पुदिना हा शरीराला थंडावा देणारी वनस्पती आहे. पुदिन्याची लागवड ही नेहमी पाणी निचरा होणारी जमीन किंवा हलकी ओल्या जमिनीत लावावे. पुदिना वाढीस तापमान हे 15 ते 25°C असावे. पुदिना येण्याचा कालावधी 40 ते 50 दिवसांचा असतो.

पुदिना सेवन केल्याने पोट व लघवी साफ होते. पुदिना खाल्ल्याने पचन सुधारते, डोकेदुखी कमी करते व त्वचेसाठी चांगला असतो. पुदिना खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्त्रियांनी याचे नेहमी सेवन केले पाहिजे. पुदिना सेवन केल्याने वजनही कमी होते.

ही एक ऊर्जा देणारी वनस्पती आहे. त्याचा उपयोग आपण तेल, टूथपेस्ट, तोंड धुण्यासाठी व अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जातो. पुदिना हा औषधीसाठीही वापरला जातो. पुदिना हा नॅचरल पेनकिलर (natural pain killer) प्रमाणे काम करतो. आयुर्वेदिक औषधी मध्ये याचा अर्क वापरला जातो.

पुदिना हा अनेक आजारांवर गुणकारी ठरतो. पुदिना पासून तयार केलेल्या औषधे जसे की नाकदुखी, संधिवात, मज्जातंतुवेदना, कार्यिमेटिव्ह आणि ब्रोन्कियल उपचारांमध्ये वापरले जाते.

पुदिन्याचा उगम हा भूमध्य समुद्रात झाला आहे. पुदिना हा प्रामुख्याने अंगोला, थायलंड, चीन, अर्जेंटिना, ब्राझील, जपान, भारत आणि पॅराग्वे मध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उत्तर प्रदेश आणि पंजाब हे भारतातील प्रमुख पुदिना उत्पादक राज्य आहे.