पिकांवर अळी, मावा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाला आहे का?

तर यावर एक जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे ब्रह्मास्त्र अर्क

हा पूर्णपणे नैसर्गिक असून अनेक किडींवर प्रभावीपणे नियंत्रण करता येते. 

ब्रह्मास्त्र बनवायचे कसे ?

कडुनिंब, सीताफळ, करंज, रुई आणि धतुरा या झाडांची पाने प्रत्येकी साधारण 2 किलो घ्यावे.

सर्व पाने बारीक कुटून घ्या. एका मोठ्या भांड्यात 10 लिटर गोमूत्र घाला. 

त्यात वरील सर्व पाने टाका आणि हे मिश्रण 4 ते 5 वेळा उकळवा.

मिश्रण थंड झाल्यावर ते कापडाने गाळून घ्या. नंतर स्वच्छ ड्रम किंवा बाटलीत साठवा

फवारणी कशी करावी?

10 लिटर पाण्यात 200 ते 300 मिली अर्क मिसळून फवारणी करा.

7 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी केल्यास परिणाम चांगला मिळतो.

हा अर्क कापूस, मिरची, टोमॅटो, कांदा, सोयाबीन आणि सर्व भाजीपाला पिकांवर वापरू शकतो 

ब्रह्मास्त्र अर्काचे फायदे पिकांवरील कीड नियंत्रण पूर्णपणे सेंद्रिय व सुरक्षित खर्च खूप कमी माती व पिकांना  नुकसान नाही

जमिनीची सुपीकता वाढवणारे ‘गिरीपुष्प’ पहा याचे फायदे !