• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कोरोना नंतरची शेतीव्यवस्था…!

Team Agroworld by Team Agroworld
January 2, 2021
in इतर
1
कोरोना नंतरची शेतीव्यवस्था…!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

देशाचे दिवंगत प्रधानमंत्री स्व.लालबहादूर शास्री यांनी त्यावेळी दिलेला “जय जवान-जय किसान” हा नारा आज पुनश्च अनेकांच्या लक्षात आला. दरवेळी तो  स्वतंत्र दिवस, प्रजासत्ताक दिन अथवा एखाद्या युद्धाच्या वेळी आठवतो पण यावेळी हा नारा आठवण येण्याचे कारण जरा वेगळे होते. यावेळी शेतकऱ्यांची आठवण झाली ती कोरोना या विषाणूच्या प्रकोपामुळे. देशभरात लागलेल्या अभूतपूर्व टाळेबंदीमुळे क्षणात स्वतःच्या घरात बंदी झालेल्या नागरिकांना शेतकऱ्यांनी पुरविलेल्या अन्नसाखळीमुळे शेतकरी सर्वांना आठवणीत आला, त्याचबरोबर  शेतीमुळे भारताचा जीडीपी प्लसमध्ये राहीला या कारणामुळेही शेती व शेतकरी पुन्हा प्रसार माध्यमाच्या हेडलाईन मध्ये आले. जगभरात सर्व यंत्रणा कोसळली असतांना शेतकरी कसा उभा राहिला, काय आहे कोरोना नंतरची शेतीची अवस्था, कसे असेल कोरोना नंतरचे शेतीचे भविष्य या बाबीवर टाकलेला हा कटाक्ष…
शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहीजे ही अनेक दिवसांपासुन अनेकांची (विशेषता) राजकारणी लोकांची मागणी आहे. मात्र डॉ. स्वामीनाथन म्हणतात, शेतीला उद्योगांचा दर्जा नको, तर उद्यमशिलेस प्राधान्य देण्यासाठी शेतमालास निश्चित हमीभाव (हे प्रकरण विस्तृत आहे, त्यामुळे त्याचा पुर्ण उल्लेख नको) केंद्राने द्यावेत त्यामुळे शेती व शेतकऱ्यांना चांगले (आर्थिक) स्थैर्य प्राप्त होऊन उत्पादनात देश जागतिक स्तरावर सर्वप्रथम राहील.

कोरोनाचा शेतीवरील परिणाम

जागतिक संकटामुळे (कोरोना) ते दिवस दृष्टीक्षेपात दिसू लागलेत, मात्र यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही ही यातील सर्वात मोठी जमेची बाजू आहे. कारण कोरोनामुळे शेतकरी स्वतःच संघटीत होतो आहे. त्यामुळे शेतीला उज्वल भविष्य दिसून येत आहे. माझ्या मते किमान 10 मुद्दे शेती जगतावर परीणाम करणारे आहेत. त्यापैकी काही मुद्यांचा विचार आपण येथे करणार आहोत. ते मुद्दे पुढिलप्रमाणे.

1.येत्या 10 वर्षात हवामानात होणारे बदल.

2.शेतीमुळे भारताचा जीडीपी प्लसमध्ये राहीला.

3.शेतकऱ्यांनी मध्यस्त/दलाल यांचा संबंध तोडुन स्वतःची विक्री साखळी (चेन) निर्माण केली.

4.कोरोनामुळे नोकरी गेली, त्यातुन फक्त शिक्षीत नव्हे तर सुशिक्षीत व उच्चशिक्षीत तरूण शेतीकडे वळला आहे.

5.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत वाढला आहे.

6.स्थळ/काळानुसार सेंद्रीय/रासायनिक शेतीमध्ये फार मोठे बदल होत आहेत.

7.शेतीपुरक उद्योग उभारणीच्या संधी वाढल्या.

8.देश, विदेशात मार्केटिंगच्या संधी उपलब्ध होणार.

9.शेतकरी ते ग्राहकही साखळी निर्मीतीमुळे आरोग्यावर होणारा खर्च कमी होणार.

10.मोठे उद्योजक व राजकारणी यातुन संधी साधुन शेतकर्‍यांवर बंधने आणण्याचा प्रयत्न करणार.

असे अनेक मुद्दे आहेत आणि मुद्द्यामध्ये स्वार्थ आला की कोणीही गुद्यांवर उतरतोच हा भारताचा नव्हे तर हिंदुस्तनचा अनादिकालापासूनचा इतिहास आहे. असो आपण वरीलपैकी काही मुद्यांचा या ठिकाणी विचार करू.

