• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर! शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही £100,000 Best ऑफर ते जाणून घ्या..

समूह शेती, कार्पोरेट फार्मिंग योजनांना वेग मिळण्याचा मार्ग मोकळा होणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 31, 2022
in शासकीय योजना
2
वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर! शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही £100,000 Best ऑफर ते जाणून घ्या..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

लंडन : वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर, शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! शेतीविषयी इंटरेस्टिंग बातमी आहे ही नक्कीच! का, कुठे दिली जातेय ही ऑफर ते जाणून घ्या..

जगात सर्वत्र वाढती लोकसंख्या आणि वाढीव अन्न-धान्य उत्पादन या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. तसा शेती हा जगातील सर्वात जुन्या व्यवसायांपैकी एक आहे. मात्र, जगभरात झपाट्याने शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यातच तरुणांचे शेतीकडे वळण्याचे प्रमाणही झपाट्याने कमी होत आहे. ब्रिटनलाही या समस्येने ग्रासले आहे. त्यामुळेच ब्रिटन सरकारने शेतीसाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच सरकारने वृद्ध शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. आता जाणून घेऊ, का आलीय ही अशी योजना आणि ती नेमकी आहे तरी काय ते …

ॲग्रोवर्ल्ड वाचकांना अमेझॉनवर सवलत

पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना 50% पर्यंतअनुदान

https://youtu.be/_kSDU5aXGwg

ब्रिटनमध्ये शेती क्षेत्राला वृध्दत्त्वाचे ग्रहण

ब्रिटनमध्ये, शेतीत गुंतलेले बहुतांश शेतकरी हे वृद्ध आहेत. दहापैकी चार ब्रिटिश शेतकऱ्यांचे वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, तर शेतकऱ्यांचे सरासरी वय 59 वर्ष आहे. शेतीतील उत्पन्न कमी असल्याने तरुण वर्ग शेतीकडे वळायला तयार होत नाही. अलीकडील आकडेवारी दर्शविते, की डोंगराळ आणि पर्वतीय भागातील ब्रिटिश शेतकऱ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न फक्त 15,500 पौंड आहे. हे उत्पन्न राष्ट्रीय सरासरी पगाराच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे ब्रिटनमध्येही भारताप्रमाणेच ग्रामीण भागातून वेगाने लोकसंख्या शहरात स्थलांतरित होऊ लागली आहे.

शेतीच्या उत्पन्नाला अनिश्चिततेचेही ग्रहण

शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर ब्रेक्झिट, कोविड-19 आणि जगण्याच्या वाढत्या खर्चाच्या संकटासारख्या अनेक सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे असलेल्या घटनांचाही परिणाम होतो. शेती अनुदानामध्ये नियोजित बदलानीही सर्वच ब्रिटिश शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाहीत. पूर्वी ही अनुदाने युरोपियन युनियन धोरणाशी जोडलेली होती, ती आता नवीन अनुदानांच्या धोरणात टप्प्याटप्प्याने बाद होत आहेत. आता पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांसाठी शेतकऱ्यांना पुरस्कृत करून त्याआधारे अनुदान दिले जाणार आहेत. या सर्वांमुळे शेतीला अनिश्चिततेचे ग्रहण लागलेले असल्याने तरुण वर्ग शेतीत यायला फारसा उत्सुक दिसत नाही.

सरकार देतेय एक कोटी रुपये : शेती नव्हे, शेतीतले काम सोडण्यासाठी ऑफर

ब्रिटिश सरकारने वयोवृद्ध शेतकऱ्यांना शेतीचे काम सोडण्यासाठी भरभक्कम ऑफर दिली आहे. जे वृद्ध शेतकरी शेती करणे सोडून देतील, त्यांना ब्रिटिश सरकार तब्बल एक लाख ब्रिटिश पौंड देणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम जवळपास एक कोटी रुपये इतकी होते. अगदी हिशेबच करून सांगायचे झाल्यास, शेतीचे काम सोडून देणाऱ्या वृद्ध ब्रिटिश शेतकऱ्यांना तिथले सरकार 95 लाख 97 हजार 981 ₹ देणार आहे. या शेतकऱ्यांना फक्त शेतीचे काम सोडायचे आहे, आपली शेतजमीन नव्हे! एकरकमी एक्झिट पेमेंट मिळणार असलेल्या या शेती सोडा योजनेकडे काही शेतकरी “गोल्डन हँडशेक” म्हणून पाहत आहेत.

https://eagroworld.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220731-WA0021.mp4

👆 स्पेस सेव्हींग, इनोव्हेटिव्ह, स्टायलिश मॅजिक फोल्डेबल हँगर्स SHAYONAM® Shynm Multi Hanger डील ऑफ दी डे : सेट फक्त 349₹!

तरुण रक्ताला शेतीकडे खेचण्यासाठी सरकारची धडपड

तरुण रक्ताला शेतात आकर्षित करण्यासाठी, ब्रिटन सरकारची धडपड सुरू आहे. त्यातूनच ब्रिटिश सरकारने वृद्ध व्यावसायिकांना सेवानिवृत्तीसाठी प्रवृत्त करण्यासाठी ही एक तात्पुरती योजना आणली आहे. वृद्ध शेतकरी सरकारकडे £100,000 पर्यंत एकरकमी एक्झिट पेमेंट प्राप्त करण्यासाठी अर्ज करू शकतात. निवृत्ती स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना आपली शेतजमीन विकायची असेल, भाड्याने कसायला द्यायची असेल किंवा पुन्हा स्वतः लागवडीखाली आणायची असल्यास ब्रिटन सरकार काही अटी-शर्तीवर निवृत्ती खंडित करेल. शेतकऱ्यांना अटी-शर्तीनुसार, एक्झिट पेमेंटमधील रक्कम सरकारकडे परत करावी लागेल. ही तशी नक्कीच शेतीविषयी इंटरेस्टिंग बातमी आहे.

“ॲग्रोवर्ल्ड”च्या वाचकांसाठी “अमेझॉन”वर खास सवलत 👈🏻 या लिंकवर क्लिक करून पाहा

महिलांना शेती क्षेत्रात उतरण्यासाठी प्रोत्साहन

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ऑफर दिली गेलीय, शेती सोडा, त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याचा कार्पोरेट मार्ग मोकळा होणार आहे. समूह शेतीलाही (ग्रुप फार्मिंग) त्यामुळे गती मिळणार आहे. या योजनेमुळे पारंपारिकपणे पुरूषप्रधान असलेल्या ब्रिटिश शेती क्षेत्रात अधिकाधिक महिला शेतकर्‍यांना प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. काही संशोधने असे सूचित करतात, की महिला शेतकऱ्यांची मानसिकता, दृष्टिकोन अधिक उद्योजकीय आहे. शेती क्षेत्राच्या आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांवर मात करण्यासाठी तो आवश्यक आहे. महिला अधिक नियोजनपूर्वक, धोरणीपणे आणि व्यावहारिक पद्धतीने शेती करू शकतात. त्यांना बाजारपेठांची जाणही चांगली असते. महिला मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रात आल्यास उत्पादनवाढीचे कार्यक्रम यशस्वी होऊ शकतात, असे ब्रिटन सरकारला वाटतेय.

 British Exit Scheme Golden Handshake शेतकऱ्यांसाठी ऑफर शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये
शेतकऱ्यांसाठी ऑफर शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये British Exit Scheme Golden Handshake

नवीन शेतकरी, तरुण, उद्योजकांना उपलब्ध होईल जमीन

वृद्ध शेतकऱ्यांच्या एक्झिट योजनेमुळे, नवीन, तरुण आणि शक्यतो अधिक उद्योजक शेतकरी या क्षेत्रात प्रवेश करू शकतील, कारण त्यांना जमीन उपलब्ध होईल. तथापि, ही योजना केवळ नवीन प्रवेशकर्त्यांसाठी तयार केलेली नाही. यातून इतरांना नवीन जमीन खरेदी करण्याच्या संधीचा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे शेजारील शेतांचा विस्तार होऊ शकेल, गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकतील. समूह शेती, गट शेती आणि “कार्पोरेट फार्मिंग”लाही त्यामुळे वेग येईल. सध्याच्या पिढीतील वृद्ध शेतकरी पारंपरिक चाकोरी सोडून नवे प्रयोग करायला क्वचितच धाजावतात. या योजनेतून जमीन मोकळी झाली, तर तरुण शेतकरी तांत्रिक कौशल्ये, उद्योजकीय मानसिकता आणि व्यावसायिक धोरणे आणून शेती उत्पादने वाढवू शकतात.

काही वृद्ध शेतकरी सरकारी योजनेवर नाखूष

लीड्स विद्यापीठात व्यवस्थापन विषयाचे व्याख्याते असलेले शेती विषयाचे अभ्यासक पीटर गिटिन्स त्यांच्या घरचा व्यक्तिगत अनुभव सांगतात, “माझ्या कौटुंबिक वर्तुळात, शेतीतील एक्झिट स्कीम म्हणजेच गोल्डन हँडशेक हा एक चर्चेचा विषय आहे. वेस्ट यॉर्कशायर भागात आमच्या कुटुंबाची 250 एकर शेती आहे. माझे 69 वर्षांचे वडीलच ती सांभाळतात. मात्र, ते काही सरकारच्या नव्या योजनेच्या मोहात पडत नाहीत. त्यांना खात्री आहे, की सरकारी अनुदाने कमी दराने का असेना, यापुढेही मिळत राहतील. त्यामुळे शेतीतून बाहेर पडण्याच्या योजनेतून आर्थिक फायदा होईलच असे नाही.

त्याऐवजी, कदाचित मुदतीपूर्वी शेत हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्यावर दबाव येईल. मात्र, ब्रिटनमध्ये शेती उत्तराधिकार, नव्या पिढीकडे हस्तांतरण ही एक लांब आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. माझ्या वडिलांची शेतीतून लवकर निवृत्त होण्याची आजिबात इच्छा नाही. त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी कौटुंबिक शेतात काम करण्यासाठी शाळा सोडली. त्यांना आता दुसरे काही करण्यात रस नाही. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शेतीसाठी समर्पित केले आहे, त्यांनी आजवर एकही दिवस सुट्टी घेतली नाही. आता जर त्यांनी शेतीतून निवृत्त होऊन मालकी हस्तांतरित केली तर त्यांना ते नक्कीच अवघड जाईल.”

अनेक शेतकऱ्यांना आकर्षक वाटतेय सरकारची योजना

अनेक शेतकरी मात्र सरकारच्या योजनेकडे आकर्षित होत आहेत. वाढत्या आव्हानात्मक आर्थिक वातावरणात अनेकांना शेती परवडेनाशी झाली आहे. तसेही 2005 ते 2015 दरम्यान कृषी पुरवठादार, यंत्रसामग्री दुरुस्ती सेवा आणि पशुखाद्य कंपन्यांसह इतर व्यवसायांचे नुकसान झाल्यामुळे 40 लाख शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. ब्रिटनच नव्हे तर संपूर्ण युरोपात शेतकऱ्यांसाठी अलीकडे शेती फायदेशीर बनवणे कठीण होत आहे.

मात्र, यापूर्वी आणलेल्या अशाच योजनेत शेतकऱ्यांना विलंबित देयके आणि सरकारी लालफिती काराभाराच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागल्याने मनात काहीशी सांशकता आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांची सरकारी ऑफर स्वीकारून शेतीच्या कामातून निवृत्त होण्याची तयारी आहे. शेतीत पैसे कमवण्याची आव्हाने पाहता, एकरकमी ऑफर स्वीकारून शेतीतून बाहेर पडण्याची रणनीती फायदेशीर ठरेल, असे त्यांना वाटते.

