केळीच्या साठवणुकीच्या ठिकाणी तापमान योग्य आहे की नाही हे तपासावे.

केळीच्या खोडाला सुकलेल्या पानांनी झाकून घ्यावे जेणेकरून खोड थंड होणार नाही. 

थंडीच्या वेळेस पहाटे बागेच्या भोवती शेकोटी पेटवून तापमान नियंत्रित ठेवावे.

बागेला पहाटे भरपूर पाणी दिल्यास पांढरी मुळे कार्यक्षम राहतात. ज्यामुळे केळीचे खोड अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणात शोषून घेतात.

केळीच्या घडाला सुद्धा पॉलिथिन किंवा इतर बॅगने झाकून घ्यावे. 

केळीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी न्यूट्रियंट्सचा वापर करावा. सल्फर हा 90% उष्णता निर्माण करतो.

पांढरा पोटॅश 5 ते 7 प्रति किलो ड्रीपमधून दिला गेला पाहिजे. 

जमिनीस भेगा पडू देऊ नये जेणेकरून थंडी जमिनीच्या आतमध्ये जाणार नाही.

विशेषता थंडीच्या दिवसात केळीच्या बागेभोवती विशिष्ट प्रकारचे वनस्पतींचे कुंपण तयार करावे.

बनाना चिलिंग इंजुरी व उपाय..  भाग - 1