पशुंनाही आधार कार्डचा आधार..
जळगाव (प्रतिनिधी) – इन्फॉर्मशन नेटवर्क फोर ऍनिमल प्रॉटडक्टिविटी अँड हेल्थ (INAPH) अर्थात पशु आधार याची सुरुवात भारत सरकार यांनी केलेली आहे. 12 अंकी क्रमांक असलेले ओळखपत्र जनावरांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जनावरांची संपूर्ण माहिती चे जाळे आय एन ए पी एच अंतर्गत डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड करणार आहे. आपल्या आधार कार्ड सारखेच प्रत्येक जनावरांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (युआयडी) निश्चित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जनावरांच्या प्रजाती, जात, वंशावळ, जनावरांचे वेत, दूध उत्पादन, लसीकरण इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आलेले आहे. जनावरांचे पशु पैदास व संवर्धन धोरण ठरवण्यासाठी या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे. अनेक राज्यांमध्ये ही योजना चालू झाली असून आतापर्यंत 22.3 दशलक्ष गायी व म्हशी यांना आधार क्रमांक देण्यात आलेला आहे. भविष्यात नक्कीच जनावरांचे योग्य प्रकारे संवर्धन करण्यासाठी या पशु आधार कार्ड चा उपयोग होणार आहे… ( अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग यांच्याशी संपर्क साधावा… )
दुग्ध व्यवसायामध्ये गाई पालन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या देशामध्ये एकूण पन्नास प्रकारच्या देशी गाईच्या जाती आहेत व काही विदेशी व संकरित जाती आहेत. गाई पालन करत असताना त्यांना लागणारे पशु पोषण, आहार व्यवस्थापन, गोठ्याचे व्यवस्थापन, प्रजनन, आरोग्य इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. परंतु खरंच आपण या सर्व गोष्टीचे व्यवस्थापन करताना त्यांचा विविध प्रकारे येणारा ताण याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
गोपालन जनजागृती कार्यक्रम..
व्यवसायिक गाई पालन करताना योग्य प्रकारे व्यवस्थापन करून गाईंचा ताण कमी करून त्यांचे उत्पादन वाढवणे हाच मुख्य उद्देश असतो व त्याप्रमाणे आपण त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्र गेली पाच वर्षापासून देशी गाय संवर्धनाचे काम महाराष्ट्रात करीत आहे. त्यातून ज्या काही उणीवा अथवा गाईंच्या गरजा आम्हाला जाणवल्या त्या गोपालन जनजागृती कार्यक्रम च्या माध्यमातून गाईच्या काही मागण्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण गाईंचे व्यवस्थापन कशा प्रकारे करतो व त्यांच्या अपेक्षा, गरजा व मागण्या काय आहेत या आपल्या समोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहोत. आम्हाला खात्री आहे तुम्ही तुमच्या गाईला नक्की समजून घ्याल व त्यामधून आपल्या देशी गाईंचे चांगल्या प्रकारे संगोपन करून शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन कराल ही अपेक्षा करून जनजागृती गोपालनाची देशी गायींचे करू संवर्धन… साहिवाल क्लब महाराष्ट्राचे ध्येय पशु प्रजनन, आहार व्यवस्थापन…
माहिती सौजन्य – डॉ सोमनाथ माने, पुणे
डॉ धीरज कणखरे, धुळे (8378053264)