शेवगा ही वनस्पती मोरिंगा ओलिफेरा या कुळातली. शेवगाच्या उत्पादनात भारत हा प्रथम क्रमांकावर असून आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. शेवगा हा वेगाने वाढणारा पानझडी वृक्ष आहे.
आयुर्वेदानुसार शेवगाचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया उपयुक्त आहेत. शेवगा आहे उष्णकटिबंधीय व समशीतोक्ष कटिबंधीय प्रदेशात वाढणारे वृक्ष. याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असे म्हणतात.
शेवगाच्या फुलांमध्ये क, ई जीवनसत्वे असतात. शेवगामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स असतात. या झाडाच्या पानांमध्ये व्हिटामिन-सी असते.
शेवग्याच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडन्स ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. शेवग्याच्या पानांचे पावडर बनवून खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यासारख्या आजारांपासून धोका कमी होतो. या पानापासून शरीराला खूप चांगला फायदा आहे.
शेवग्याच्या पानांच्या पावडरचे सेवन केल्यास निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते. तसेच अनेक आजारापासून आराम मिळतो. शेवग्याच्या पानांची पावडर ही रक्त शुद्ध करण्याचे आणि निरोगी ठेवण्याचे काम करते.
शेवग्याच्या शेंगांचे वरचे टरफले काढून ते वाळवायचे, त्यानंतर त्याची पावडर करायची व 1 ग्रॅम पावडर 1 लि. पाण्यात एकजीव करून ते विहिरीच्या पाण्यात टाकायचे जेणेकरून पाण्यातील सर्व जंतू मरतात. जो काही पाण्यातील गाळ असतो तो खाली बसतो. ही शेवग्याची पावडर तुरटीचे काम करते. या पावडरने 90 ते 95% जीवजंतू मरतात.