नवीन शेतकरी म्हणून सुरुवात करणे आव्हानात्मक

जुने शेतकरी मोठ्या प्रमाणावर निवृत्त केल्यानंतर, पूर्णतः नवीन शेतकरी सोबत घेऊन सुरुवात करणे तसे सरकारला सोपे नाही. शेतीसाठी सुरुवातीची गुंतवणूक, भांडवल महत्त्वपूर्ण आवश्यक आहे. त्यातच बिगरशेती पार्श्वभूमी असलेल्यांसाठी शेती क्षेत्र समजून घेण्यास बराच वेळ लागू शकतो. मोठ्या संख्येने अनुभवी शेतकरी शेतीच्या कामातून बाजूला झाल्यास सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. निवृत्त झालेल्या या मंडळींचे वेळ घालविणे जिकिरीचे होऊ शकते. याशिवाय, अनेक वर्षांच्या अनुभवातून आलेल्या जुन्या शेतकऱ्यांच्या ज्ञानातून समृद्ध होत गेलेली ब्रिटिश शेती त्या उपयुक्त ज्ञानाला पारखी होईल.

शेती क्षेत्रातील रोजगार घटण्याचा धोका

जुने, प्रस्थापित शेतकरी त्यांच्या सभोवतालच्या ग्रामीण भागाला आकार देण्यामध्ये आणि मूल्यवान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये गुंतलेले असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या पारंपारिक पद्धतींमध्ये अनेकदा स्थानिक कामगारांचा समावेश होतो. बरेच वृद्ध शेतकरी शेतीतून बाहेर गेले तर पारंपारिक शेतीची कामे कमी होऊ शकतात. नवीन प्रवेशकर्ते अधिक किफायतशीर, अत्याधुनिक पद्धती वापरण्यास प्राधान्य देऊ शकतात. अधिक कार्यक्षम यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानामध्ये ते गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे शेतीतील उत्पादकता वाढेल, परंतु कुशल-अकुशल कामगार, शेतमजुरांची गरज उरणार नाही. शेती क्षेत्रातील स्थानिक, हंगामी रोजगाराच्या संधी त्यामुळे कमी होतील. यातून ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि शहरातील स्थलांतरही वाढण्याचा धोका उद्भवू शकतो. ब्रिटिश अर्थव्यवस्थेतील शेतीक्षेत्राचे योगदान भविष्यात काय राहू शकते, त्याचा अंदाज वर्तविणे आता कठीणच आहे.

To attract younger blood into the fields, the United Kingdom government is offering older farmers a lump sum payment to quit agriculture. British Farming is the traditionally male-dominated sector and UK government wants more women farmers to enter.

संबधीत बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजना : फक्त सहा हजार रुपयेच नाही, तर आणखीही दोन महत्त्वाचे फायदे! काय ते जाणून घ्या…

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; दरमहा दिले जाईल 3,000 रुपये पेन्शन! कसे मिळवायचे हे पेन्शन ते घ्या जाणून …

राजस्थान सरकारचा रसायनमुक्त शेतीवर जोर; सेंद्रिय शेती मोहिमेसाठी 600 कोटींची तरतूद

शेती क्षेत्र, शेतकऱ्यांसाठी आता येणार नव-नवीन विमा पॉलिसी

Share this:

  • Facebook
  • X
Tags: एक्झिट स्कीमकार्पोरेट फार्मिंगकृषि व्यवसायकृषी उद्योगगोल्डन हॅण्डशेकजगाच्या पाठीवरब्रिटिश शेतीशेतकरी निवृत्ती योजनाशेती-तंत्रज्ञान
Previous Post

राज्यातील सर्व धरणांत झाला इतके % पाणीसाठा..; जायकवाडी, गिरणा, हतनूर, कोयना, खडकवासला, भंडारदरा, उजनीसह राज्यातील धरणांच्या पातळीत मोठी वाढ

Next Post

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!

Next Post
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!

Comments 2

  1. Pingback: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट! - Agro World
  2. Pingback: गाई-म्हशींना मीठ खाऊ घातल्याने त्यांची दूध देण्याची क्षमता खरोखरच वाढते का? जाणून घ्या याविषयी

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.