रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात येणारा फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या काळात हवामान कोरडे व अनुकूल असल्याने काही पिकांचे चांगले उत्पादन मिळू शकते.
टोमॅटो
निचऱ्याची चांगली व्यवस्था असलेली मध्यम ते काळी जमीन उपयुक्त
लागवडीनंतर 60–70 दिवसांत तोडणीस सुरुवात होते.
मिरची
उष्ण व कोरडे हवामान मिरचीस मानवते.
हलकी ते मध्यम जमीन योग्य
ठिबक सिंचन केल्यास उत्पादन चांगले मिळते. .
वांगी
वांगी हे वर्षभर घेता येणारे पीक आहे. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास फळधारणा वाढते.
लागवडीनंतर साधारण 70–80 दिवसांत काढणी सुरू होते.
भेंडी
भेंडीस उष्ण हवामान अनुकूल आहे.
45–50 दिवसांत पहिली तोडणी करता येते.
दोडका
वेलवर्गीय पीक असून चांगली निचऱ्याची जमीन आवश्यक आहे.
मांडव पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढते.
कारली
उष्ण व दमट हवामान योग्य आहे.
योग्य खत व्यवस्थापन केल्यास फळांचा दर्जा चांगला राहतो.
दुधी भोपळा
सेंद्रिय खत व नियमित पाणी दिल्यास उत्पादन चांगले मिळते.
बाजारात नेहमी मागणी असते.
काकडी
हलकी जमीन व भरपूर पाणी आवश्यक असते.
लवकर उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते.
गवार
गवार पीक कमी पाण्यात येते.
उष्ण हवामान अनुकूल असून भाजी व शेंगा दोन्हींसाठी उपयोगी आहे.
कोथिंबीर
कोथिंबीर कमी कालावधीत येणारे पीक आहे.
पेरणीनंतर 30–35 दिवसांत काढणी करता येते.
मेथी
हलकी ते मध्यम जमीन
योग्य असून नियमित पाणी आवश्यक आहे.
पालक
पालक हे झपाट्याने वाढणारे
पीक आहे.
फेब्रुवारीत पेरणी केल्यास सतत काढणी करता येते.
मोत्यांची शेती करायची आहे ? ;
येथे बघा संपूर्ण माहिती
Learn more