मायक्रोग्रीन्स म्हणजे भाज्या, धान्ये आणि औषधी वनस्पतींचे छोटे रोपे जे अंकुरण्याच्या सुरुवातीच्याच टप्प्यावर कापली जातात. म्हणजे बी रोपट्याचे पहिले दोन पाने विकसित झाल्यानंतर त्याची कापणी केली जाते.

मायक्रोग्रीन्स रोपे आकाराने लहान असली तरी त्यांच्यात सामान्य भाज्यांच्या तुलनेने 40 पट अधिक पोषकमूल्ये असतात. हे खाण्यायोग्य हिरवी रोपे आहेत जी बीट, पालक, ब्रोकली, इ. वनस्पतींच्या बियांपासून बनते.

यामध्ये पॉलीफेनोल्स नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मायक्रोग्रीन्स सेवन केल्याने रक्तातील साखर वाढण्यापसून रोखते व पचनतंत्र सुधारते.

मायक्रोग्रीन्स हे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. यामध्ये व्हिटामिन C आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. मायक्रोग्रीन्सचे नियमित सेवन केल्याने सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.

मायक्रोग्रीन्स हे कमी जागेत व कमी वेळेत वाढतात. मायक्रोग्रीन्स हे ट्रे मध्ये वाढवता येते. खिडकीच्या चौकटीवर किंवा स्वयंपाक घरात देखील आपण मायक्रोग्रीन्स वाढवू शकतो. मायक्रोग्रीन्स वाढवण्याकरता मातीची किंवा खताची गरज पडत नाही.

मायक्रोग्रीन्स वापर आपण पदार्थांमध्ये चव आणि पोषक वाढवण्यासाठी करतो. याचा वापर आपण सँडविच, पास्ता, सॅलड किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये करतो. मायक्रोग्रीन्स हे रोज 50 ग्रॅम सेवन केले पाहिजे.

मायक्रोग्रीन्स हे आपण आपल्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार निवडू शकतो. मुळा, मोहरी, पालक, बीट, ब्रोकली, रेड कॅबेज आणि इतर धान्यांचे मायक्रोग्रीन्स आपण निवडू शकतो.

मायक्रोग्रीन्स खाणे सुरक्षित आणि सहजपणे पचणारे आहेत. मायक्रोग्रीन्स थोड्या कमी उष्ण आणि आर्द्र हवामानात उगवले जातात, यामुळे मायक्रोग्रीन्सचे पाने आणि खोड खाल्ल्या जातात.