नेपियर गवत
50’’ ते 100’’ पर्जन्यमान असलेल्या भागात पडीक व हलक्या जमिनीवर हे गवत लावता येईल. हे अतिवृष्टीच्या प्रदेशातील गवत असले तरी अर्धरुक्ष प्रदेशात लावले जाते. हे बहुवर्षायू गवत पाणी देण्याची सोय असल्यास वर्षभर कधीही लावता येते. गवत कोवळे असताना गुरे आवडीने खातात. एकदा लावल्यावर तीन वर्षांपर्यंत गवताची कापणी करता येते. नेपियर बाजरी हायब्रीड ओलिताची सोय असलेल्या शेतजमिनीवर लावण्यास चांगले आहे. या गवतापासून हिरव्या चार्याचे भरघोस उत्पन्न मिळते. फक्त नेपिअर बाजरी हायब्रीड लावायचे असेल तर हेक्टरी 400,000 ठोंब 50ु 50 सें.मी.अंतरावर लावतात. पण बरोबर शिंबीवर्गीय चार्याच्या वनस्पती लावायच्या असतील 20,000 ठोंब 100ु 50 सें.मी. अंतरावर लावतात. पावसाळा सोडून इतर वेळी 15 दिवसांच्या अंतराने पाणी देतात. लावल्यावर 75 दिवसांनी पहिली कापणी करतात. त्यानंतर 45 दिवसांच्या अंतराने वर्षांत 8 ते 10 कापण्या करतात. फक्त गवत लावले तर हेक्टरी 1500 ते 1800 क्विंटल व मिश्र पिकापासून 1800 ते 2800 क्विंटल हिरवा चारा मिळतो. नेपियर बाजरी हायब्रीड बरोबर चवळी व मोहरी किंवा लसूणघास व मोहरी किंवा मका व चवळी किंवा बरसीम व चवळी लावता येते.
दीनानाथ
दीनानाथ गवत हे उष्णकटिबंधीय उत्तर आफि‘केत व भारतात आढळते. हे 1 मीटरपर्यंत उंच वाढते. याला बुंध्यापासून व वर फांद्या फुटतात. पाने 15 ते 25 सें.मी. लांब आणि 4 ते 10 मि.मी. रुंद असतात. हे बिहारमध्ये 127 मि.मी.पावसावर जून ते सप्टेंबरपर्यंत वाढते. परंतु सामान्यत: 500 ते 600 मि.मी.पावसाच्या प्रदेशात हे गवत येते. अवर्षणाला हे चांगले तोेंड देते. उत्तर नायजेरियात कोरड्या उन्हाळ्यात 7 महिन्यांपर्यंत टिकून राहते. सुपीक गाळाच्या जमिनीवर दीनानाथ गवताची उत्तम वाढ होते. पण खते घालून रेताड जमिनीवर लावता येते. आम्ल व अल्कधर्मी दोन्ही र?कारच्या जमिनींवर हे गवत वाढू शकते. नांगरलेल्या, ओलसर जमिनीवर 8 ते 9 कि.ग‘ॅ. बी जून-जुलैध्ये 50ु 30 सें.मी. किंवा 60ु 40 सें.मी.अंतरावर पेरतात. त्या अगोदर 10 टन काडीकचरा जमिनीत गाडतात. उगवून आल्यावर पावसाळ्यात दोनदा तण काढतात. हे गवत नत्रयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देते. लावल्यानंतर 90 दिवसांनी पहिली कापणी करतात. त्यानंतर 60 दिवसांनी दुसरी कापणी करतात. दोन कापण्यांपासून हेक्टरी 750 ते 1000 क्विंटल हिरवा चारा मिळतो. हिरवा चारा कापून गोठ्यात गुरांना दिला जातो. बिहारमध्ये दीनानाथ गवत हे सर्वात लवकर होणारे गवत आहे. पंजाब विद्यापीठ, हिसार येथून या गवताच्या चार प्रजाती प्रसारित केल्या आहेत. जनावरे गवत आवडीने खातात. यात विषारी घटक नसतात. याचा मुरघास करता येतो. कुरणामध्ये हे गवत लावण्यास चांगले आहे. शेळ्या, मेंढ्या, आणि गुरा-ढोरांना चरण्यास चांगले आहे. याच्यावर रोग किंवा कीड पडत नाही. या गवताच्या वैरणीत 55 ते 77% पचू शकतील अशी अन्नद्रव्ये असतात. या गवताबरोबर चवळी, गवार, मूग, वाल यांसार‘या शिंबीवर्गीय वनस्पती चार्यासाठी लावता येतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी हे गवत उपयुक्त आहे. हे वर्षायू गवत चार्यासाठी शेतजमिनीवर लावता येईल.
