दशपर्णी अर्क म्हणजे दहा वनस्पतींचा वापर करून बनवलेला अर्क.. हा अर्क नैसर्गिक कीटकनाशक असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
गुळवेल, कडुनिंब, पपई, टनटनी, एरंड, निर्गुडीची, रुई, सिताफळ, घाणेरी, धोतरा, लाल कन्हेर, करंज यापैकी कोणत्याही दहा वनस्पतींच्या पाल्यांचा उपयोग करावा. त्यासोबत देशी गाईचे शेण, गाईचे गोमूत्र, हिरवी, मिरची लसूण याचाही वापर करावा.
दशपर्णी अर्क तयार करताना ते सावलीतच करावे. तयार करण्यात आलेले दशपर्णी अर्क हे सुती कापडाने गाळून घ्यावे.
तयार केलेले दशपर्णी अर्क तीन महिन्यांपर्यंत वापरता येते. तसेच या अर्काची फवारणी शक्यतो दर आठ दिवसांनी करावी. तसेच ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेतच करावी.
दशपर्णी अर्क कसा तयार केला जातो याची संपूर्ण माहिती लिंक मध्ये.