महाराष्ट्राध्ये साधारणतः ४० लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते. राज्यातील प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागात कापूस हे महत्वाचे नगदी पीक आहे.
कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीची ओळख
अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येतात.
पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते.
नुकसानीचा प्रकार
अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारिक कणाच्या सहाय्याने छिद्र बंद करते. ज्यामुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर सुध्दा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.
व्यवस्थापन
स्वच्छता मोहीम आणि मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी.
कपाशीच्या सभोवती नॉन बीटी रेफ्युजी आश्रीत कपाशीची लागवड करावी. तसेच मका, चवळी, झेंडू व एरंडी या मिश्र सापळापिकांची एक
कपाशीमध्ये अळ्या खाणा-या पक्षांना आकर्षित करण्यासाठी भगर हे मिश्रपिक घ्यावे आणि त्यासाठी हेक्टरी २५o ग्रॅम बियाणे वापरावे.
कपाशीच्या कुळातील (भेडी, अंबाडी) ज्या पीकावर शेंदरी बोंडअळी उपजिवीका करते अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.
मृद परिक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.
कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके/मिश्रपिके कपाशी पिकाभोवती घ्यावीत.
कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे उभे करावेत. म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील.
बोंडअळीग्रस्त डोमकळया तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात.
शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा अंझाडिरेक्टीन 10000 पीपीएम १ मि.लि. प्रति लिटर किंवा १५00 पीपीएम २.५ मि.लि. प्रति लिटर फवारणी करावी,
प्रत्येकी हेक्टरी ४ ते ५ फेरोमोन सापळे लावावेत. दोन फेरोमोन सापळ्यामधील अंतर ५0 मीटर ठेवावे. सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्यावेळी नष्ट करावेत.
पीक उगवल्यानंतर ११५ दिवसांनी ट्रायकोग्रॅमाटाँडीया बॅक्ट्री अथवा ट्रायकग्रामा विलीनीस या परोपजीवी किटकाची १.५ लक्ष अंडी प्रती हेक्टर या प्रमाणात प्रसारण करावीत.
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढील किटकनाशकांची फवारणी करावी.
कीटकनाशकप्रमाण/ ली. पाणीक्वीनालफॉस २५ ईसी२ मी.ली.प्रोफेनोफॉस ५० इसी२ मी.ली.थायोडीकार्ब ७५ डब्लूपी२ मी.ली.लॅमडा साहॅलोथ्रीन ५ इसी२ मी.ली.
कीटकनाशक प्रमाण / लि. पाणी क्रिनालफॉस २५ ईसी २ मि.ली. प्रोफेनोफॉस ५o ईसी २ मि.ली. थायोडीकार्ब ७५ डब्लुपी २ मि.ली. लॅमडा साहॅलोश्रीन ५ ईसी २ मि.ली.
अशाप्रकारे कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन करून शेतक-यांसाठी आपले बहुमुल्य पीक वाचवावे.
अळीची जिवनसाखळी नष्ट करणे महत्त्वाचे- संभाजी ठाकूर
हंगामपूर्व तसेच हंगामी कापूस लागवड केल्याने कोडींचा जीवनक्रम वर्षभर चालू राहणे. बी. टी. जनुक विरहीत कपाशीच्या आश्रीत ओळी न लावल्यामुळे बी. टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होणे.
जादा उत्पादनासाठी कपाशीच्या हंगामाचा कालावधी वाढविल्याने केिडीस खाद्याची उपलब्धता होणे यामुळे प्रभाव वाढतो. त्यामुळे कृषी विभागाने सांगितल्या प्रमाणे अळीचा जीवनक्रम संपविणे महत्वाचे आहे.
स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगांव
As aaushad kontya batlit yete