इफको लिमिटेड पुणे
1. पिकांसाठी सर्वात महत्वाचे प्राथमिक अन्नघटक म्हणजे नत्र होय.
* नत्र हे पिकांच्या जनुकीय संरचनेचा (DNA, RNA) एक भाग आहे.
* पिकातील हरीतलवकाचा देखील एक भाग आहे, ज्यामुळे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः
तयार करतात.
* नत्र हा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक प्रथिने आणि उत्प्रेरके यांच्यातील एक भाग आहे.
* पिकांमधील ऊर्जी वाहक संयुगांचा (ATP) एक भाग आहे. म्हणूनच नत्राला पिकाच्या चयापचय क्रियांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
* पिकांमध्ये नत्राची कमतरता असेल तर पिकांची वाढ खुंटते आणि फुटवे कमी फुटतात. पिकांच्या पानावर सर्व ठिकाणी (शिरासहित) पिवळा रंग दिसतो.
पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील नवीन अविष्कार नॅनो युरिया, शेतकऱ्यांसाठी सदैव लाभदायक
2. युरिया हे एक नत्रयुक्त सर्वात स्वस्त खत आहे
युरिया हे एक नत्रयुक्त सर्वात स्वस्त खत आहे. शिवाय आपल्या देशातील 50 टक्के जमिनी मध्ये नत्र या अन्नद्रव्याची कमतरता आहे. त्यामुळे युरियाच्या वापरास आपल्या जमिनी व पिके चांगला प्रतिसाद देतात आणि त्यामुळे वर्षानुवर्षे आपल्या देशातील युरिया खताचा वापर वाढत गेला. सन 2020- 21 मध्ये आपल्या देशामध्ये 661 लाख टन इतकी एकूण रासायनिक
खतांची विक्री झाली. त्यापैकी 350 लाख टन युरियाचा वाटा होता म्हणजेच सर्वसाधारणपणे
एकूण रासायनिक खतामध्ये युरियाचा वाटा 50 % पेक्षा जास्त आहे.
NPK-121.82
SSP, 49.44
Urea,
350.97
MOP,
34.42
DAP, 104.96
युरिया वापराच्या बाबतीत दुसरी एक महत्तवाची गोष्ट म्हणजे युरियाची कार्यक्षमता ही साधारणपणे 30 ते 50 टक्के असते. म्हणजेच गेल्यावर्षी वापरलेल्या युरिया पैकी 175 लाख टन युरिया पिकांना उपलबध झाला व तेवढाच तो पर्यावरणामध्ये मग तो जमिनीमध्ये, पाण्यामध्ये किंवा हवे मध्ये वाया गेला आणि युरिया सोबत त्याच्यावरती केलेला खर्च पण वाया गेला.
तसेच युरिया या खताच्या अतिवापरामुळे खालील प्रकारचे अनिष्ट परिणाम आपल्याला पहावयास
मिळ्तात.
1. युरिया खताच्या अतिवापरामुळे पिकांची फक्त शाखीय वाढ होते पिकांमध्ये लुसलुशीतपणा वाढतो. त्यामुळे पीक रोग आणि किडीला बळी पडते तसेच पिकाचा नाजूकपणा वाढल्यामुळे पिक लोळते.
2. युरिया खताचा अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीतील कर्ब
नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन, सूक्ष्म जिवाणूंची व गांडुळांची संख्या कमी होते त्याचा जमिनीच्या
सुपीकतेवर परिणाम होतो.
3. युरिया खताचा अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते व त्याचा अनिष्ट परिणाम पिकावर, प्राण्यांवर व जमिनीवर होतो.
4. युरिया खताच्या अतिवापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील आमाइड नत्राचे रूपांतर नायट्स
ऑक्साईड व नायट्रीक ऑक्साईड सारख्या वायूमधे होते आणि हे वायू कार्बन डाय-ऑक्साइड पेक्षा तीनशे पटीने घातक असतात. त्यामुळे पृथ्वी भोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या स्तरास छिद्रे पडतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढीस मदत होते.