मकचारी
हे उंच, जोाने वाढणारे, लुसलुशीत, वर्षायू गवत मूळचे मेक्सिको, ग्वारेाला या देशांधील आहे. हे गवत बरेचसे मक्यासारखे दिसते. हे साधारणपणे 6 ते 8 फूट उंच वाढते. परंतु अनुकूल परिस्थितीत याची उंची 10 ते 12 फूट किंवा त्याहून अधिक होते. याचे दाणे लांबट, मोठे असतात. याच्यापासून चार्याचे उत्पादन भरपूर प्रमाणात मिळते. मद‘ासमध्ये पाणी भरून वाढवलेल्या पिकापासून एका कापणीत एकरी 20 टन हिरवा चारा मिळाला तर वर्षात 3-4 कापण्यांपासून एकरी 60 ते 80 टन हिरवा चारा मिळाला. गुराढोरांना व घोड्यांना हा चारा आवडतो. याचा मुरघास चांगला होतो. गवताचे बी एप्रिल ते जुलैपर्यंत पेरता येते. हेक्टरी 30 ते 40 किलाग‘ॅ बी 40-45 सें.मी. अंतरावर पेरतात. उन्हाळी पिकाला 2 ते 3 वेळा पाणी देतात. खरिपामध्ये पावसाच्या पाण्यावर पीक येते. 60 ते 70 दिवसांच्या 1 ते 2 कापण्या करता येतात. एका कापणीपासून हेक्टरी 300 ते 450 क्विंटल आणि दोन कापण्यांपासून 450 ते 600 क्विंटल हिरवा चारा मिळतो.
ओट
ओटचे लागवडीचे बरेच प्रकार आहेत. याचे खोड 2 ते 3 हात उंच होते. याला थंड, ओलसर हवा आणि मध्यम प्रकारची जमीन मानवते. पुणे, अहमदनगर, सातारा, अहमदाबाद जिल्ह्यांध्ये ओटचे रब्बी पीक घेतात. पशूंना हे गवत आवडते व मानवते. कांडाची वैरण उत्तम होते. ओटमध्ये 67 %कर्बोदके , 16 % प्रथिने, 6 % स्निग्ध पदार्थ, 2 % क्षार व 7 % पाणी असते. यात लोह कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, जस्त वगैरे सर्व आवश्यक खनिजे असून बी, डी, इ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यातील तंतूुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते व पचनसंस्थेचे कार्य चांगले चालते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत हेक्टरी 80 ते 90 कि. गॅ‘ बी 20 ते 25 सें.मी. अंतरावर पेरतात. पाण्याच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्या लागतात. फक्त एकदा कापणी करायची असेल तर गवताला 50 टक्के फुले आल्यावर करतात. दोन कापण्या करायच्या असतील तर पहिली कापणी 60 दिवसांनी करून दुसरी कापणी 50 टक्के फुले आल्यावर करतात. तीन कापण्या करावयाच्या असतील तर पहिली कापणी 55 दिवसांनी, दुसरी कापणी 105 दिवसांनी व तिसरी कापणी 50 टक्के फुले आल्यावर करतात. फक्त एक कापणी केली असता हेक्टरी 300 ते 450 क्विंटल हिरवा चारा मिळतो. दोन कापण्यांपासून हेक्टरी 400 ते 550 क्विंटल व तीन कापण्यांपासून 400 ते 575 क्विंटल हिरवा चारा मिळतो.
माहिती लेखन : वनराई संस्था