सौर कृषीपंपाचे फायदे कोणते?
1. शेतकऱ्यांना दिवसा देखील सिंचन करणे सहज शक्य होणार आहे.
2. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, डिम लाईट अथवा सिंगल फेज यांचा सिंचनावर फरक पडणार नाही.
3. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल.
4. विजेचा पोल पडून किंवा तार तुटून अपघाताचा धोका नाही.
5. डिझेलचा किंवा विजेचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च होणार नाही.