• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेतही दहा टक्क्यांनी जास्त; गिरणासह, हतनूर, अक्कलपाडा, भंडारदरा, जायकवाडी, गोसीखुर्द, उजनी, कोयना, राधानगरी, खडकवासला ही सर्व प्रमुख धरणे "पाणीदार"; मुंबईत आतापर्यंत वर्षभरातील सरासरीच्या 43 टक्के पाऊस

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 14, 2022
in तांत्रिक
2
राज्यभरातील धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या दोन आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : जुलैच्या पूर्वार्धात राज्यभरात होत असलेल्या दमदार पावसाने खरीप हंगामाला तर वरदान मिळाले आहेच, शिवाय धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर या सहा मोठ्या शहरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या दोन आठवड्यातील पावसाने राज्यातील सहाही विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 13 जुलैअखेर, नाशिक विभागातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत विभागातील धरणात 20.8% पाणीसाठा होता, यंदा तो 41.12 इतका आहे. त्यात 20.32% इतकी वाढ आहे. नाशिक विभागातील गिरणा, हतनूर, अक्कलपाडा, भंडारदरासह राज्यातील जायकवाडी, गोसीखुर्द, उजनी, कोयना, राधानगरी, खडकवासला ही सर्व प्रमुख धरणे “पाणीदार” झाली आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत वर्षभरातील एकूण सरासरीच्या 43 टक्के इतका पाऊस नोंदविला गेला आहे.

 

 

ओडिशातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम

बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अजूनही कायम आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार सुरू राहील, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी) प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी सांगितले.

जूनमधील चकव्यानंतर जुलैत जायला तयार नाही!

यावर्षी राज्यात पावसाची स्थिती ही नेमकी गेल्यावर्षीच्या उलट आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये धो-धो कोसळून पाऊस जुलैमध्ये सुटीवर गेला होता. तर, यंदा आठवडाभर आधी येऊन जूनपासूनच जबरदस्त बरसेल, या हवामान विभागाच्या अंदाजाला चकवा देत पाऊस जूनमध्ये गायबच राहिला. त्यामुळे खरिपाच्या 20 टक्के पेरण्याही या महिन्यात होऊ शकल्या नाहीत. मात्र, जुलै उजाडताच राज्यात मान्सून मुसळधार बरसू लागला. खरिपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असून भात लावणीलाही वेग आला आहे.

 

 

मेडीगट्टा लक्ष्मी धरणातून राज्यातील सर्वाधिक विसर्ग

गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्राचा टोकावर असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे सर्व 85 दरवाजे उघडण्यात आले असून राज्यातून सर्वाधिक पाणी विसर्ग सध्या या धरणातून होत आहे. या धरणातून 19 लाख 66 हजार 90 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी प्राणहिता नदीला महापूर आला असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ता मार्ग बंद पडलेले आहेत.

गोगलगायचा बंदोबस्त करण्याचे उपाय

https://youtu.be/Xyl3ssIpLRA

 

अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग सुरू

पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा नदीसह सर्व उपनद्या धोक्याच्या इशारा पातळीजवळ वाहत आहेत. लवकरच कोयना धरणातून विसर्ग सुरू होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सुरुवातीला 450 क्युसेक्स असलेला विसर्ग 24 तासात एक लाखांवर नेण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकातील कृष्णाकाठच्या जिल्ह्यात पुराचा इशारा देण्यात आला आहे.

गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी “ओव्हर फ्लो” होण्याची चिन्हे

जळगाव जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेले गिरणा धरण यंदा सलग चौथ्या वर्षी ओव्हर फ्लो होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत कधीही जुलै महिन्यात 50 टक्क्यांपर्यंतही न भरलेल्या या धरणात यंदा जुलै महिन्याच्या पूर्वार्धातच 70 टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. एकाच दिवसात तब्बल 30% वाढही धरणात प्रथमच नोंद झाली आहे. गिरणा धरणातून चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी धरणातून अजूनही सुरू असलेल्या विसर्गाचे पाणी येत आहे. एरवी सप्टेंबर, ऑक्टाेबरमध्ये भरणारे गिरणा धरण यंदा जुलै महिन्यातच 010 टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्यास तो विक्रम ठरेल. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण 60 टक्के भरले आहे. तोंडापूर, सुकी व मोर या मध्यम प्रकल्पांमध्येही 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तोंडापूर 64, सुकी प्रकल्प 75, तर मोर प्रकल्प 54 टक्के भरला आहे. मंगरुळ धरण 40, बहुळात 34, गूळ प्रकल्पात 36, तर अंजनी धरणात 25 टक्के पाणीसाठा झाला आहे.

