• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

महिलांना रोजगाराच्या संधींसह स्वच्छ, सुरक्षित इंधन पुरविण्यासाठी ‘उमेद’ पुढाकार घेणार

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 11, 2023
in ग्रामविकास योजना
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

‘उमेद’ आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ यांच्यात सामंजस्य करार; प्रायोगिक तत्त्वावर जळगाव, नाशिकसह पाच जिल्ह्यात राबवणार योजना

ग्रामीण कुटुंबांतील बचत गटाच्या महिलांना रोजगाराच्या संधीसह स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरवठा व्हावा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या समूदाय संसाधन व्यक्तींना अधिकचे उत्पन्न व्हावे या हेतूने उमेद आणि हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) यांच्यातील सामंजस्य करार मैलाचा दगड ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी, उपजीविका स्त्रोत निर्माण करणे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधील ग्रामीण भागातील कुटुंबांना एलपीजी गॅस बाबत विविध सेवा पुरविणे, त्यांना स्वयंपाकाकरिता स्वच्छ आणि सुरक्षित इंधन पुरविणे, बंद पडलेल्या गॅस जोडणीचे पुनरुज्जीवन करणे, नवीन जोडणी देणे, स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचे महत्व व गरज तळा-गाळापर्यंत पोहोचविणे इ. बाबींचा समावेश यात आहे. या उद्देशाने आज नवी मुंबईत हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ मर्यादित (HPCL) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद (MSRLM) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी.

सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर राज्यात जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या 5 जिल्ह्यातील प्रत्येकी ३ तालुक्यांची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढे याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

‘उमेद’ अभियानातील कार्यरत समूदाय संसाधन व्यक्ती (CRP) ची एचपी सखी म्हणून निवड करण्यात येणार आहे. पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी एचपी सखी यांना ठराविक दराने सेवाशुल्क देण्यात येईल. या सामंजस्य करारामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना निरंतर स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचा पुरवठा होण्यास व व त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन निर्माण होऊन त्यांच्या उपजीविकेत वाढ होणार असल्याबाबत श्री. जयवंशी यांनी समाधान व्यक्त केले. उमेद्च्या समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला उत्कृष्ट कार्य करतील, अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, एचपीसीएल चे कार्यकारी संचालक अबुजकुमार जैन, व्ही. एस चक्रवर्ती, मुख्य महाव्यवस्थापक, पश्चिम विभाग, ‘उमेद’ अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम यांच्यासह दोन्ही कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ; ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ
फावल्या वेळेचा सदुपयोग करत सुरू केला प्रक्रिया उद्योग

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उमेदएचपी सखीग्रामीण विकासमहिला बचत गटमहिला रोजगार
Previous Post

कृषी विभागाचा ‘जैविक इंडिया ॲवार्ड’ ने सन्मान

Next Post

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

Next Post

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

ताज्या बातम्या

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Senaste nytt om casino utan svensk licens: 10 euro gaming

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Golden Star Casino Australia: Responsible Gambling Measures in Place

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Pinco Azerbaijan: Texnologiyaların Qəbul Edilməsindəki Çətinliklərin Həlli

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Promozioni settimanali nei casino italiani non AAMS: Guida alla scelta del sito migliore

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Удобная регистрация и вход в Пин Ап через соцсети за один клик

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish