महाराष्ट्रात गव्हाची लागवड दोन प्रकारे करण्यात येते. जिरायत पध्दत व बागायत पध्दत म्हणुन . गहु आपल्या भागातील रबी हंगामातील एक महत्वाचे अन्नधन्याचे पिक आहे. या पिकावर अनेक किडीची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात यापिकावर मुख्यतः खोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या व्यवस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
खोडकिडाः
या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. ती अंगाने मु आणि डोके काळे असते. या किडीच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकुन जातो. ती खोडात शिरुन खालील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही.
या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपडुन नाश करावा. तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रवग्रस्त शेतातील धसकटे एकत्र करुन जाळावित. उभ्या पिकतात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
तुडतुडे
हे किटक आकारने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातुन रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन ती वाळु लागतात. व पिकांची वाढ खुंटते. या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर डायमेखोएट ३० टक्के प्रवाही ३०० मिली. किंवा मिथाईल डिमेटाईल २५ टक्के प्रवाही ४०० मिलि किंवा पेन्थीऑन ५० टक्के २०० मिलि. किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १ किंलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात घरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी /धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी.
मावा
गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असते. हेकिटक लाब व वर्तुळाकार असते
या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोडव चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.या किडीचे नियंत्रण तुडतुड्या प्रमाणे करावे.
वाळवी किंवा उधई- Termite: Microtermes obesi (Termitidae: Isoptera)
ही किड सर्वांच्या परीचयाची आहे. व या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसुन येतो. ही किड गव्हाच्या रोपाची मुळे खाते. व त्यामुळे रोपे वाळतात. व व सपुर्ण झाड मरते. वाळवाचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्भागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावेत. आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मिलि. १० लिटर पाण्यात मिसळुन वारुळात वापरावे. वरील औषधाचे मिश्रन ५० लिटर एका वारुळासाठी पुरेसे होते. किंवा क्विनडलफॉस ५ दजाणेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आथवा शेनखताबरोबर द्यावे.
उंदीर
उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरड ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमाडिऑलान एकत्र मिसळावे. चमचाभर (आंदाजे १० ग्रॅम) विषारी आमिष प्लॅस्टिकच्या पिशवित टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे.
रोग व त्यांचे व्यवस्थापन
१) तांबेराः
हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.(उदा. एचडी २१८९, पूर्णा, एकेडब्ल्यू ३८१ व एचआय ९७७)
तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.
२) काजळी किंवा काणीः
या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.
३) पानावरील करपाः
गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम + १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
सौजन्य – कृषी विभाग महाराष्ट्र शासन