 

AGROWORLD’s Upcoming Exhibitions @ JALGAON, @ NASHIK, @ SHAHADA….

 

धुळे, नंदुरबारला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात साठा वाढला

धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून पांझरा नदीत विसर्ग सुरू आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.

नाशिक, नगरमधली धरणेही तुडुंब

पावसाने जबरदस्त तडाखा दिलेल्या नाशिक जिल्ह्याला रेड ॲलर्ट जारी असून सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरण सुमारे 65 टक्के भरले असून गोदावरीमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने नाशिक शहरातील रामकुंडसह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वाघाडी पाठोपाठ दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण आणि केळझरही ओव्हरफलो झाले आहे. दारणा, कादवा, चणकापूर, पुनद धरणातून, तसेच ठेंगोडा बंधाऱ्यातून विसर्ग सुरू आहे. गिरणा आणि मोसम नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातूनही जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरु आहे. मुकणे, वालदेवी आणि आळंदी धरणातून मात्र अजून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला नाही. अहमदनगरमधील भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरणे 50 टक्केहून अधिक भरली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक छोटी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. औरंगाबादमधील जायकवाडी

 

 

राज्यातील सर्वच धरणात गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा

जुलैच्या पूर्वार्धातच राज्यातील धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या 28.73 टक्केच्या तुलनेत वधारून 38.96 टक्के इतका झाला असून त्यात 10.23 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. राज्यातील सर्व विभागातील सर्व धरणात गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा नोंद झाला आहे. मराठवाड्यात 31.69% पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी तो 26.62% होता. त्यात 5.07% वाढ आहे. पुणे विभागात 33.91 (गेल्यावर्षी 26.95, 7.01% वाढ), नाशिक विभागात 41.12 (गेल्यावर्षी 20.8, यंदा 20.32% वाढ), अमरावती विभागात 41.41 (34.18, +7.23%), नागपूर विभागात 41.47 (35.36, +6.11%) तर कोकण विभागात यंदा 66.26% पाणीसाठा आहे, जो गेल्यावर्षीच्या 39.47%पेक्षा 26.74% इतका जास्त आहे.

मुंबई, पुण्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

यंदाच्या पावसाळय़ात आतापर्यंत मुंबईतील शहर भागात वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस झाला आहे तर उपनगरात 40 टक्के पाऊस झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात मिळून 50 % पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा आताच पुढील 189 दिवस इतका म्हणजे पुढील 16 जानेवारी 2023 पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला धरणात मिळून 55% च्या आसपास पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला असून आता विसर्ग सुरू आहे. पुण्यातील पाणीकपातही त्यामुळे रद्द करण्यात आली आहे. मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97 टक्के पाणीसाठा झाला आहे.

 

 

तीन जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण प्लसमध्ये

पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण गेल्यावर्षीच्या तुलनेत 9 दिवस आधीच प्लसमध्ये आले आहे. गेल्या वर्षी 22 जुलै रोजी धरणातील पाणीसाठा मृतातून जिवंत पातळीत पोहोचला होता. उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा 63.25 टीएमसी इतका आहे. सध्या उजनी धरणात 3 टक्केहून अधिक जिवंत पाणी साठा नोंदविला गेला आहे.

अशी आहे राज्यातील जलसंपदा

राज्यातील अमरावती, औरंगबाद,कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहा विभागात एकूण 3 हजार 267 जलसंपदा प्रकल्प आहेत. त्यात मराठवाड्यात सर्वाधिक 964, त्याखालोखाल पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे विभागात 726, नाशिक – 571, अमरावती – 446, विदर्भात 384 तर कोकणात 176 प्रकल्प आहेत. यात 141 मोठी धरणे, 258 मध्यम तर 2 हजार 868 लघु प्रकल्प आहेत.

Rain in catchment areas increase water levels in Maharashtra dams. Almost all rivers in the state are flooded. IMD officials said that Maharashtra reported an excess rainfall of 20 per cent.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अलमट्टीगिरणाजलसंपदाधरणपंचगंगापाऊसपाणीसाठामान्सून अपडेटवाघूरविसर्गहतनूरहवामान
Previous Post

राज्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार कायम, “रेड ॲलर्ट” जारी; देशातील 25 राज्यात धुवां”धार”

Next Post

जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण

Next Post
जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण

जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण

Comments 2

  1. Pingback: राज्यातील सर्व धरणांत झाला इतके % पाणीसाठा..; जायकवाडी, गिरणा, हतनूर, कोयना, खडकवासला, भंडारदरा, उजन
  2. Pingback: "तो" पुन्हा येणार....! - Agro World

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.