नवीन पिढीचा प्रवास शेती-नोकरी-शेती    

आपल्या देशाला स्वातंत्र्याचे वेध लागले. (आपण 1940 पासुनचा विचार करू.) ते 1970 पर्यंत असे म्हटले जात असे की, उत्तमशेती, मध्यम व्यापार व कनिष्ट नोकरी 1972 च्या दुष्काळापासुन कोरोना येईपर्यंत (2019 अखेर) त्यात बदल झाला. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ट शेती. याची अनेक कारणे आहेत. पण आपण शेतीचा  याठिकाणी विचार करणार आहोत. मुलगा शिकला. साधा पदवीधर झाला की त्याला कोठेतरी नोकरीत चिटकवण्यासाठी 5 ते 25 लाख रू. द्यावे लागायचे मग काय दोन-चार एकर शेती विकणे व मुलाला खाजगी कंपनी, विविध कारखाने यात चिकटवणे हा उद्योग बळावला. त्या मुलाला पगार किती तर रू. पाच हजार ते पंचवीस हजार मासिक पण माझा मुलगा नोकरी करतो हा प्रतिष्ठेचा मुद्द बनला. मोठ्यात मोठा जमीनदार, अल्पभुधारक, अत्यल्पभुधारक झाला. शिवाय मुलाच्या नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंंबेच्या कुटूंबे उध्वस्त होऊ लागली. शेतकरी मुलालाही शेती करणे कमीपणाचे वाटु लागले.

हरितक्रांतीनंतरची शेती
     पुर्वीच्या काळी १९७२ पुर्वी शेतीची सर्व कामे मार्च/एप्रिल महिन्यापर्यंत पुर्ण व्हावयाची. शेती नांगरल्यामुळे मे महिन्यातील उन्हात जमीन चांगली तापून-तळुन निघायची. त्यामुळे रोगराईचे प्रमाण अत्यंत कमी होते. पण 72 च्या दुष्काळानंतर पिक पद्धतीत बदल झाले. शेतातील, बांधावरील वृक्ष कमी झाले. परिणाम वातावरणावर झाला. पूर्वी 15 ते 20 वर्षाने किंवा त्यापेक्षा जास्त काळाहुन एकदा येणारा दुष्काळ आता 198/85 पासुन विशेषतः विदर्भ, मराठवाड्यात दर तीन वर्षानी काही भागात अतिवृष्टी तर काही भाग दुष्काळ व कोरडाच राहु लागला. हरितक्रांतीनंतर शेताची इंचनइंच जमीन ही पिकांसाठी वापरली जाऊ लागली. जणू वर्षभर पिके घेण्याच्या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे 2000 पासुन पारंपारिक पिक पद्धतीत फार मोठे बदल होऊ लागले. (पिक बदल शेतकरी स्थैर्यासाठी गरजेचे आहेत) पण राज्याच्या चारही भागात (कोकण, प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा) पाऊस व हवामान वेगवेगळे असते. त्यानुसार बदल अपेक्षीत असतांना नको ती पिके नको त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागली. त्याचा ही परीणाम उत्पादकता कमी होण्यावर झाला. गेल्या विस वर्षात पृथ्वीवरचे तापमान 5 ते 8 डिग्रीने वाढले, त्याचा परीणाम सर्वत्रच जाणवतो आहे. या तापमानातही आता काही अंशी घट झाल्याचे दिसून येत आहे. हा देखील एक परिणाम कोरोनामुळे झाला आहे.
पिकविणारा विकायला शिकला

कोरोना आला तो शेतीसाठी संजीवनी ठरू लागला आहे. कोरोनानंतर किंवा दिपावलीपासुन शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येत आहेत. त्याची झलक गेल्या तीन महिन्यापासुन दिसून येत आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये संघटन होण मात्र गरजेचे झाले आहे. जेथे गट शेती, किंवा समुह शेती व शेतमाल विक्री झाली ते शेतकरी आर्थिक संपन्नतेच्या मार्गाने जात आहेत. मात्र त्यासाठी समविचारी तरूण शेतकरी एकत्र येणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे. जिथे ५-६ माणसे एकत्र येतात तेथे मतभिन्नता असतेच पण आपल्या उत्पन्नापासुन पैसे कमावणे हे सर्वांचे उद्दिष्ट असेल तर बाकी मतभिन्नता तात्पुरती बाजुला राहते. असे अनेक गट या काळात कार्यरत झाले आहेत. उदा. नाशिक, शिरूर (धोकनदि) येथी द्राक्ष उत्पादक, पुणे जिल्ह्यातील सासवड, पुरंदर, मावळ या भागातील भाजीपाला उत्पादक संघ, कोकणातील व अकलुज (माळशिरस) येथील आंबाजोगाई येथील कडधान्य व फळभाजी उत्पादक गट, किंवा विदर्भातील फळे व भाजीपाला उत्पादक, गट हे यामध्ये जवळपासच्या शहरातुन घरपोच सर्वोच्च प्रतीचा शेतमाल वितरीत करीत असल्यामुळे त्यांच्या वर ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला आहे.

