कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून २०१८-१९ मध्ये पिकाखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के म्हणजेच ४२.१८ लाख हेक्टर इतके आहे. तसेच कापूस रुईची दर हेक्टरी उत्पादकता २६६ किलो / हेक्टर ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा ३०५ किलो / हेक्टर कमी आहे. कपाशीवर बुरशी, जिवाणू, विषाणूंमुळे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतात. काही वेळा आकस्मिक मर, मूलद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. रोगांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता योग्य वेळेत उपाययोजना करणे आवशयक आहे.
विषाणूजन्य रोग
(टोबॅको स्ट्रीक व्हायरस)- बीटी कपाशीत विषाणूजन्य रोग तीव्र प्रमाणात येतो. कपाशीच्या पानावर पिवळसर किंवा करपलेल्या रेघा येऊन पानाचा आकार कमी होतो. पाने व खोडावर करपलेल्या रेषा येऊन त्या वाढत जातात. त्यामुळे झाड खुजे होते. हा विषाणू तंबाखू, कापूस या पिकाव्यतिरिक्त सूर्यफूल, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांवर येतो. या रोगाचा प्रसार फुलकिडीद्वारे होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. फुलकिडीद्वारे होणारा प्रसार थांबविण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या तीन ते चार फवारण्या घ्याव्यात.
आकस्मिक मर
हा रोग नसून, या रोगला कोणताही बुरशी, जिवाणु किंवा विषाणु जबाबदार नाही. दिर्घ पावसाचा खंड नंतर भरपुर पाऊस आणि जमिनित अतिरीक्त पाण्याची साठवण व आर्द्रतामुळे या रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग बहुधा संकरित वाणावर जास्त येतो. रोगट झाडावरील पानाचा तजेलपणा नाहीसा होऊन पाने मलूल होतात व पानातील ताठपणा कमी होतो. झाडे संथगतीने सुकू लागतात. पाने, फुले व बोंडाची गळ होते. अपरिपक्व बोंडे अवेळी सुकतात. पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वीस दिवसांपेक्षा जास्त झाल्यास हा रोग होण्याची दाट शक्यता असते.
नियंत्रण :– जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यास योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड २ ते ३ ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्झिक्लोराइड ३० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.
धन्यवाद टीम agroworld अत्यंत ऊपयुक्त आणी छान माहीती पाठवल्या बद्दल
बरोबर माझ्या शेतातील कापुस पिकातील काही झाडे अशीच मैली