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास युरियाच्या अतिवापरामुळे पिक, जमीन, पाणी, प्राणी व हवामान यांच्यावर घातक परिणाम होतात असे दिसते. वरील होणारी हानी टाळण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी युरियाचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. इफको या जगातील सर्वात मोठ्या, या खत उद्योगातील सहकारी संस्थेने नॅनो युरिया तयार करून आपल्या देशातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन संस्था व 11000 शेतकऱ्यांच्या शेतावरती नॅनो युरियाच्या वेगवेगळ्या 90 पिकावरती चाचण्या घेतल्या त्यामध्ये असे आढळून आले की नॅनो युरियाचा वापर करून पारंपारिक युरियाचा वापर मर्यादित करून आपल्याला योग्य ते उत्पादन घेता येते. या सर्व चाचण्यांच्या निष्कर्षावरून भारत सरकारने देशात पहिल्यांदाच नॅनो युरियाची खत नियंत्रण कायदा 1985 नुसार दिनांक 24 फेद्वुवारी 2021 रोजी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे कायद्याने आत्ता नॅनो युरियाचा वापर देशात सुरू आहे.
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीवर येणार नियंत्रण; राज्याच्या बीड पॅटर्न प्रस्तावाला केंद्राची मान्यता
3. नॅनो युरिया म्हणजे काय ?
एखाद्या वस्तूचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ जितके जास्त तितकी त्याची कार्यक्षमता जास्त या भौतिकशास्रातील सिद्धांतावर नॅनो युरियाची निर्मिती केती गेली आहे. नॅनो युरिया मध्ये नत्राच्या कणाचा आकार हा 20 ते 50 नॅनोमीटर इतका असतो. 1 नॅनोमीटर म्हणजे 1 मीटरचा 100 कोटीवा भाग. सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास मानवी केसांची रुंदी अंदाजे 80,000 नॅनोमीटर असते. सध्या आपण वापरत असलेला बारीक युरिया याची तुलना जर नॅनो युरिया सोबत केली तर बारीक युरियाचा एक दाणा हा नॅनो युरियाच्या 55000 कणाइतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक पुरिया पेक्षा 10,000 पटीने जास्त असते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते.
4. नॅनो युरियाची कार्यपद्धती
निरोगी पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे 4 टक्के नत्राची गरज असते व पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती मध्ये सुद्धा जमिनीवरच्या भागामध्ये 4 टक्के नत्र असतो. नॅनो युरिया मध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या 4 टक्के असते. त्यामुळे पीकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरियाची फवारणी करून पिकाची नत्राची 50 % गरज भागवता येते. नॅनो युरिया 2 ते 4 मिली एक लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केली असता नॅनो युरियातील नत्राचे शोषण पानावरील पर्णरंध्रे (Stomata) च्या द्वारे पिकाच्या पेशीमध्ये होते. शोषण केलेला नत्र पेशीतील रिक्तिका (Vacuole) मध्ये साठवला जातो व पिकाच्या गरजेनुसार पिकाला अमोनिकल आणि नायट्रेट रुपामध्ये पुरवला जातो. नॅनो कणांचा आकार, त्यांच पृष्ठभागीय क्षेत्रफळ, पर्णरंध्रे द्वारे शोषण, पेशींच्या रिक्तिका मध्ये साठवण आणि गरजेनुसार पुरवठा यामुळे नॅनो
युरियाची कार्यक्षमता 86 % पर्यत जाते. नॅनो युरिया जमिनीमधून न देता, पीकाला फवारणीद्वारे देत असल्यामुळे युरियाचा जमीन आणि पाण्याशी संबंध येत नाही आणि कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवे मध्ये सुद्वा वाया जात नाही. त्यामुळे नॅनो युरिया पर्याविरण पूरक व व शाश्वत शेतीसाठी पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील एक नवीन अविष्कार आहे.
5. नॅनो युरियाचे फायदे:
1. नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि
पर्यायाने शेतकनऱ्यांच्या एकण उत्पन्नात वाढ होते.
2. पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते.
3. नॅनो युरियाची एक बाटली (500 मिली) आणि एक युरियाची गोणी (45 किलो) यांची
कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपरिक युरिया खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबत्व कमी होते. पारंपारिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची साठवणूक व वाहतूक यावरचा खर्च कमी होतो. देशाच्या दृष्टीकोनातून युरिया साठी द्यावे लागणारे अनुदान, साठवणूक व वाहतूक यावरील खर्च कमी होतो.
4. नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा, पाणी आणि जमीन यांची हानी थांबते. ग्लोबल वार्मिंगसाठी
कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी अवश्य संपर्क साधावा.
अधिकृत विक्रेता
माहात्मा फुले शेतकरी विकास सह.संस्था मर्या.अमळनेर जि. जळगाव
लेखक – श्री. संजीव पाटील सर
मो.-7755981595
उप सरव्यवस्थापक मार्केटिंग,
इफको जळगाव
Mala 6 lt. Nano uriya vital pahije. Kummat kalva.by email