मल्चिंग लावण्याची प्रथा ही एक प्राचीन आणि प्रभावी तंत्र आहे. मल्चिंग पेपर हा एक प्लास्टिकचा थर आहे जो शेतीतील मातीवर पसरवला जातो. मल्चिंग पेपरमुळे पिकांसाठी योग्य तापमान आणि आद्रता टिकून राहते. मल्चिंगमुळे झाडाभोवती संरक्षणात्मक वातावरण तयार होते. मल्चिंग पेपर हा वनस्पतींच्या आरोग्यांसाठी फायदेशीर असून तण नियंत्रित आहे.

मल्चिंगचे प्रकार सेंद्रिय मल्चिंग, पेंढा मल्चिंग, गवताचे मल्चिंग, अजैविक मल्चिंग प्लास्टिक पेपर मल्चिंग, पारदर्शक प्लास्टिक मल्चिंग, काळे प्लास्टिक मल्चिंग, पिवळा तपकिरी प्लास्टिक मल्चिंग, चांदी-काळा प्लास्टिक मल्चिंग, पांढरा-काळा प्लास्टिक मल्चिंग

मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कमीत कमी त्याला दोन दिवस होल पाडायचे नाही. मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर ऊन हे मल्चिंगवर पडते व त्याला होल नसल्यामुळे मल्चिंग खाली उष्णता तयार होते व तशीच उष्णता ही खाली जमिनीत तयार होते आणि ती उष्णता तयार झाल्यामुळे जमिनीत असलेले घातक बुरशी पूर्णपणे मरण पावण्याची संभावना आहे. तिथे आपण रासायनिक कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरला तरी ते प्रभावी होणार नाही तितकं प्रभावी हे आहे.

मल्चिंगला होल पाडण्या अगोदर 15 ते 20 मिनिट ठिबक सिंचनने पाणी द्यावे. त्यावेळी पाणी आणि हवा या दोघांमध्ये जो काही संघर्ष होतो त्यातून परत मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते आणि पूर्ण बेड निर्जंतुक होऊन जातो. ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला एक दिवस ठेवायचे आहे आणि चौथ्या दिवशी मल्चिंगला सायंकाळी होल पाडावे. होल पाडून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटे पाणी द्यायचे कारण सगळी गरम हवा बाहेर निघून जाईल. सायंकाळी होल पडल्यानंतर पूर्ण दिवस थांबावे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी रोप लागवड करावी.

मल्चिंगचे फायदे तणांची वाढ थांबण्यास मदत होते. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होण्यापासून आणि आद्रता दीर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत होते. मल्चिंग पेपर प्रकाश परिवर्तित करते त्यामुळे अफिड्स आणि थ्रिप्स सारख्या कीटकांवर नियंत्रण करणे सोपे होते. हिवाळ्यात उष्णता आणि कोल्ड इन्सुलेटर म्हणून काम करते. मल्चिंग पेपर वापरल्यास ड्रीपच्या आसपास क्षारतेची पातळी कमी आढळून येते.