येथुन पुढे सेंद्रीय पदार्थााची (उत्पादनाची) मागणी वाटत जात आहे. कारण, कोरोनामुळे प्रत्येक कुटूंबाला आपल्या कुटुंंबाचे आरोग्य महत्वाचे वाटते आहे. काही संस्था सुद्धा अगदी प्रिंटमिडीया असो किवा कच्च्यामालावर प्रक्रिया करणारे उद्योग असो हे सुद्ध घरपोच व्हिजीटेबल व फ्रुटबास्केट ऑनलाईन पुरवठा साखळीत उतरले आहेत. नोकरी गेल्यामुळे अनेक समविचार तरूण एकत्र येऊन या साखळीमधे उतरले आहेत. त्यातच केंद्र व राज्य सरकार यासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देण्यास तयार झाले आहेत. मात्र या व्यवस्थेमध्ये सेंद्रीय म्हणून रासायनिकची भेसळ होण्याचा धोका ही वाढला आहे. म्हणूनच शेतकरी हेच अत्यंत महत्वाचा घटक ठरणार आहे. त्यासाठी त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे.
नवीन शेतकरी प्रयोगशील

सुशिक्षीत युवकांमुळे शेती नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अगदी ड्रोन कॅमेराद्वारे फवारणी, नियंत्रण व निगराणीसुद्धा सुरु आहे. तर अनेकजण अत्यंत महागडी यंत्रे विकत घेऊन शेतीची मशागत करण्यापेक्षा स्वतःकडील वेस्टेज मटेरीयल्सपासुन अवजारे तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ होताहेत. उदाहरण द्यावयाचे झाले तर मोटारसायकलद्वारे कोळपणी, मका सोलणे, फवारणी, सायकलची चाके जोडुन व 1 एच.पीची मोटार जोडुन फवारणी, खते देणे, तण काढणे, याचे ही संपुर्ण महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग होताहेत. जमीन धारणा कमी झाल्यामुळे अधिक उत्पादनासाठी समविचारी गटशेती मधुन अधिकाधिक उत्पादनाचे प्रयोग यशस्वी होताहेत. बीड जिल्ह्यातील एक शेतकरी पॉलीहाऊसमधे आंबा लागवड व उत्पादन घेण्यासाठीचा तीन एकर क्षेत्रावर प्रयोग करतो आहे. फुलशेती, फळभाजी शेतीही तर पॉलीहाऊसमधे यशस्वी ठरलीच आहे. पण शेडनेटमधुन (10 गुंठेक्षेत्र) तीन लाख रूपयांपर्यंत नर्सरीची विविध रोपे विक्री करण्यात शेतकरी यशस्वी ठरला आहे. ग्राहकास काय पाहीजे याचा अभ्यास करणारा व कोठे काय विकते याची माहिती घेणारा शेतकरीच यात यशस्वी ठरतो आहे.


शेतीच देशाची आर्थिक घडी बसवेल.

कोरोनामुळे एकंदरीत भारताची आर्थिक घडी व्यवस्थित बसण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील. त्यामधे काही उद्योगधंदे बुडतील, बेकारी वाढेल, तर काही उद्योग तग धरून राहतील. मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीत शेती व शेतीपूरक उद्योगात मात्र भरभराट होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यासाठी शेतकरी सर्वांग परीपुर्ण होणे गरजेचे आहे. शेती उल्पादनाबरोबरच इतरही जोडधंदे करणे शेतकर्‍यांसाठी नितांत गरजेचे असणार आहे. शिवाय आपला उत्पादित शेतमाल मार्केटमधे सरळ विकण्यापेक्षा तो प्रक्रिया करून विक्रीसाठी साखळी केली तर दुप्पट फायदा होईल, मात्र त्यासाठी ग्राहकात विश्वास निर्माण करणे गरजेचे ठरणार आहे. पारंपारिक पिके आपल्या पुरती उत्पादीत करून बाजारात जे विकते तेच पिकवणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास व नेटवरून माहिती घेणे (ठेवणे) नितांत गरजेचे ठरणार आहे. यामधे जो टिकेल तोच यशस्वी होईल.

सद्या प्रत्येक शेतकर्‍यांकडे शेती क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापरा बबरोबरच मर्यादित व योग्यवेळी पाणी वापरणे याचाही अभ्यास करणे गरजेचे ठरले आहे. मध्यंतरी पाणी तज्ञांची एक परीषद झाली, त्यांनी कोणत्या पिकाला किती पाणी द्यावे व केव्हा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) द्यावे याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे आता आधुनिक सिंचन व्यवस्था राबवणे गरजेचे असल्याचेही प्रतिपादन केले. अशा लहान लहान सूचना अंमलात आणणे गरजेचे आहे.

असो, हे विवेचनात्मक शेती उद्योग वर्णन वाढतच जाणार आहे. कारण ते क्षेत्र अमर्यादित आहे. पण येथुन पुढे शेती जगतास अत्यंत चांगले दिवस येणार आहेत. मात्र यात टिकेल तोच फक्त यशस्वी होणार हे नक्की.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अॅग्रोउद्योगधंदेकोरोनाजय जवान-जय किसानतंत्रज्ञानप्रधानमंत्री स्व.लालबहादूर शास्रीप्रयोगशीलशेतकरीसेंद्रीय पदार्थहरितक्रांती
Previous Post

पावनखिंड भाग – 16 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – 17 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – 17 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Comments 1

  1. मनोज पाटील says:
    5 years ago

    खूप छान विश्लेषण……

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish