केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी मोठे अनुदान दिले जाते.

महाराष्ट्रात सोलर पंप PM-KUSUM Scheme या योजनेतून दिला जातो.

अर्जासाठी लागणारी  कागदपत्रे • आधार कार्ड • 7/12 उतारा • बँक पासबुक • मोबाईल नंबर • फोटो

योजनेत खालील  पंप मिळतात: • 3 HP • 5 HP • 7.5 HP

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 70% ते 90% पर्यंत सबसिडी मिळते. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते.

ही योजना प्रामुख्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे.

विहीर, बोअरवेल किंवा शेततळे असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो.

शेतकरी महावितरण / कृषी विभाग / महा-ऊर्जा पोर्टल किंवा संबंधित सरकारी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सोलर पंप (Solar Pump) चे फायदे  भाग - 01