उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने करा  शेतीची मशागत !

Arrow

More Info

" जमिनीची मशागत म्हणजे लागवड करण्यासाठी माती तयार करणे किंवा मातीची स्थिती बदलणे. " 

मुख्यतः मशागत करण्यासाठी नांगरणी, खोदणे, मातीचे उलटपालट करणे इत्यादी प्रक्रिया केल्या जातात. मशागत केल्यामुळे मातीची रचना बदलते तण नष्ट होतात आणि पिकांचे अवशेषांचे व्यवस्थापन होते. 

उन्हाळ्यात जमीन कोरडी होऊन आकुंचन पावते. तसेच वर्षभर पीक घेऊन जमिनी घट्ट होतात व भुसभुशीतपणा कमी होतो. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरता जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यामध्ये जमिनीची मशागतीचे उद्दिष्ट म्हणजे पालापाचोळा नष्ट करणे, जमिनीतील तण नष्ट करणे, पाण्याचे निचरा चांगल्या करणे, खत-खनिजांचे योग्य नियोजन करणे, माती भुसभुशीत करणे, रोग व किड नियंत्रण करणे, बियाणे पेरण्यासाठी योग्य माती तयार करणे, जमिनीतील तापमान नियंत्रित ठेवणे, मातीची सुपीकता वाढवणे, पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन करण्यासाठी मशागत करणे.

रब्बी हंगामाची पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीची खोलवर मशागत करणे आवश्यक आहे. यामध्ये जमिनीची खोलवर नांगरणी करून त्यातील ठेकडे फोडून घ्यावे व जमीन उन्हात चांगली तापू द्यावी. याबरोबर आधीच्या पिकांचे आणि तणांचे अवशेष नष्ट करावे. 

Arrow

त्यामुळे पुढील हंगामातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन उन्हात तापवल्यामुळे त्यातील किडांच्या व रोगांच्या सुप्तअवस्था नष्ट होता. पुढील हंगाम नष्ट होण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे व जमीन सपाट करून घ्यावी.

पिकांच्या वाढीच्या गरजेनुसार पीक लागवडीसाठी सऱ्या किंवा वाफे तयार करून घ्यावे. पीक लागवडीपूर्वी योग्य बेसल खताचा वापर करून पिकाच्या गरजेनुसार ठिबक किंवा मल्चिंग टाकून घ्यावे. 

पीक लागवड करण्यापूर्वी पिकांची फेरपालट करणे, लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे, किंवा बीज प्रक्रिया व रोगप्रक्रिया या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

मशागत करण्यापूर्वी शक्य झाल्यास जमिनीची माती परीक्षण करणे योग्य ठरते. जेणेकरून खतांचे योग्य पद्धतीने नियोजन करता येते. बहुवर्षी फळपिकांमध्ये पावसाळ्यापूर्वी जमिनीची हलकी मशागत करून तण आणि कीड व रोग व्यवस्थापन करावे.