • Facebook
  • X
Tags: उष्मांककस्तुरीकार्बोहायड्रेटस्खरीप व रब्बीजीवनसत्वपुसा अर्ली बंचिंगपोटॅशियमप्रोटीन्स्भाजीमॅग्नेशियममेथीमेथी नं. ४७सल्फरसोडियम
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्डची जळगावात शनिवारी (ता. 31) पुन्हा प्रात्यक्षिकासह मधमाशीपालन कार्यशाळा…!

Next Post

अ‍ॅग्रीकल्चर ते सेरीकल्चर वसुंधरा रेशीमगटाचा प्रवास

Next Post
अ‍ॅग्रीकल्चर ते सेरीकल्चर वसुंधरा रेशीमगटाचा प्रवास

अ‍ॅग्रीकल्चर ते सेरीकल्चर वसुंधरा रेशीमगटाचा प्रवास

ताज्या बातम्या

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटच्या पहिल्या काढणीतच 1 लाखाहून अधिक नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2025
0

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा

उत्पादन वाढवा आणि थेट मिळवा ₹50,000 पर्यंतच बक्षीस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2025
0

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

महाबीज

अकोला महाबीज बीज परीक्षण प्रयोगशाळेस NABL मानांकन प्राप्त

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2025
0

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

उत्तर महाराष्ट्र हवामान अपडेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2025
0

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

ठिबक सिंचन संचाची निवड व त्याचे महत्त्व

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

Wonder India : ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 12, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.