शेत जमिनीची सुपीकता वाढवणारे नैसर्गिक खत देणारे आणि उंदीर नियंत्रण करणारे अद्भुत वृक्ष...
हिवाळ्यात हे झाड गुलाबी- जांभळ्या सुंदर फुलांनी बहरते आणि संपूर्ण परिसर
आकर्षक दिसतो..
गिरीपुष्प या वृक्षाला काही ठिकाणी उंदीर मारी किंवा सारया झाड असेही म्हणतात.
या झाडाचे खोड थोडे ठिसूळ असते आणि हिवाळ्यात या झाडाची पूर्ण पानगळ होते.
गिरीपुष्पाची पाने शेतात सेंद्रिय खत म्हणून वापरता येतात. ही पाने 15 ते 20 दिवसांत कुजून मातीला पोषण देतात.
या झाडाच्या बिया आणि सालीपासून उंदीर मारण्यासाठी जैविक औषध तयार करता येते.
गिरीपुष्पचे फायदे
जमिनीची धूप कमी करते
मातीला पोषण पुरवते
जमिनीत नायट्रोजन स्थिर करते
यामुळे नापीक जमीन सुधारते.
गिरीपुष्पा शेताच्या बांधावर जिवंत कुंपण म्हणून लावता येते. यामुळे शेताचे संरक्षण, माती सुधारणा आणि अतिरिक्त खत देखील मिळतात.
फक्त 5 घरगुती वस्तू… आणि पिकांमध्ये दिसेल फरक!
Learn more