ही गाय लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. लातूर, धाराशिव, परभणी, कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रतिदिन दूध देण्याची क्षमता 10 ते 15 लिटर आहे.
गीर गाय
गीर गाय ही गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीतील ही एक प्रजाती आहे. या गाईमध्ये दूध देण्याची क्षमता ही 40 ते 45 लिटर प्रतिदिन आहे.
साहीवाल
ही गाय प्रामुख्याने गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळते. ही गाय सरासरी 15 ते 20 लिटर दूध देते परंतु, या गाईचे योग्य व्यवस्थापन ठेवले तर ही गाय 40 ते 50 लिटर दूध देते.
राठी
ही गाय मुख्यतः राजस्थानमध्ये आढळते. भारतीय गायीचे संकलन करून राठी गाय निर्मित केली, जसे की थारपारकर, लाल सिंधी, साहीवाल आणि धन्नी. राठी गाय प्रतिदिन 8 ते 18 लिटर दूध देते.
थारपारकर
या गाईला थार, पांढरी सिंधी, राखाडी सिंधी आणि मालानी या नावाने ओळखतात. ही गाय गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रतिदिन 10 ते 15 लिटर दूध देते.
लाल सिंधी
लाल सिंधी ही सिंध प्रांतातील गाय आहे आणि ती बांगलादेश, भारत आणि श्रीलंका येथे आढळते. लाल सिंधी ही 12 लिटर पेक्षा जास्त दूध देते.
कांकरेज
ही गुजरातच्या कच्छच्या रणात आणि राजस्थानमध्ये आढळते. या गाईची उष्णता सहनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. ही गाय 8 ते 10 लिटर दूध देते.
ओंगोल
ओंगोल गाईचे मूळ हे आंध्रप्रदेशातील ओंगोल गावातील आहे. त्या गाईची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. ही गाय प्रतिदिन 5 ते 8 लिटर दूध आहे.
होल्स्टीन फ्रिजियन
ही गाय युरोपियन गोवंश आहे. जगभरातील औद्योगिक दुग्धव्यवसायात ही प्रमुख जात आहे. दूध देण्याची क्षमता प्रतिदिन 40 लिटर आहे.