बाजार भाव

कांदा लिलाव पूर्ववत सुरु ; वाचा आजचे कांदा बाजारभाव

पुणे : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांदा निर्यातबंदीमुळे बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. मात्र, आता राज्यासह नाशिक जिल्यातील बाजार समित्यांनी कांदा लिलाव नियमितपणे सुरु केले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच यासंदर्भातील सूचना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या अधिकृत पेजवर केली आहे. मात्र, आता कांदा लिलाव सुरु करण्यात आल्याने कांद्याला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कांद्याची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून मिळालेला माहितीनुसार, कांद्याला आज (दि. 13) रोजी पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वसाधारण दर हा 3 हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर देखील 3 हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. येथे कांद्याची 7 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच काल (दि. 12) रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 2 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर जळगाव कृषी बाजार समितीत कांद्याला सर्वसाधारण दर हा 1 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (13/12/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 7 3000
कांदा (12/12/2023)
कोल्हापूर क्विंटल 4944 2800
अकोला क्विंटल 205 3000
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 2155 1650
मुंबई – मार्केट क्विंटल 9453 3150
मंचर क्विंटल 1975 2605
लासूर स्टेशन क्विंटल 1900 1500
दौंड-केडगाव क्विंटल 2270 3100
सातारा क्विंटल 68 3400
राहता क्विंटल 1494 2550
हिंगणा क्विंटल 2 2200
जुन्नर -आळेफाटा क्विंटल 10907 2000
येवला -आंदरसूल क्विंटल 4721 1900
लासलगाव क्विंटल 6195 2000
लासलगाव – निफाड क्विंटल 2150 2200
लासलगाव – विंचूर क्विंटल 20400 2100
जळगाव क्विंटल 1499 1300
नागपूर क्विंटल 2420 2625
सिन्नर क्विंटल 1070 2050
पुलगाव क्विंटल 2710 7125
Panchaganga Seeds

 

Ajit seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button