लिंबू बागेचे ऊन्हापासून संरक्षण 

Arrow

प्लास्टिक (४०-१०० मायक्रॉन) जाडीच्या कागदाचे आच्छादन करावे.

 झाडांच्या खोडास सात  सामू असलेल्या (१ किलो चुना + १ किलो मोरचूद + १० लि. पाणी) बोर्डोपेस्ट २.५ ते ३ फूट उंचीपर्यंत खोडावर लावावे. 

नवी लागवड केलेल्या कलमा रोपांना वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. त्यावर झाडाचे खोड सैलसर बांधावे.

सोसाट्याच्या वाऱ्यापासून खोडांचे व फळांचे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडे लावावीत. 

रोपांच्या कोवळ्या शेंड्याचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमांच्या चारही बाजूंना बांबू रोवून त्यावर मांडव करावा. 

सावलीसाठी तुराट्यांचा, पाचटाचा किंवा वाळलेल्या गवताचा वापर करावा. 

 उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याने बरेचसे पाणी वाया जाते.

हे रोखण्यासाठी फळझाडांच्या बुंध्याभोवती, आळ्यांमध्ये पाचट, गव्हांडा, वाळलेले गवत, भुसकट किंवा पॉलिथिन शीट यासारखे आच्छादन पसरुन टाकावे.

फळकलमांच्या किंवा झाडांच्या मुळापाशी पिकांच्या गरजेनुसार ठिंबक सिंचनाचे पाणी द्यावे. या पध्दतीमुळे रोपांच्या मुळ्यांच्या परिसरातील भाग नेहमी  ओलसर राहतो व झाडे वाचतात. 

कमी क्षेत्रातील जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पध्दत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

Arrow

याकरिता झाडांच्या वाढीनुसार  साधारणतः ५ ते ७ लिटर पाणी बसेल एवढी लहान मडकी पहिल्या २ ते ३ वर्षांकरिता वापरावीत. 

मडक्यात पाणी भरल्यानंतर त्यावर लाकडी फळी व जाड कागदाचे झाकण करावे.

कांदा वर्षभर  टिकवायचाय ?  मग हे बघाच !