• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

काय म्हणता हिंग भारतात पिकत नाही ? मग तो येतो तरी कुठून ?

रोजच्या जेवणात वापरतो त्याला अस्सल हिंग का म्हणता येणार नाही 

Team Agroworld by Team Agroworld
November 16, 2020
in इतर
0
काय म्हणता हिंग भारतात पिकत नाही ? मग तो येतो तरी कुठून ?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आश्चर्य वाटेल, पण आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्या हिंग अगदी एक ग्रॅमही भारतात पिकत नाही. आपली कुठलीच फोडणी हिंगाशिवाय पूर्ण होत नाही, पण.. हिंग काही भारतात पिकत नाही. हजारो वर्षे आपण बाहेरच्या देशांतून म्हणजे अफगाणिस्तान, इराण, उझबेकीस्तान अशा दूरवरच्या देशांतून हिंग मागवतो. जगात पिकणार्‍या एकूण हिंगापैकी ४% हिंग आपणच वापरतो. दरवर्षी एकूण १२०० टन हिंग आयात करण्यासाठी आपण १३० कोटी डॉलरचा खर्च करतो.

इतिहास

या हिंगाची एक गंमत अशी आहे की भारतासारखे मोजकेच देश हिंगाचा वापर पाककृतीत करतात. युरोपियन अणि अमेरिकन लोकांना तर हिंगाचा वाससुद्धा नकोनकोसा वाटतो. त्यामुळे हिंग त्यांच्याकडे ‘डेव्हिल्स डंग’ या नावाने ओळखला जातो. भारतात ईशान्य-पूर्व राज्यांत पण हिंग जवळजवळ वापरला जात नाही. असं म्हणतात की १६ व्या शतकात मोगलांनी पहिल्यांदा हिंग आपल्याकडे आणून स्वयंपाकात रुजवला. पण या दाव्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही कारण आयुर्वेदात हिंग औषध म्हणून वापरला जातो. सध्या आपल्याला बाजारात जो हिंग मिळतो ती पावडर म्हणजे खरा हिंग नव्हे. ती पावडर म्हणजे गव्हाच्या पिठात ७०:३० प्रमाणात मिसळलेला हिंग. तर असा हा आपल्या अन्नातला महत्वाचा घटक भारतात पिकतच नाही. पण आता एक चांगली बातमी अशी आहे की भारतात हिंगाची रोपे तयार करून त्याची योग्य पध्दतीने वाढ करण्याचे तंत्र भारतीय कृषीतज्ञांनी विकसित केले आहे.

हिंग हा वनस्पतीच्या खोडातून पाझरणारा एक प्रकारचा डिंक आहे. त्यात गंधकाचे प्रमाण असल्याने तो खास गंध त्या डिंकाला मिळतो. सुकल्यावर हा डिंक गर्द तपकिरी रंगाचा होतो. हा डिंक असल्याने त्याची पावडर करणे कठीण असते. त्याला खलबत्त्यात घालुन तासनतास कुटावे लागते. त्यानंतर मैदा आणि इतर साधा नैसर्गिक डिंक घालून कुटल्यावर आपण वापरतो तशी हिंगाची पावडर तयार होते.

पण मुळात प्रश्न असा आहे की हिंग आपल्याकडे का पिकत नाही?? महत्वाचे कारण असे की हिंगाची लागवड कशी करावी यावर शास्त्रशुध्द मार्गदर्शन कुठेच उपलब्ध नाही. म्हणून आपल्या शास्त्रज्ञांना या वनस्पतीची अ‍ॅग्रोटेक्नॉलॉजी विकसित करावी लागली.

हिंगाची लागवड

२०१६ पासून (CSIR) सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीअल रिसर्चची एक शाखा इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजी हिंग वनस्पतीची रोपे तयार करण्याचा प्रयत्न करत होती. भारतात हिंगाची रोपे उपलब्ध असल्याचा अनेकांचा दावा आहे, पण ती रोपे म्हणजे खरा हिंग अ‍ॅसाफोटीडा फेरुला नाहीत. हिंगाचे बीज गेल्या ३० वर्षांत भारतात कोणीही आणले नाही. दुसरे असे की इराण-अफगाणिस्तान हे देश युध्दात इतके गुंतलेले आहेत की त्यांच्याकडून काही मदत मिळण्याची अपेक्षाच नाही.

हिंगाची रोपे उगवली की काही दिवसातच ती जमिनीत गडप होतात आणि नंतर बर्‍याच कालांतराने वर येतात. दुसरे असे की या रोपांची वाढ फक्त बर्फामुळे हवेतून जे बाष्प मिळते त्यावरच होते. इतर पिकांसारखे पाणी देता येत नाही. रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. थोडक्यात हिमालयाच्या परिसरातच हिंगाचे पिक घेणे शक्य आहे. हिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजीने एकूण ५०० हेक्टर जमिनीवर हिंगाची शेती केली आहे. सोबत त्या भागातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सोबतच ‘टिश्यू कल्चर’ सारखे तंत्र वापरून मोठ्या प्रमाणात या वनस्पतीची रोपे उपलब्ध होतील याची तयारीही चालू आहे. हे सर्व यशस्वी होण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी जाईल, पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या दर्जाचा हिंग भारतात उपलब्ध होईल अशी खात्री शास्त्रज्ञांना आहे.

सध्या बाजारात १०० ग्रॅम हिंगाचा भाव रुपये ३०० ते १००० इतका आहे. हे लक्षात घेता एक नवे ‘कॅश क्रॉप’ म्हणजेच नगदी पीक शेतकर्‍यांना मिळून थोड्याच वर्षांत जगभरात भारतीय हिंगाचा घमघमाट पसरला असेल!

सौजन्य:- सोशल मीडिया

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: AgroCSIRडेव्हिल्स डंग'हिंगहिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजी
Previous Post

मानवी मूल्य जपणारे डॉक्टर राधेश्याम चौधरी…!

Next Post

अहिंसेचे उपासक रतनलालजी बाफना यांचे निधन

Next Post
अहिंसेचे उपासक रतनलालजी बाफना यांचे निधन

अहिंसेचे उपासक रतनलालजी बाफना यांचे निधन

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.