हॅपनिंग

जळगाव जिल्ह्यात ‘हे’ असतील दुष्काळी तालुके; नाशिक विभागातील तब्बल 32 तालुक्यात ‘ट्रिगर 1’ दुष्काळ!

मुंबई : राज्यात दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय (जीआर) लवकरच काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी यावरून राज्यात जोरदार राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा जीआर काढण्याची तारीख बदलल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यातच, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर न करता सरकार दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात भीषण दुष्काळी स्थिती असलेल्या म्हणजे ‘ट्रिगर 1’ तालुक्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तुलनेने भीषणता कमी असलेल्या तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ‘ट्रिगर 2’ दुष्काळ जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तसाअहवाल सरकारला सादर केला आहे. दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी तालुक्यांची यादी महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र म्हणजे ‘एमएनसीएफसी’ला दिली गेली आहे. कोकण विभाग वगळता राज्यातील इतर सर्वच महसुली विभागात दुष्काळी स्थिती असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.


📞 Call Now

📞 Call Now

कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील 137 लाख हेक्टरपैकी सुमारे 90 लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. पावसात 21 दिवसांपेक्षा जास्त खंड पडला आहे. सामान्य सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील 139 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे. यात नाशिक विभागातील 32 तालुक्यांचा समावेश आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील 9, धुळे जिल्ह्यातील 4, नंदुरबार जिल्ह्यातील 5 आणि जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा समावेश आहे.

दुष्काळाचा पहिला ट्रिगर

दुष्काळाचा पहिला ट्रिगर निश्चित करण्यासाठी जून ते सप्टेंबरमधील सरासरी पाऊस विचारात घेतला जातो. पर्जन्यमानाचे विचलन, पावसातील खंड व जून-जुलैमधील सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी लक्षात घेतलं जाते. यानुसार राज्यातील 27 जिल्ह्यांमधील 139 तालुक्यांमध्ये पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा जास्त आहे. हलक्या जमिनीसाठी किमान 21 दिवसांचा आणि भारी जमिनीसाठी 28 दिवसांचा खंड विचारात घेतला जात असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

हलकी व भारी जमीन वर्गीकरण

जिल्हानिहाय जमिनीचे वर्गीकरण करून त्यानुसार हलकी व भारी जमिनीतील खंड विचारात घेत तालुक्यांची संख्या निश्चित करण्याचे ‘कृषी’ विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे ‘ॲग्रोवर्ल्ड’ला मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. राज्यातील सात जिल्ह्यांत 50 टक्क्यांपेक्षा कमी आणि 175 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याचे या अहवालात मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार, राज्यातील एकूण 175 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होऊ शकतो.

‘ट्रिगर 1’चे दुष्काळी तालुके

पुणे विभाग

• पुणे जिल्हा: हवेली, भोर, वेल्हे, खेड, राजगुरूनगर, शिरूर घोडनदी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, सासवड.

• सोलापूर: बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.

• अहिल्यानगर: पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोला, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.

कोल्हापूर विभाग

• सातारा: पाटण, खटाव-वडूज, माण-दहिवडी, फलटण, खंडाळा.

• सांगली: मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ.

• कोल्हापूर: चंदगड, राधानगरी.

ठाणे विभाग

• ठाणे: कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ.

• रायगड: पनवेल, कर्जत, पेण.

• पालघर: वाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड.

नागपूर विभाग

• वर्धा: वर्धा, देवळी. .

• गोंदिया: तिरोडा, सालेकसा.

• गडचिरोली: कुरखेडा, धानोरा व इटापल्ली.

अमरावती विभाग

• अमरावती: भातकुली, दर्यापूर.

• वाशिम: मंगरूळपीर, मानोरा, कारंजा.

• यवतमाळ: दारवा.

• अकोला: बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी.

• बुलढाणा: जळगाव जामोद, बुलढाणा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा.



📞 Call Now

📞 Call Now

लातूर विभाग

• लातूर: रेणापूर.

• धाराशिव: धाराशिव, तुळजापूर, परांडा, भूम.

• परभणी: पाथरी, मानवत.

छत्रपती संभाजीनगर विभाग

• बीड: आष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, शिरूर कासार.

• जालना: अंबड, परतूर, बदनापूर, घनसांगवी, मंठा.

• छत्रपती संभाजीनगर: पैठण, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव.

नाशिक विभाग

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुके

1. इगतपुरी
2. मालेगाव
3. बागलाण
4. कळवण
5. नांदगाव
6. सुरगाणा
7. सिन्नर
8. येवला
9. देवळा

धुळे जिल्ह्यातील दुष्काळी तालुके

1. धुळे
2. साक्री
3. शिरपूर
4. शिंदखेडा

नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी तालुके

1. नंदुरबार
2. नवापूर
3. शहादा
4. तळोदा
5. अक्राणी

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी तालुके

1. जळगाव
2. पाचोरा
3. अमळनेर
4. यावल
5. एरंडोल
6. भुसावळ
7. जामनेर
8. भडगाव
9. चोपडा
10. रावेर
11. धरणगाव
12. पारोळा
13. मुक्ताईनगर
14. बोदवड

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button